आता कॉंग्रेस श्रेष्ठींना एक तर अंबिका सोनींच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतील किंवा आपल्या मनातला “फर्स्ट चॉइस” बाजूला ठेवून दुसर्या कुणाच्या तरी गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालावी लागेल. पण ही माळ बळी जाणाऱ्या बकऱ्याच्या गळ्यातल्या माळेसारखी असेल हे मात्र नक्की…!!
पंजाबमध्ये औट घटकेचा राजा व्हायला कोण तयार होणार…?? अशी स्थिती कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्यानंतर आली आहे. एकटे नवज्योत सिंग सिद्धू गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत पण काँग्रेस श्रेष्ठींच्या मनात मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव नाही. कारण काँग्रेस श्रेष्ठींची पहिली ऑफर 78 वर्षांच्या अंबिका सोनींना होती. ती त्यांनी पहिल्याच झटक्यातच नाकारून आपण पंजाब मध्ये “औटघटकेची राणी” व्हायला तयार नसल्याचे स्पष्ट करून मोकळ्या झाल्या आहेत. all depends on the Congress high command. This is the prerogative of the high command.
आणि बरोबरच आहे ना…!! साडेचार वर्षानंतर जर काँग्रेस श्रेष्ठी मुख्यमंत्री बदलत असतील तर उरलेल्या सहा महिन्यांत नवा मुख्यमंत्री असा कोणता तीर मारणार आहे की ज्यामुळे काँग्रेस विधानसभा निवडणूक जिंकू शकेल…??!! म्हणजे काँग्रेसचा आत्ताच्या कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या माथ्यावर पराभवाचे खापर फुटणार हे उघड आहे.
Punjab | It all depends on the Congress high command. This is the prerogative of the high command. CLP meeting was held yesterday and a mandate has been given. There is no need for another meeting of the CLP: Congress MLA Pargat Singh, in Chandigarh pic.twitter.com/gkwWPTShAr — ANI (@ANI) September 19, 2021
Punjab | It all depends on the Congress high command. This is the prerogative of the high command. CLP meeting was held yesterday and a mandate has been given. There is no need for another meeting of the CLP: Congress MLA Pargat Singh, in Chandigarh pic.twitter.com/gkwWPTShAr
— ANI (@ANI) September 19, 2021
अशा स्थितीत 78 वर्षांच्या अंबिका सोनी यांनी राजकारणातील अनुभव लक्षात घेऊन मुख्यमंत्रीपद नाकारले असेल तर ते राजकीय दृष्ट्या स्वाभाविकच मानले पाहिजे. कोणता सुज्ञ राजकीय नेता आपल्या कारकिर्दीची अखेर पराभवातून स्वीकारेल…?? आधीच कॅप्टन अमरिंदरसिंग यांना वयाच्या 79 व्या वर्षी अपमानित होऊन सत्तेवरून पायउतार व्हायला लागले आहे. अशा स्थितीत त्यांच्यापेक्षा फक्त एक वर्षांनी वयाने लहान असणाऱ्या अंबिका सोनी यांची राजकीय प्रगल्भता तर निश्चित एवढी आहे की त्यांना हे समजते की आपण सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्रीपद स्वीकारून काँग्रेस श्रेष्ठींच्या समाधान होईल, पण आपल्या कारकिर्दीची अखेर पराभवाने नोंदली जाईल. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर ताबडतोब नाकारली आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग यांना हटविण्याची काँग्रेस श्रेष्ठींना घाई झाली झाली होती. पण त्यांच्याकडे “प्लॅन बी” तयार नाही हे आता स्पष्ट होत आहे.
शिवाय कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या “पाकिस्तान कनेक्शन” विषयी बोलून मोठी राजकीय मेख मारून ठेवली आहे. सिद्धूंना मुख्यमंत्री केले तर त्यांच्यावरचा पाकिस्तान धार्जिण्या नेतृत्वाचा ठपका पुसता पुसता कॉंग्रेस श्रेष्ठींच्या नाकी नऊ येतील. अकाली दल भाजप यांच्याकडून टीकेचा भडीमार होईल तो वेगळाच पण काँग्रेस अंतर्गतच सिद्धूंना पहिल्या दिवसापासून “पाकिस्तान धार्जिणा मुख्यमंत्री” हा ठपका सहन करत काम करावे लागेल. अशा स्थितीत काँग्रेस श्रेष्ठींनी सिद्धू वगळून अन्य नावांचा विचार केला असल्यास तो राजकीय सुज्ञपणा ठरेल. पण अंबिका सोनी यांनी पहिल्यांदाच पहिल्या झटक्यातच मुख्यमंत्रीपद नाकारून एक प्रकारे काँग्रेस श्रेष्ठींनाही झटका दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App