चारा झाला, चिक्की झाली, खिचडी झाली “खाऊन”; राऊत म्हणतात, घोटाळा केला सोमय्यांनी टॉयलेट बांधून…!! अशी आज महाराष्ट्रातील किंबहुना देशातली अवस्था आहे. According to Raut, Somaiya committed the scam by constructing a toilet
आतापर्यंत देशात चारा घोटाळा झाला. चिक्की घोटाळा झाला. खिचडी घोटाळा झाला. आता शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढला आहे. हा 100 कोटींचा घोटाळा असल्याचा संजय राऊत यांचा आरोप आहे.
संजय राऊत यांनी आत्तापर्यंत किरीट सोमय्या यांच्यावर विक्रांत घोटाळ्याचा आरोप लावला होता. तसेच त्यांच्या मुलाला त्यांचा मुलगा नील सोमय्या याचे पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा करणाऱ्या वाधवान बरोबर संबंध असल्याचा दावा केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीने 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे, असा आरोप केला आहे. लवकरच या घोटाळ्याची कागदपत्रे आणि पुरावा सादर करू. मग त्यावर किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे देत रहावेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
देशाच्या इतिहासात लालूप्रसाद यादव यांचा चारा घोटाळा गाजला. जनावरांचा चारा खरेदी प्रकरणात सुमारे 400 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर केला. त्याबद्दल त्यांना शिक्षाही झाली. सध्या त्यांची तब्येत खराब असल्याने शिक्षेतून थोडी सूट मिळाली आहे.
त्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारच्या काळात खिचडी घोटाळा गाजला. त्याची चौकशी आणि तपास मध्येच अर्धवट राहिला.
2014 नंतर फडणवीस सरकारच्या काळात ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. त्याच्याही तपासाचा पुढे पत्ता लागला नाही. पण काही झाले तरी हे सगळे घोटाळे “खाण्याचे” होते… संजय राऊत यांनी त्या पलिकडे जाऊन टॉयलेट घोटाळाच बाहेर काढला आहे. आता संजय राऊतांना या विषयावर किरीट सोमय्या नेमके काय उत्तर देतात हे पाहणे इंटरेस्टींग असणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more