बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या झटक्यााबरोबरच मेंदूला बसणारा झटका म्हणजेच ब्रेन स्ट्रोकचे प्रमाणही वाढले आहे. हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक हे दीर्घकाळ परिणाम करणारे विकार आहेत. त्यांची पूर्वसूचना वेळेत मिळाली तर ते टाळणे शक्यर आहे. शास्त्रज्ञांनी आता एक असे उपकरण विकसित केले आहे, की जे ब्रेन स्ट्रोक येण्याआधी स्मार्ट फोनच्या माध्यमातून इशारा देईल. अमेरिकेतील पेन स्टेट आणि ह्यूस्टन मेथॉडिस्ट हॉस्पिटल येथील संशोधकांनी ही प्रणाली विकसित केली आहे. A warning will be given before a brain stroke occurs
स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी चार- पाच तासांच्या आत उपचार होणे गरजेचे आहे. बोलायला आणि समजण्यात अडथळा निर्माण होणे, चेहरा, हात, पाय आदी सुन्न होणे, अंधूक दिसायला लागणे आदी स्ट्रोकपूर्वीची लक्षणे आहेत. या लक्षणांकडे व्यवस्थित लक्ष दिल्यास त्याची पूर्वसूचना मिळू शकते. शास्त्रज्ञांनी अशाच लक्षणांवर लक्ष ठेवणारी प्रणाली विकसित केली आहे. रुग्ण प्रत्येक मिनिटाला स्ट्रोकची लक्षणे अनुभवत असतो तेव्हा त्याचे निदान होणे गरजेचे आहे. कारण नंतर स्ट्रोक आल्यानंतर आपत्कालीन विभागातील डॉक्ट रांना परिस्थिती हाताळणे हाताबाहेर जाते. संशोधकांच्या चमूने माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे एक संयंत्र विकसित केले आहे.
जे पूर्वसूचना तर देतेच, पण त्याचबरोबर जलद निदानही करते. व्यक्तीची बोलण्याची पद्धत, चेहऱ्यावरील हावभाव आणि हालचालींचे अध्ययन करून ही प्रणाली स्ट्रोकचे निदान करते. यामुळे आपत्कालीन स्थितीत डॉक्टनरांना जलद निर्णय घेण्यास मदत होते. तसेच रुग्णालाही हॉस्पिटलला जाण्यापूर्वी आवश्यनक ती खबरदारी घेणे शक्या होते. ब्रेन स्ट्रोकसारख्या आपत्कालीन स्थितीमध्ये प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झाला आहे. शास्त्रज्ञांनी 80 ब्रेन स्ट्रोक रुग्णांच्या माहितीचा वापर केला. त्यांचे बोलणे, हावभाव आणि हालचालींच्या नोंदींचा वापर यात करण्यात आला आहे. प्रत्यक्ष प्रणालीचा वापर करण्यात आला तेव्हा 79 टक्के अचूक निदान केल्याचे सीटी स्कॅनच्या साह्याने सिद्ध करण्यात आले. मेंदूत कोट्यवधी चेतापेशी आहेत. त्यांच्या कार्यात झालेला बिघाड मानवी मेंदूवर मोठा परिणाम करते. माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित ही प्रणाली अशा चेतापेशींच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App