शिवसेनेला “पॉलिसी पॅरालिसीस”; आमदार – खासदारांच्या खदखदीचा लाव्हा रोखणार तरी कोण…??

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राजकारणाची शैली जरी भिन्न असली तरी त्यांच्या एका राजकीय कृतीत मात्र विलक्षण साम्य दिसते आहे, ते “कही पे निगाहे कही पे निशाना”, या हिंदी गीताच्या ओळीतून स्पष्ट करता येईल.Shiv Sena leadership facing policy paralysis

ममता बॅनर्जी या नेहमी केंद्र सरकारवर आणि विशेषतः भाजपवर तोफ डागत असतात पण प्रत्यक्षात मात्र त्या छोट्या राज्यांमध्ये घुसून काँग्रेस पक्ष फोडताना दिसतात. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, गोवा, दिल्ली, हरियाणा या राज्यांमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्ष पोखरला आहे. त्यांचा तोंडी हल्ला भाजपच्या नेत्यांवर कायम राहिला आहे. पण संघटनात्मक पातळीवर परिणाम काँग्रेसला भोगायला लागले आहेत.



त्यामुळे एक प्रकारे ममता बॅनर्जी यांचा राजकीय व्यवहाराच्या पातळीवर तृणमूल काँग्रेस बळकट करण्यासाठी मोठा फायदा झाला आहे आणि भाजपला देखील वार करण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या रूपाने बंगालमध्ये मोठे सावजही सापडले आहे. बंगालमध्ये ममता विरुद्ध भाजप या लढाईत एवढी घमासान झाली की त्यात एके काळी प्रबळ असलेले डावे पक्ष आणि काँग्रेस दोघेही अक्षरशः आरोही भुईसपाट झाले. संघटनात्मक आणि विधिमंडळात त्यांची अवस्था शून्य झाली.

जे ममता बॅनर्जी यांचे तसेच काहीसे महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे. फक्त फरक आहे, की ममता बॅनर्जी काँग्रेस फोडून स्वतःची तृणमूल काँग्रेस संघटनात्मक पातळीवर बळकट करताना दिसतात तर उद्धव ठाकरे हे ममतांच्या पावलावर पाऊल टाकून भाजपवर तोफा डागताना दिसतात, पण प्रत्यक्षात त्यांची शिवसेना मात्र पोखरत चाललेली दिसते. शिवसेनेतल्या सध्याच्याखदखदीचा कानोसा घेतला तर, किंबहुना तसा कानोसा घ्यायची गरजही नाही.

कारण ती खदखद आता मोठ्या लाव्हाच्या रूपात बाहेर पडली आहे. शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांची आणि खासदारांची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विरोधात आहे. त्यातही संघटनात्मक पातळीवर मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या विभागांमध्ये शिवसेनेचे भांडण आणि संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र भाजपला वारंवार टार्गेट करताना दिसत आहेत.

शिवसेनेच्या आमदार-खासदारांनी एकदा दोनदा, तीनदा नव्हे तर अनेकदा जाहीरपणे आपला जमिनीवरचा शत्रू भाजप नव्हे राष्ट्रवादी आहे हे शिवसेना नेतृत्वाच्या कानीकपाळी ओरडून झाले आहे. पत्रे लिहून त्यांचे हात दुखून आले आहेत, पण तरीही उद्धव ठाकरे हे हेका न सोडता राष्ट्रवादीच्या आक्रमकतेला वेसण घालण्याऐवजी भाजप वरच बाण सोडताना दिसत आहेत.

गेल्या दोन वर्षात शिवसेनेच्या किमान १० ते १२ आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार निधी वाटपात शिवसेनेशी दुजाभाव करतात, असे मुख्यमंत्र्यांना अनेकदा सांगितले आहे पण त्यावर कोणतीही उपाययोजना न करता उद्धव ठाकरे भाजपलाच आपल्या टार्गेटवर घेताना दिसत आहेत. रामदास कदम असतील, खासदार हेमंत पाटील असतील, त्या आधी माजी खासदार अनंत गीते असतील या सर्वांनी उघडपणे राष्ट्रवादी कशा पद्धतीने शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर त्रास देते हे सांगितले आहे पण त्याच्यावर उद्धव ठाकरे कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाहीत.

उलट सर्वात महाविकास आघाडीतला सर्वात मोठा पक्ष असूनही ते शिवसेनेची राष्ट्रवादीकडून ते मुक्तपणे फरफट होऊन देत आहेत. या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसैनिकांना जेवढी शिवसेनेची चिंता वाटते आहे, त्याच्या एक दशांश देखील चिंता उद्धव ठाकरे यांना वाटत नाही ही खऱ्या अर्थाने चिंतेची बाब आहे…!!

ममता बॅनर्जी निदान भाजपवर तोंडी तोफा डागून आपल्या तृणमूल काँग्रेसला तरी बळकट करताना दिसत आहेत, पण उद्धव ठाकरे हे भाजपवर फक्त तोंडी तोफा डागत आहेत, प्रत्यक्षात शिवसेना पोखरली जाते आहे आणि त्यावर मात्र कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाहीत. शिवसैनिकांच्या दृष्टीने हा सर्वात मोठा आव्हानाचा विषय आहे.

२०१२ मध्ये मीडियाने केंद्रातल्या यूपीए सरकारचे वर्णन “धोरण लकवा” भरलेले सरकार म्हणजे “पॉलिसी पॅरालिसीस” या भाषेत केले होते. आज शिवसेनेमध्ये संघटनात्मक पातळीवर याच स्वरूपाचे “पॉलिसी पॅरालिसीस”चे दुखणे जडले आहे. संघटना प्रत्यक्षात राष्ट्रवादी पोखरते आहे. निधीच्या पातळीवर शिवसेनेची फरपट राष्ट्रवादी करते आहे. आणि मुख्यमंत्री मात्र भाजपला खरी संधी असो वा नसो स्वत:ला हवे तसे ठोकून काढत आहेत.

शिवसेनेसाठी हे काही चांगले लक्षण नाही. शिवसैनिक रामदास कदम यांच्यासारख्या नेत्याचा गुस्सा अनिल परबांवर फुटला असला तरी संघटनात्मक पातळीवरची आमदार – खासदारांची खदखद लाव्हाच्या रूपाने बाहेर आली आहे आणि तिची दखल घ्यायला मात्र शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेळ नसल्याचे दिसत आहे…!!

Shiv Sena leadership facing policy paralysis

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात