एकेकाळी बिमारू राज्य अशी ओळख असलेल्या मध्य प्रदेशावरील मागासलेपणाचा शिक्का पुसून टाकून विकासाच्या मार्गावर नेणारे शिवराजसिंह चौहान यांनी पुन्हा एकदा मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे.चौथ्यांदा मुख्यमंत्री बनलेले चौहान यांची २००५ मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी बिजली, सडक आणि पाणी हे तीनच मध्य प्रदेशचे मुख्य प्रश्न होते. मात्र,चौहान यांनी आपल्या विकासात्मक राजकारणाने मध्य प्रदेशचा चेहरा बदलून टाकला. आज देशातील गव्हाचे कोठार म्हणून मध्य प्रदेशची ओळख आहे. विकासाभिमुख राजकारणाचे पाईक अशी चौहान यांचीओळख बनली आहे. मध्य प्रदेशातील २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. का‘ंग्रेसला केवळ ४ जागा जास्त मिळाल्या. मतांच्या टक्केवारीत तर भाजपा पुढे होता. मात्र, तरीही भारतीय जनता पक्षाने जनादेश मान्य केला. गेल्या वर्षभरापासून कमलनाथ यांचे सरकार या ठिकाणी होते. या सरकारकडून सुरूवातीला अपेक्षा होत्या. परंतु, कमलनाथ यांनी कॉँग्रेस संस्कृतीतील दरबारी राजकारणच पुढे चालू ठेवल्याने ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉँग्रेसचा त्याग केला. त्यामुळे अल्पमतात आलेल्या कमलनाथ यांनार राजीनामा द्यावा लागला. साधेपणा आणि सच्छिल विचारसरणीसाठी शिवराजसिंह चौहान प्रसिध्द आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवराजसिंह यांनी जनमानसातील नेता आपली ओळख तयार केली आहे. शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असताना पुण्यात एके ठिकाणी त्यांना भेटण्याचा प्रस्तुत लेखकाला योग आला. मध्य प्रदेशातील पर्यटनक्षेत्र वाढीसाठी चौहान यांनी प्रयत्न सुरू केले होते. याचाच एक भाग म्हणून ते पुण्यात आले होते. त्यांना भेटण्यासाठ हॉटेलमध्ये गेलो तेव्हा कोणताही जामनिमा नव्हता. बडेजाव नव्हता. आपल्याकडील् आमदाराचाही भपका मोठा असतो. परंतु, मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे कोणताही दिखावूपणा नव्हता. परंतु, आपल्या उदद्देशाबाबत तळमळ होती. मध्य प्रदेशची अत्यंत नेमक्या शब्दांत त्यांनी ओळख सांगितली. पर्यटनदृष्टया महत्व सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App