नाशिक : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांमध्ये फटका खाल्ल्यानंतर अजित पवार बनले “मवाळ”; पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत करत आहेत “शांततेत” प्रचार!!, अशी राजकीय घडामोड पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येत आहे. Ajit Pawar
भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढायला लावल्या. या निवडणुकांमध्ये अजित पवारांनी जोरदार प्रचार करत भाजप वरच हल्लाबोल केला. भाजपच्या राज्यस्तरावरच्या नेतृत्वाने अजित पवारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण अजितदादांचा अकरास्ताळेपणा निवळला नाही. मग भाजपने मुरलीधर मोहोळ आणि महेश लांडगे या आपल्या शिलेदारांना अजितदादांवर सोडले. त्यांनी अजितदादांना जशास तशा भाषेत प्रत्युतरे देऊन दोन्ही ठिकाणी चितपट केले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका मध्ये अजित पवारांना 2017 पेक्षा मोठ्या पराभवाला तोंड द्यावे लागले.
– भाजपवर टीका करणे टाळले
त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार मवाळ झालेले दिसले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतंत्रपणे प्रचार केला, पण त्यांनी भाजपच्या दिशेने बोट सुद्धा दाखवलेले आढळले नाही. त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांना भाजप मधून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले. आपला पक्ष मजबूत करायचा प्रयत्न केला. पण त्या कार्यक्रमात त्यांनी भाजपवर जाहीरपणे टीका करणे टाळले. या कार्यक्रमानंतरही अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रचार सभा घेतल्या पण तिथे देखील विकासात्मक कार्यक्रमावर भर दिला.
– बजाज पुणे ग्रँड टूर मध्ये सहभाग
त्यानंतर अजित पवारांनी बजाज पुणे ग्रँड टूर कार्यक्रमात आमिर खान बरोबर सहभाग नोंदविला. या ग्रँड टूर साठी राज्य सरकारने केलेल्या विकास कामांचा प्रचार केला. या कार्यक्रमाद्वारे पुण्याचे ब्रॅण्डिंग करण्याला त्यांनी अग्रक्रम दिला.
– पराभवातून शिकला धडा
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर अजित पवारांनी आपल्या कार्यक्रमांचा ट्रॅकच बदलून टाकला. त्यानंतर आजपर्यंत तरी ते भाजपच्या वाटेला गेल्याचे दिसले नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या पराभवाचा त्यांनी वेळीच धडा घेतल्याचे दिसले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App