कोरोनाः डर के आगे जीत है…

जगातील अनेक प्रदेशात अत्यंत विपरित नैसर्गिक परिस्थितीत लोक आनंदाने राहतात. आत्यंतिक थंडी अगदी उणे चाळीस तापमानातही लोक राहतात. तेथील मुले शाळेतही जातात. या संक्रमणाच्या विपरित काळात योग्यप्रकारे काळजी घेतली तर आपण सर्व भारतीय निश्चयपूर्वक या कोरोनाच्या संकटाला सहजपणे सामोरे जाऊ शकतो….

कोरोना व्हायरस कोविड19 अनेकानेक बातम्या टीव्ही़ वृत्तपत्रे़ सोशल मिडियावर रोजच्या रोज काय अगदी प्रत्येक मिनिटाला आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. याबातम्या आपल्या माहितीत़ भितीत आणि गोंधळातही भर घालत आहेत. काहीजण मात्र अगदीच अज्ञानात आनंदी आहेत आणि तेच विनाकारण रस्त्यावरही फिरतांना दिसत आहेत. आज आपण अपवादावर बोलायला नको. त्यांची काळजी सरकार करतेच आहे. आजपासून काही कृषी संबंधित खाजगी कार्यालये़ कंपन्या सुरू झाल्या आहेत. इतर ठिकाणीही सुरू होतील. अडीच तीन महिन्यांवर पेरण्या आल्या आहेत. बी बियाणे वगैरेची तयारी आत्तापासून करायला हवी. चीनच्या वुहानपासून सुरू झालेली कोरोनाची लागण आपल्यातील प्रत्येकाच्या आतपर्यत भितीच्या रूपात का होईना पण जाऊन दडून बसली आहे. इटली़ स्पेऩ अमेरिकेतील मृतांचे व लागण झालेले आकडे आपले बीपीचे आकडे वाढवत आहेत. वास्तविक पाहता हे अतीसंक्रमित देश विकसित देश आहेत. तेथील आरोग्य सेवा जागतिक दर्जाच्या व तेथील लोकसंख्येला पूरक अशाच आहेत. सगळेच लोक एकाच दिवशी रस्त्यावर उतरले तर रस्त्यावर गाड्या काय पायी चालणेही शक्य होणार नाही. तसेच काही इटलीत़ स्पेनमध्ये घडत आहे व लवकरच अमेरिकेत ही घडेल. आपल्याकडे अनेकांना टेस्ट पॉझिटिव्ह येऊनही साधी लक्षणेही दिसली नाहीत तर अनेकांना खूपच कमी लक्षणे आहेत. असो. मुळात आपल्या देशात तरूणांची संख्या खूप आहे. इटलीमध्ये मृतांपैकी 91.2 टक्के रूग्ण 80 वर्षांपेक्षा अधिक वयाचे मधुमेह़ उच्चरक्तदाब इत्यादि आजार असलेले होते. याचा अर्थच असा की ज्यांच्या शरीरात वयोमानानुसार डीजेनेरेटिव्ह आजार निर्माण झालेले आहेत त्यांना कोरोनाचे संक्रमण झाल्यास ते अतीउग्र रूप धारण करते.कारण त्यांची प्रतिकार शक्ती़ आंतरिक शक्ती कमी झालेली असते. तरूणांना त्यामानानेही अवस्था बरीच अलीकडील म्हणजे सहजपणे बरे होण्याच्या बाजूची आहे.
अमेरिकेत मात्र मृतांमध्ये तरूणांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे परंतु यातील बहुतांशी तरूणांना मधुमेह आदी आजार होते. कोरोनाचे आणि मधुमेहाचे अधिक सख्य असल्याचे जाणवते. थोडक्यात काय तर मधुमेहींनी अधिक काळजी घ्यायला हवी अगदी तरूण असले तरीही. ज्यांना रोजच्या रोज़ कोणत्याही प्रकारची औषधी़ अनेक महिन्यांपासून चालू असतील मग ती मधुमेहाची़ रक्तदाबाची़ हृदयरोगाची़ रक्तपातळ करणारी वा कर्करोगाची असो त्यांनी अती सुरक्षित झोनमध्ये म्हणजेच आपल्या घरातच रहावे. घरातून कोणीही घरगुती सामान आणण्यासाठी बाहेर जात असेल तर त्या व्यक्तीपासून दूर सुरक्षित अंतरावर रहावे. घरात अशाव्यक्तींना वेगळी स्वतंत्र जागा द्यावी जेणेकरून त्यांना कोणत्याही मार्गाने संक्रमण होणार नाही. कारण अशांना अतीदक्षतेची गरज पडू शकते़ ज्याची संख्या सगळीकडेच खूप कमी आहे. सामान आणर्णाया व्यक्तिला़ आणलेल्या साम़ानाला घरात कसे घ्यावे आणि अतिमतः कसे उपयोगात आणावे याचीही योजना आवश्यक आहे. कारण हे संक्रमण वाढवणारे माध्यम आहेत. आपण बाहेर गेलो की संक्रमणाचा धोका आलाच म्हणून समजा. 14 एप्रिलपर्यंत भारतात लॉकडाऊन आहे. त्यामुळे अर्थातच संक्रमण काही अंशी नियंत्रणात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पूर्णतः पाळले जात आहे. सामान आणण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एकाला तरी बाहेर जावे लागत आहे. सामान घरपोच मिळण्याच्या दृष्टीने प्रशासनाला प्रयत्न करावे लागतील. कारण तत्वतः कोरोनासंसर्ग खूप वाढला तर प्रशासनाला हे तेंव्हा तरी करावेच लागणार आहे. आत्ताच याचा विचार झाला असता तर त्यावेळेपर्यंत हे सगळे सुरळित व नियंत्रित झाले असते. स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून हे करण्याची गरज असते. यासाठी अनेक समाज सेवी संस्था़ कार्यकर्ते़ विविध संघटनांची मदत होऊ शकली असती.
असो. अमेरिका आजही लॉकडाऊन करत नाहीये. भारतानेही हिंमत दाखवली याचे आज जगभर कौतुक होत आहे; परंतु यानंतरची परिस्थिती अधिक बिकट आणि आव्हानांची असणार आहे. एका क्षणात जेवढ्या नोकरया गेल्या आहेत व लोक बेकार झाले आहेत़. ते काही एका दिवसात पुन्हा कामावर घेतले जाणार नाहीत. कामाची जशी गरज वाढेल तसे रोजगार उपलब्ध होऊ लागतील. मुळात कोरोनाचे पूर्णतः नियंत्रण किती दिवसात होईल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळेच की काय आपल्याला कामावर लवकरच परतावे लागेल. आजारी़ मधुमेही किंवा तत्सम आजार असलेल्यांनी व साठीच्या पुढील व्यावसायिकांनी अधिक सुट्या घ्याव्या. तरूणांना प्राधान्याने कार्यालयात जावे लागणार आहे. काही दिवसांनी का होईना़ शासनाने सांगितल्या नंतर कार्यालये सुरू करावीच लागणार आहेत. तेंव्हाही धोका पूर्णतः टळलेला नसेल. मोजून मापून धोका (calculated risk) पत्करावा लागेल. जसे़ रस्त्यावर अपघात होतात म्हणून आपण वाहन चालवणे बंद करत नाही. रहदारीचे सर्व नियम पाळून व रहदारीचे नियमन पाळर्णायांकडेही लक्ष ठेऊन आपण सुरक्षितपणे वाहन चालवत असतो. आपल्या लाजगण्यासाठी़ कामासाठी़ आपल्याकुटुंबासाठी़ आनंदासाठी़ सुखासाठी आणि आपल्याभविष्यासाठी सुद्धा आजच्या वर्तमानात आपल्याला काळजी घेत धोका हा पत्करावाच लागतो. व्यवसायात नुकसान होण्याचा धोका असतो म्हणून कुणीच व्यवसाय केला नाहीतर जगतरी कसे चालेल?
https://youtu.be/2T8tlStbF3I
कष्टपूर्वक़ बुद्धीची पराकाष्ठा करूऩ चांगल्या होत करू सहकाऱ्यांना सोबत घेऊन व्यवसाय करावे लागतात. तसेच काळानुरूप त्यात बदल करीत व्यवसायवृद्धीही करावी लागते. हे सगळे व्यावसायिक़ उद्योजक केवळ स्वतःसाठी काम करत नसतात .त्यांच्यासोबत असणारा प्रत्येकजण त्या व्यवसायाच्या सुखात़ दुःखात आणि धोक्यात आपापल्या परीने कळत नकळतपणे वाटा उचलत असतो.
यापुढे एक मात्र नक्की़ आपल्याला घरी असो की कार्यालयात काही नियम स्वतःला घालून घ्यावे लागतील. स्वतःला यासाठी की कार्यालयाने कितीही नियम घातले तरी आपल्या उपयोगाचे व सोयीचे नियम अधिक तत्परतेने पाळले जातात. चपला़ बूट दाराबाहेर काढणे़ चेहयाला मास्क लावणे़ हस्तांदोल न करता नमस्कार करणे. नव्वद टक्के संक्रमण आपल्या स्वतःच्या हातामुळे होते. हात आपण सतत चेर्हयाला लावत असतो. ही सवय आपल्याला जन्मापासूनच जडलेली असते. ही सवय सध्या तरी एखाद्या व्यसनापेक्षा भयंकर असल्याचे समोर येत आहे. आपल्या हाताचा स्पर्श कार्यालयात़ सार्वजनिक ठिकाणी अनेक वस्तूंना होतो. तो स्पर्श संक्रमित झाल्यावर सवयीप्रमाणे चेर्हयाला झाल्यास डोळ्यावाटे़ नाकावाटे वा तोंडावाटे संक्रमण शरीरात प्रवेश करू शकते. ही शक्यता सर्वात अधिक आहे.
संक्रमणाची दुसरी शक्यता जवळ असलेल्या व्यक्तीच्या नाकातूऩ तोंडातून बाहेर आलेले द्रव्य प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या हाताच्या स्पर्शाद्वारे डोळ्यात़ नाकात़ तोंडात जाणे. या संक्रमणकाळात कार्यालयात नाक तोंड झाकूऩ डोळ्याला शून्य क्रमांकाचा का होईना चष्मा लावून काम करणे आवश्यक आहे. डॉक्टऱ नर्सेस़ हॉस्पिटलमधील कर्मचारी आजही काळजी घेत कौतुकास्पद कामे करतच आहेत ना. किराणामाल़ भाजी़फळे यांचे व्यापारी़ विविध स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते ही रस्त्यावर उतरून आपली मदत करीतच आहेत ना. कोरोनाला घाबरून चालणार नाही. Fear is first step of Safety. पण म्हणून काय महिनोन्महिने पहिल्याच स्टेपवर राहून आयुष्य जगता येणार नाही. जंगलात वाघाची भिती वाटते म्हणून आपण जंगलात जाणे किंवा अभयारण्यात जाणे सोडत नाही. भिती असल्यामुळे काळजी घेने सुरक्षेसाठी स्वतः ला पिंर्जयात बंदिस्त करूऩ मात्र उघड्या डोळ्याने वाघाचे दर्शन घेण्याचा आनंद लुटण्यासाठी आपण जातोच ना काही दिवसांतच कोरोनाचीही आपल्याला सवय होईल. स्वतःला चांगल्या सवयी लावून घेत कोरोनालाही संकट मानणेच बंद करू या व काळजी घेत आनंदाने राहू या.
जगातील अनेक प्रदेशात अत्यंत विपरित नैसर्गिक परिस्थितीत लोक आनंदाने राहतात. आत्यंतिक थंडी अगदी उणे चाळीस तापमानातही लोक राहतात. तेथील मुले शाळेतही जातात. या संक्रमणाच्या विपरित काळात योग्यप्रकारे काळजी घेतली तर आपण सर्व भारतीय निश्चयपूर्वक या कोरोनाच्या संकटाला सहजपणे सामोरे जाऊ शकतो.

किशोर रहाटकर 
(न्यूट्रिशनिस्ट़ डाएटिशन)
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात