पवारांची हवा काढण्याची क्षमता काँग्रेसवाल्यांकडेच; भाजपच्या नेत्यांचा तो घासच नाही…!!

विनय झोडगे

महाराष्ट्रातल्या कालच्या आणि आजच्या घडामोडींमध्ये शरद पवारांनी जे राजकीय बाण मारून घेतले त्यामध्ये…

  • राज्य सरकार स्थिर आहे ते… आपल्यामुळे. हे न बोलता ते सांगून मोकळे झाले. ते पत्रकारांशी बोलले नाहीत. ते ट्विट करत राहिले आणि वाहिन्यांनी ते उचलले. या निमित्ताने त्यांनी चर्चेच्या केंद्रस्थानी येण्याची हौस भागवून घेतली.
  • वाहिन्यांच्या दुपार, संध्याकाळच्या चर्चांची pawar narratives मधून प्रश्नोत्तरे झाली. त्याला नि:पक्षतेची झालरही लावली गेली. पण कुठेही राज्यपाल – पवार आणि पवार – उद्धव यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याचा ताकास तूर वाहिन्यांना लागला नाही आणि वाहिन्यांनी देखील pawar narratives च्या चर्चांमधून तो लागू दिला नाही.
  • दरम्यानच्या काळात नारायण राणे यांनी मागणी केलेल्या राष्ट्रपती राजवटीवरून चर्चा झाली आणि भाजपच्या नेत्यांनी अकारण स्पष्टीकरणे देत self goal करवून घेतला. वास्तविक पाहता नारायण राणे यांनी मांडलेल्या मुद्द्यांमधून उद्धव – पवार सरकारचे अपयश ठळकपणे समोर येत होते. पण आधी सुधीर मुनगंटीवार आणि नंतर देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते राणे यांचे मुद्दे बरोबर आहेत हे सांगण्यावर भर देण्याएेवजी राष्ट्रपती राजवटीच्या मागणीस पाठिंबा नाही, हे सांगत राहिले. वाहिन्या तेवढेच उचलून भाजपमधील मतभेदांचा फाळका दाखवत बसल्या.

  • देवेंद्र फडणवीसांनी तर पत्रकार परिषदेत economics चा क्लासच घेतला. हरकत नाही. त्यांनी जरूर केंद्राने महाराष्ट्राला केलेली मदत सांगावी. पण त्यापुढे जाऊन करण्याच्या राजकीय खेळ्यांचे काय करायचे? उद्धव ठाकरे आणि पवारांनी चोरलेले बहुमत सतत expose कोणी करत राहायचे? का बहुमत चोरलेले सरकार स्थिर करत बसायचे? सरकार त्यांच्यातीलच मतभेदांनी कोसळेल, असे फडणवीस म्हणाले. मग विरोधी पक्ष काय करताहेत? मूळात भाजपकडे १०५ आमदार असताना विरोधी पक्ष हा narrative भाजप एेकूनच कसा घेऊ शकतो? सरकार स्थिर ठेवण्याची जबाबदारी काय भाजपची आहे? पण वाहिन्या आपल्या प्रश्नांमधून भाजप उद्धव सरकार अस्थिर करत असल्याच्या बातम्या पेरत राहतात आणि फडणवीसांसकट भाजपचे नेते explaination च्या mode मध्ये जातात. काय गरज आहे, त्यांनी explaination mode मध्ये जाण्याची?
  • पवार जातात का कधी explanation mode मध्ये? ते सगळे राजकारण करतात. पण वाहिन्या त्यांना नाही कधी उलट – सुलट प्रश्न विचारत. आणि कोणी तसा प्रश्न विचारलाच तर पवार त्या पत्रकारालाच असभ्य आणि असंस्कृत ठरवून मोकळे होतात.
  • फडणवीस मात्र पत्रकार परिषदेत economics चा क्लास घेत बसतात. का पवारांना आणि उद्धव यांना माहिती नाही का, केंद्राने किती पैसे दिले ते? ते खोटं बोलतात ना. मग त्यांना आक्रमकपणे उत्तरे देऊन नामोहरम करायचे की economics चा क्लास घेऊन त्यांना उत्तरे देत बसायचे? फडणवीस हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत की देशाचे विद्यमान अर्थमंत्री? की त्यांनी एवढी आकडेवारी पत्रकारांना समजावून सांगावी? आणि ही आकडेवारी समजून घेऊन पत्रकारांनी वाहिन्यांच्या हेडलाइन चालवल्या का? पाच वर्षे कार्यक्षम मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांना हे समजत नाही काय? फडणवीसांनी महाराष्ट्रात उद्धव – पवार जोडगोळी विरुद्ध रान पेटवायला पाहिजे होते.
  • काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागे फटाके लावू नयेत असे फडणवीस शेवटी म्हणतात. यात राजकीय सूचकता जरूर असते. पण वाहिन्या दाखवतात त्याची हेडलाइन? त्यांनी ते editing मध्ये काढून टाकले. फटाक्यांचे वाक्य फडणवीस बोललेच ना…!! पण ते ठासून का नाही बोलले? झालीच असती ना ती हेडलाइन. फडणवीस ठासून बोलले म्हटल्यावर लाजेकाजेस्तव का होईना करावीच लागली असती ना हेडलाइन. पण… या “पण” वरच घोडं पेंड खातयं
  • पवारांच्या कुटील राजकीय बुद्धीवर आघात करण्याची क्षमता भाजप नेते दाखवत नाहीत. त्यांना वरून – खालून कुठून प्रेशर येतं माहिती नाही. पण या उलट दिल्लीतले काँग्रेस नेते पवारांची हवा काढू शकतात, हे वारंवार सिद्ध झालंय… आजही ते पुन्हा सिद्ध झालयं. राहुल गांधींनी दीड 
  • दोन वाक्यांमध्ये उद्धव – पवार जोडगोळीची हवा काढली. काँग्रेस decision maker नाही, असे सांगून काँग्रेसला फार गृहीत धरू नका, असा इशारा देऊन टाकला. महाराष्ट्राचं सरकार टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसची नाही… हे न बोलता सांगून टाकलयं आणि इथेच पवारांची हवा निघते… भाजपच्या नेत्यांचे “मार्गदर्शक” “गुरू” म्हणून मिरवणारे पवार हे काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांपुढे नांगी टाकतात. पवारांच्या या मर्यादा काँग्रेस नेत्यांना माहिती आहेत. म्हणूनच राहुल गांधींसारखे नेते दीड – दोन वाक्यात त्यांची हवा काढू शकतात.
  • दिवसभरातील घडामोडींचा राजकीय अन्वयार्थ लागतो, तो असा…!!

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात