राष्ट्रवादीतले अधोरेखित 2 : गुरुने दिला सत्तारूपी वसा; (मुलीला वगळून) आम्ही चालवू हा पुढे वारसा!!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ असे घमासान सुरू असताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजितदादांच्या कथित बंडाचे जे राजकीय रहस्य उलगडून दाखवले, त्याचे वर्णन, “गुरुने दिला सत्तारूपी वसा; (मुलीला वगळून) आम्ही चालवू हा पुढे वारसा!!”, याच शब्दांत करता येईल.Ajit pawar faction wants power without sharad pawar’s daughter

छगन भुजबळांच्या एमईटीमध्येच अजित पवारांचे शक्तिप्रदर्शनी अधिवेशन आहे. तेथे शरद पवारांचा आदेश धुडकावून अजितदादा समर्थकांनी शरद पवारांची मोठमोठी पोस्टर्स लावलीच आहेत. त्याचे समर्थन अजितदादांचे सर्व समर्थक करत आहेत. अमोल मिटकरींपासून छगन भुजबळापर्यंत सर्वांनी शरद पवारांच्या पोस्टर्स लावण्याचे बिनदिक्कत समर्थनच केले आहे. पण हे समर्थन करताना छगन भुजबळ यांनी जे उद्गार काढले, ते राष्ट्रवादीचे राजकारण अधोरेखित करणारे आहेत.



“शरद पवार आमचे गुरु आहेत. त्या गुरूकडून आम्ही भरपूर काही शिकलो. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आम्ही त्यांना “सत्तेची गुरुदक्षिणा” दिली”, असे वक्तव्य करून छगन भुजबळांनी अजितदादांच्या कथित बंडाच्या रहस्यावरचा पडदा दूर केला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कालच्याच पत्रकार परिषदेत याच अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे पत्रकारांचे लक्ष वेधले होते. अजितदादांच्या बंडात मला तीन संशयास्पद माणसे वाटतात. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांना शरद पवारांचा शब्द डावलून अजितदादांकडे कधीही जाणार नाहीत, हेच राज ठाकरे यांनी उघडपणे सांगितले होते. छगन भुजबळांचे आजचे वक्तव्य आणि कालचे राज ठाकरे यांचे वक्तव्य यांच्यात राजकीय संगती लावली तर राष्ट्रवादीतल्या संघर्षाच्या रहस्याचा उलगडा होतो.

सत्ता अमरपट्टा नव्हे

सत्ता हा राष्ट्रवादी काँग्रेसचा “डीएनए” आहे, असा दावा अनेक पवारनिष्ठ विश्लेषक करतात. पण सत्ता कोणाला अमरपट्टा रूपाने मिळत नसते. ती राजकीय कोलांट उड्या मारून मिळवावी लागते आणि सत्तेच्या वळचणीला जाऊन बसावे लागते, ही राष्ट्रवादीतील वस्तुस्थिती आहे. फक्त या कोलांटउडीचे वर्णन करताना छगन भुजबळांनी “सत्तेची गुरुदक्षिणा” दिली, असे गोड गुलाबी शब्द वापरले आहेत.

सत्तेची वळचण

शरद पवारांनी बहुजन राजकारण करताना कायम आपल्या गुरूंचा वारसा पुढे नेला. सत्तेची वळचण त्या वारशातूनच शोधली आणि आता छगन भुजबळांच्या तसेच अजितदादांच्या रूपाने तिसरी पिढी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेली. ही छगन भुजबळ यांनी केवळ शरद पवार नावाच्या गुरुला दिलेली “गुरुदक्षिणा” नसून ती यशवंतराव चव्हाण नावाच्या परात्पर गुरूला दिलेली देखील “गुरुदक्षिणाच” आहे.

गुरुदक्षिणेचे वैशिष्ट्य

पण या गुरुदक्षिणेतले वेगळे वैशिष्ट्य म्हणजे शरद पवारांनी ज्यावेळी सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीवर लादण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र पवारांचे “गुरुत्व” अजितदादा आणि त्यांच्या समर्थकांनी झुगारून लावले. पवारांकडून पक्ष खेचून घेऊन आपला स्वतंत्र वेगळा मार्ग चोखळला. शरद पवारांचे आशीर्वाद मिळाले, तर ठीकच नाहीतर त्यांची पोस्टर्स लावून तो आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे असे दाखवत राहू, अशा “निर्धाराने” अजितदादा आणि त्यांच्या समर्थकांनी आज शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या शक्तिप्रदर्शनाला जोरदार प्रतिसादही मिळाला आणि त्यातूनच अजितदादा आणि त्यांच्या समर्थकांनी, “गुरुने दिला सत्तारूपी वसा; पण (मुलीला वगळून) आम्ही चालवू हा पुढे वारसा!!, हेच शरद पवारांना दाखवून दिले, हे राष्ट्रवादीतले खरे अधोरेखित आहे!!

Ajit pawar faction wants power without sharad pawar’s daughter

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात