रस्ते, रेल्वे पुल, घरे, पायाभूत सुविधा उभारणीत बिल्डर कम्युनिटीने योगदान करावे असा पैगाम नितीन गडकरींनी दिला आहे. बिल्डर कम्युनिटीला नव्या व्यवसायिक pattern ची दिशा ते दाखवत आहेत. कोविड १९ नंतरची अर्थव्यवस्था रूळावर आणण्यास गडकरींच्या सूचना आणि नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.
विनय झोडगे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी active mode मध्ये आले आहेत. याचा अर्थ ते आधी inactive होते असा नाही तर कोविड १९ च्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर ते active mode मध्ये आले आहेत, हे शुभ संकेत घेऊन आले आहेत.
गडकरींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा सुरू करण्यासंदर्भात महत्त्वाचे आणि practical भाष्य केले आहे. देशातील बिल्डर कम्युनिटीला उद्देश्यून त्यांनी काही मूलभूत बदलाची नांदी सांगणारे सल्ले दिले आहेत. ते गांभीर्याने घेण्याची खरी गरज आहे.
देशातील रस्ते, रेल्वेपुल, घरे आणि अन्य सुविधा बांधण्यासाठी १५ लाख कोटी रुपये खर्चाची योजना तयार आहे. बिल्डर कम्युनिटीने यात सहभागी व्हावे. व्यवसायाचा नवा pattern स्वीकारावा, असे त्यांनी सांगितले आहे.
देशावर कोणतेही आर्थिक संकट कोसळले की packages मागणे सुरू होते, या package demanding economy च्या पलिकडे जाऊन गडकरींच्या सल्ल्याकडे पाहण्याची गरज आहे.
असे काय भाष्य केले आहे, गडकरींनी? ते म्हणताहेत, की बिल्डरांनी बांधलेली घरे येतील त्या किमतीत विकून टाकावीत. भविष्यात खूप मोठा फायदा होईल, या आशेवर आता राहू नये. कारण आता बिल्डर व्यवसायाचा pattern च बदलेल. कमी नफ्यातच यापुढे व्यवसाय करावा लागेल. बिल्डर कम्युनिटी हे वास्तव जेवढे लवकर समजून घेईल तेवढे चांगले…!! विशेषत: महानगरांमधील मोठ्या बिल्डरांनी हे वास्तव समजून घेतले पाहिजे, असे परखड मतच गडकरींनी व्यक्त केले आहे.
गडकरी बोलतात त्याला राजकीय संदर्भ नसतोच, असे म्हणण्यात मतलब नाही कारण ते राजकारणी आहेत. पण ते समोरच्याला अनेकदा लख्ख आरसा दाखवतात हे मात्र नक्की. असाच भविष्यातील व्यवसायाचा आरसा त्यांनी बिल्डर कम्युनिटीला दाखवला आहे.
गडकरींची दुसरी सूचनाही तितकीच विचार करायला लावणारी आहे. बिल्डर कम्युनिटीने आता मोठ्या शहरांमधील व्यवसाय तालुका स्तरावर आणि ग्रामीण भागाकडे वळविला पाहिजे. तेथे वित्त पुरवठा स्वत:च उभा करून परवडतील अशी घरे बांधली पाहिजेत, अशी त्यांची सूचना आहे. मरगळलेल्या बिल्डर व्यवसायाला संजीवनी देणारी ही सूचना ठरू शकते. कारण गरज आणि व्यवसाय यांची सांगड घालणारी ही सूचना आहे.
गडकरींची पुढची सूचना सर्वात गंभीर आहे, ती म्हणजे बिल्डर कम्युनिटीने आता व्यवसायाचा नवा pattern स्वीकारावा असे त्यांचे सांगणे आहे. देशातील पायाभूत सुविधांच्या उभारणीत त्यांनी पुढे यावे. आपली स्वत:ची वित्त व्यवस्था उभी करावी. बँकांवर यापुढे अवलंबून राहू नये. कारण यापुढील काळात बँकांची वित्त पुरवठा करण्याची परिस्थिती आधीसारखी राहीलच असे नाही, अशी स्पष्ट मांडणी गडकरींनी केली आहे. बिल्डर कम्युनिटीसाठी डोळ्यात अंजन घालणारी ही मांडणी आहे.
बिल्डर कम्युनिटी जेवढ्या लवकर आणि जेवढ्या प्रमाणात वरील बदल स्वीकारेल ना, तेवढी कोविड १९ नंतरची नवी अर्थव्यवस्था नव्या रूळावर येण्यास सुरवात होईल, असे वाटते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App