धर्मांधतेचा व्हायरस

संपूर्ण देशाला कोरोना व्हायरसच्या संकटात लोटलेल्या तबलिगी जमात अमीर मौलाना सादच्या रुपाने धर्मांधतेचा व्हायरसच समाजात पसरतो आहे. देशभरात आज तबलिगी जमातीच्या मरकजमध्ये सामील झालेल्यांचा प्रशासनाकडून शोध घेतला जात असताना मौलाना सादने अत्यंत धर्मांध आणि अवैज्ञानिक वक्तव्ये करून या संकटात भर टाकली आहे.


अभिजीत विश्वनाथ

नवी दिल्ली  : संपूर्ण देशाला कोरोना व्हायरसच्या संकटात लोटलेल्या तबलिगी जमात अमीर मौलाना सादच्या रुपाने धर्मांधतेचा व्हायरसच समाजात पसरतो आहे. देशभरात आज तबलिगी जमातीच्या मरकजमध्ये सामील झालेल्यांचा प्रशासनाकडून शोध घेतला जात असताना मौलाना सादने अत्यंत धर्मांध आणि अवैज्ञानिक वक्तव्ये करून या संकटात भर टाकली आहे.

दिल्लीतील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सामील झालेल्या  अनेकांना कोरोना व्हायरसची लागण झाली. तेलंगणामध्ये पाच जणांना प्राणही गमवावे लागले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना स्वत: मध्यरात्री येऊन या मौलानाच्या नाकदुर्या काढाव्या लागल्या. त्याच्याच कार्यकर्त्यांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. तरीही या मौलानाची विखारी वाणी कमी व्हायला तयार नाही. मौलानाने या भयानक घटनेनंतरही धडा घेतलेला नाही. त्याचा एक व्हिडीओ पुढे आला आहे.

यामध्ये हा मौलाना म्हणतो, कोणतेही संकट आल्यावर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मशीदींकडे पळायला हवे. मशीदींमध्ये जमा झाल्याने आजार होतो ही गैरसमजूत आहे. जर तुम्हाला वाटतच असेल की मशीदींमध्ये आपण एकत्र जमा झाल्यावर मरू तर मरण्यासाठी मशीदीसारखी पवित्र जागा कोणतीही नाही. जर कोणी म्हणत असेल की मशीदी बंद केल्या नाहीत तर साथ आणखी वाढेल तर ही गोष्ट मनातून पहिल्यांदा काढून टाका. उलट लोकांना समजून सांगा की जर मशीदींमध्ये आपण गेला नाही तर आजार आणखी वाढेल. अल्लाहच्या हुकूमाविरुध्द ही गोेट असेल. अल्लाने सांगितले आहे की कोणतेही संकट  आल्यावर मशीदींमध्ये जमा व्हायला हवे. त्यामुळे कितीही भयंकर साथ येऊ देत मशीद बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एका क्लिपमध्ये मौलाना ‘मैं ही अमीर हूॅँ…सबका अमीर…आप नहीं मानते तो भाड में जाईए’ असेही म्हणताना दिसत आहे.

सरकार गर्दी होऊ नये यासाठी सर्वच प्रकारची प्रार्थनास्थळे बंद करत आहेत. मात्र, मशीदींमध्ये एकत्र आल्यावर साथ आणखी वाढेल हे मानायलाच मौलाना साद तयार नाही. मौलानाच्या या विचारधारेमुळे मुस्लिम समाजातील अनेकांच्या प्राणावर बेतले जाण्याची शक्यता आहे. मौलानाच्या या शिकवणीमुळेच देशातील अनेक मशीदींमध्ये जमातच्या लोकांनी पोलीसांवर हल्ले केले. त्यांचे प्राण वाचविण्यासाठी देवदूत बनून आलेल्या पोलीसांवर यातील काही जण थुंकलेही.
मुस्लिम समाजासाठी एक धोका बनलेला हा मौलाना स्वत:ला तबलिगी जमातचा अमीर म्हणवून घेतो. मात्र, मुस्लिम समाजातीलच दारूल उलूम देवबंदने फतवा काढून मौलाना साद याला इस्लामविरोधी घोषित केले होते. याचे कारण म्हणजे २०१७ मध्ये मौलानाने भोपाळ येथील संमेलनात मुक्ताफळे उधळली होती. मक्का आणि मदीना यांच्यानंतर मुस्लिम धर्मीयांसाठी निझामुद्दीनचे मरकझ हे सर्वात पवित्र स्थळ आहे. मौलाना साद इस्मलामचा चुकीचा अर्थ लोकांना सांगतो असाही दारूल उलूम देवबंदचा आरोप आहे.

जगातील तबलिकी मरकजचे मुख्यालय दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आहे.  १ मार्चपासून येथे कार्यक्रम सुरू होते. जगभरातून मौलवी येत होते. सुमारे  १,५०० जणांचे वास्तव्य १ मार्चपासून होते. पुढचे पंधरा दिवस येथे लोक येतच होते. पंधरा दिवसांमध्ये याठिकाणी १५ हजारांपेक्षा जास्त लोक जमले होते. मात्र, येथून तेलंगणाला गेलेल्यांपैकी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह होऊन मृत्यूमुखी पडल्यावर  मरकज हे कोरोनाचे केंद्र बनल्याचे दिसून आले. मात्र,  तरीही मरकजचे प्रमुख मौलाना साद  मशीदीमध्ये राहत असलेल्यांना  क्वारंटाईनसाठी पाठविण्यास तयार नव्हते.

स्वत:ला तबलिगी जमातीचा अमीर म्हणवून घेणार्या मौलाना सादकडे ही सूत्रे वंशपरंपरेने आली आहे. त्याचा जन्म १० मे १९६५ रोजी दिल्लीमध्ये झाला. मौलानाचे पणजोबा इलियास कांधलवी यांनी दिल्लीतील बंगलावाली मशीदीमध्ये तबलिगी जमातची स्थापना केली होती. ते उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील होते. त्यांच्या चौथ्या पिढीतील मौलाना साद आहे. साद यांनी हजरत निजामुद्दीन मरकज येथीलच  मदरसा काशिफुल उलूम से 1987 में आलिमची पदवी घेतली. तबलिगी जमातचे स्वयंघोषित अमीर बनल्यावर अनेक वरिष्ठ धर्मगुरूंनी त्यांचा कडवा विरोधही केला होता.
साद यांनी आपले पद कायम ठेवण्यासाठी अनेक वेळा हिसेंचाही आधार घेतला आहे. २०१६ मध्ये मौलाना साद आणि मौलाना मोह्ममद जुहैरूल हसन यांच्या गटामध्ये अमीर पदावरून हिसांचार झाला होता. दोन्ही गट आमने-सामने आले होते. दगडफेकीत दोन्ही बाजुचे अनेक जण जखी झाले होते. त्यानंतर अनेक धर्मगुरू तबलिगी जमातपासून बाजुला झाले.

त्यानंतर निजामुद्दीमधील इमारत तबलिगी जमातीचे मुख्यालय म्हणून ओळखली जाऊ लागली. तबलीघी जमातीशी संबंधित लोक संपूर्ण जगात इस्लाम धमार्चा प्रचार आणि प्रसार करतात. १०, २०, ३० किंवा त्याहून अधिक संख्या असेलली व्यक्तींचे गट निझामुद्दीनमध्ये येतात. त्यानंतर येथून हे गट देशाच्या विविध भागांमध्ये जातात. जेथे जेथे ते जातात तेथील मशिंदींमध्ये हे गट थांबतात. तेथे हे गट स्थानिक लोकांना नमाज पढणे आणि इस्लाम धमार्तील इतर शिकवणींचे पालन करण्याची विनंती करतात.

मात्र, दर वर्षी प्रशिक्षणासाठी संपूर्ण देशातून मोठ्या संख्येने लोक येथे येत असतात. दर शुक्रवारी त्यांच्या बैठकांचे आयोजन होते. महिन्याच्या एका शुक्रवारी मोठी सभा होते. एका  या मासिक बैठकीला सुमारे २ ते ३ हजार लोक उपस्थित असतात. यांपैकी बहुतेक तेथेच राहतात. सरकारकडून सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन केले जात असताना येथील हजार ते दीड हजार लोक त्याचे अजितबात पालन करत नव्हते. एकमेंकांच्या गळाभेटी घेणे, एकाच ताटात जेवण करणे हे त्यांचे चालूच होते.

१ मार्चपासून सुरू झालेल्या मरकझसाठी सुमारे पंधरा हजाराहून अधिक लोक आले  होते. यापैकी परदेशातून हजारांवर आले होते. त्यापैकी कोणीतरी कोरोना व्हायरस येथे आणला. त्यामुळे अनेकांना कोरोना व्हायरसची बाधा झाली. मरकझ संपल्यावर सगळे देशभर वेगवेगळ्या ठिकाणी गेले. त्यातील अनेक जण आता बाधित असून काही जणांचा मृत्यूही झाला आहे. या वेळी एका जबाबदार नेत्याच्या भूमिकेतून मौलाना सादने या लोकांना आवाहन करायला हवे होते. मात्र, ते सोडून मशीदींमध्ये जाऊन कोणाला रोग होत नाही, अशी मुक्ताफळे उधळून धर्मांधतेचा कोरोना संपूर्ण देशात या मौलाना सादकडून पसरविला जात आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात