फडणवीसांचे पवारांना प्राथमिक शाळेतले “धडे”; “वासुनाका”कार भाऊ पाध्येंचे वाचा बोल खडे!!


1978 मधल्या महाराष्ट्रातल्या सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जे राजकीय घमासन सुरू आहे, त्यात नॅरेटिव्ह सेटिंग मध्ये एडव्हांटेज फडणवीस अशीच गेम पडली आहे!! 1978 pawar backstabbed vasantdada patil; devendra fadnavis and bhau padhye threw light on it

कारण 1978 मध्ये शरद पवारांनी “मुत्सद्देगिरी” करून वसंतदादांचे सरकार पाडल्याचा पवारनिष्ठ नॅरेटिव्ह निष्ठावंत माध्यमांनी सेट केला आहे, तो फडणवीसांनी उधळला आहे. बाकी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातले वाक्युद्ध मागच्या पानावरून पुढे चालतही राहील. पण फडणवीसांनी पवारांना महाराष्ट्राच्या खऱ्या राजकीय इतिहासाच्या पानातून दिलेले आव्हान मात्र विसरता येणार नाही!!

ही तो श्रींची इच्छा!!

देवेंद्र फडणवीसंनी 1978 चा पवारांचा खरा इतिहासच सांगितला. काँग्रेस मधून निवडून आलेल्या शरद पवारांनी काँग्रेसचेच 40 आमदार फोडून वसंतदादांचे सरकार पाडले आणि त्यावेळच्या जनसंघा बरोबर सरकार स्थापन केले, ती “मुत्सद्देगिरी” असल्याचे वर्णन त्या वेळचे महाराष्ट्र टाइम्स संपादक गोविंद तळवळकर यांनी “ही तो श्रींची इच्छा” असा अग्रलेख लिहून केले होते. याचा अर्थ पवारांच्या त्या “मुत्सद्देगिरीला” यशवंतराव चव्हाण यांचा पाठिंबा असल्याचा त्या अग्रलेखात तळवळकरांनी दावा केला होता.

भाऊ पाध्येंची पिचकारी

पण त्यावेळी नेमके काय घडले??, या संदर्भातला एक लेख त्यावेळचे प्रसिद्ध पत्रकार “वासूनाका”कार भाऊ पाध्ये यांनी लिहिला आहे. तो त्यांच्या “पिचकारी” या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे. यशवंतरावांचा पवारांच्या “मुत्सद्देगिरीला” पाठिंबा होता. इतकेच नाही तर त्यांना दुसरा पर्यायच नव्हता. तसे केले नसते तर यशवंतराव आणि त्यांची काँग्रेस त्यावेळी महाराष्ट्रात एकाकी पडली असती. शरद पवारांनाही बंड करणे आणि जनता पक्षाबरोबर युती करणे भागच होते. त्यांनाही दुसरा मार्गच उरला नव्हता. यशवंतरावांच्या बोलण्यावरूनही त्यांना शरद पवारांची भूमिका पटली होती. “जानवेवाल्या” जनता पक्षात त्यांना पुरोगामी प्रवृत्ती दिसू लागल्या होता. याचा अर्थच त्यांनी मनोमन जनता पक्षाची बाजू घेतल्यासारखीच होती. फक्त ते “चड्डी काँग्रेस”चे पक्षाध्यक्ष असल्यामुळे अडचण झाली म्हणून ते शरद पवारांना उघड आशीर्वाद देऊ शकले नसावेत, अशी पोलखोल भाऊ पाध्ये यांनी “पिचकारी”त केली आहे. (चव्हाण + रेड्डी काँग्रेस म्हणून लोक त्यांना चव्हाणातला “च” आणि रेड्डीतला “ड्डी” म्हणून “चड्डी काँग्रेस” म्हणत.)

पवारांचे वक्तव्य

आपण 1978 मध्ये सरकार बनवताना भाजपबरोबर सरकार बनवले, त्यावेळी फडणवीस प्राथमिक शाळेत होते. त्यामुळे त्यांना त्याची माहिती नसेल, असे वक्तव्य करून पवारांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली होती. पण फडणवीस त्या खिल्लीला बधले नाहीत. उलट त्यांनी पवारांना प्रत्युत्तर देताना आपण प्राथमिक शाळेत होतो की जन्मालाच यायचे होतो, यामुळे इतिहास बदलत नाही. तो तसाच राहतो. पवार काँग्रेस मधून निवडून आले. त्यांनी 1978 मध्ये वसंतदादांचे सरकार पाडले आणि भाजपबरोबर म्हणजे त्या वेळच्या जनसंघाबरोबर सरकार बनवले, हेच आपण सांगितल्याचे फडणवीस म्हणाले… आणि ती ती जर पवारांची “मुत्सद्देगिरी” असेल, तर एकनाथ शिंदे यांनी भाजप बरोबर निवडून येऊन मेरीटवर सरकार बनवले असेल तर ती “गद्दारी” कशी??, या प्रश्नाचे उत्तर पवारांनी देणे टाळले. कारण ते त्यांना गैरसोयीचे होते, असे खणखणीत प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले. फडणवीसांच्या या वर्मावर बोट ठेवणाऱ्या उत्तरातूनच उत्तरातूनच पवारनिष्ठ माध्यमांच्या नॅरेटिव्हला छेद गेला आहे.

पवारनिष्ठ नॅरेटिव्हला धक्का

कारण त्यावेळच्या गोविंद तळवळकरांपासून आत्ताच्या अनेक मराठी माध्यमांपर्यंत पवार “चाणक्य” आहेत, पवारांची “पॉवरफुल खेळी” वगैरे भलामणी भाषा माध्यमे वापरतात. पण त्या मागचा खरा इतिहास, जो त्यावेळच्या बाकीच्या पत्रकारांनी लिहून ठेवला आहे, तो मात्र दडवून ठेवतात. फडणवीसांच्या खणखणीत प्रत्युत्तरातून हा इतिहास पुन्हा समोर आला आहे. पवारांच्या सोयीच्या मराठी माध्यमांच्या पवारनिष्ठ नॅरेटिव्हला फडणवीस यांनी धक्का दिला आहे, ही यातली वस्तुस्थिती आहे!!

https://youtu.be/-trh4YYyBcE

1978 pawar backstabbed vasantdada patil; devendra fadnavis and bhau padhye threw light on it

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात