सरकारला सहकार्य करू असे म्हणणाऱ्या कॉँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेचे सत्र सुरूच ठेवले आहे. लॉकडाऊनचा निर्णय नोटाबंदीसारखचा कोणताही विचार न करता घेतल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. पण याच कॉंग्रेसचे सरकार असलेल्या पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांनीही लॉकडाऊनचे काटेकोर पालन केले आणि म्हणूनच या राज्यांमध्ये अजूनही चिनी विषाणूचा संसर्ग मर्यादेत राहिले, याकडे मात्र कॉंग्रेस सोईस्कर दुर्लक्ष करत आहे. महामारीतही राजकारण खेळण्याची हौस कॉंग्रेस भागवून घेत आहे. लॉकडाऊन हा अंतिम उपाय नाही हे चिमुरड्या मुलालाही कळते, पण संसर्गाची गती कमी करण्यासाठी आणि उपचारांचा वेग वाढवण्यासाठी लॉकडाऊनच फायदेशीर ठरला. अन्यथा 130 कोटींच्या भारतात काय घडले असते, याची कल्पनाच करवत नाही.
अभिजित विश्वनाथ, नवी दिल्ली
सरकारला सहकार्य करू असे म्हणणाऱ्या कॉँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेचे सत्र सुरूच ठेवले आहे. लॉकडाऊनचा निर्णय नोटाबंदीसारखचा कोणताही विचार न करता घेतला असल्याचे पत्र लिहिले आहे. पण गेल्या महिनाहून अधिकच्या काळात लॉकडाऊनमुळे भारताने चीनी व्हायरस रोखण्याची केलेली कामगिरी कॉँग्रेसला दिसत नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे.
नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल याच्या म्हणण्यानुसार, देशात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. वेळेवर करण्यात आलेला लॉकडाऊन, देखरेखीचे तगडे नेटवर्क आणि कंटेनमेंटसह अन्य उपायांमुळे हे शक्य झाले. वेळेवर लॉकडाऊन केला नसता तर देशात रुग्णांची संख्या एक लाखावर पोहोचली असती. लॉकडाऊन परिणामकारक ठरला. त्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण कमी झाले. आता १० दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत.
राष्ट्रीय रोग नियंत्रणचे संचालक एस. के. सिंह म्हणाले की, देशात पहिला रुग्ण आढळल्यानंतर देखरेख सुरू झाली होती. याची संसर्ग रोखण्यात महत्त्वाची भूमिका आहे. सध्या ९.४५ लाख संशयित देखरेखीखाली आहेत.
नीती आयोगाचे सदस्य सरकारी म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही, असे एकवेळ म्हटले तर आकडेवारी तर खोटी बोलत नाही. अमेरिका किंवा इटलीचे सुरुवातीचे दिवस पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की, सुरुवातीच्या दिवसात लॉकडाऊन न केल्यानं वणवा भडकल्यासारखा प्रसार झाला होता. भारतात लॉकडाऊनमध्येही कोरोनाचा फैलाव झाला, पण तो झपाट्याने होण्याऐवजी हळूहळू झाला. अमेरिकेत ३० दिवसांत रुग्णांची संख्या ४ लाखांच्या वर गेली.
स्पेनमध्ये महिनाभरात दीड लाख लोक चीनी व्हायरसने बाधित झाले. सोनिया गांधी यांचे माहेर असलेल्या इटलीमध्ये तर चीनी व्हायरसने कहर केला. एक लाखांवर रुग्णसंख्या आणि २० हजारांवर मृत्यू झाले. पुढारलेला देश आणि चांगल्या पायाभूत सुविधा असूनही जर्मनीत रुग्णसंख्या ९३ हजारांवर पोहोचली. भारतामध्ये मात्र अद्यापही २५ हजारच रुग्ण आहेत.
लॉकडाऊन सुरु होण्याच्या वेळी संक्रमणाचे प्रमाण १७ टक्के होते. मात्र लॉकडाऊन दरम्यान तबलिगी जमातमुळे झालेल्या संसर्गाची प्रकरणं सोडली तर कोरोना प्रकरणांमध्ये घट झाली आहे. यामध्ये तबलिगी जमातमुळे संसर्ग झालेल्या प्रकरणांचा समावेश केला गेला तरी सुद्धा हे प्रमाण १२ टक्क्यांवर येत आहे. लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले.
ज्या देशात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे त्याठिकाणी दिवसाला ५० ते १०० टक्के कोरोनाच्या प्रकारणात वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, १४ दिवसांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे चक्र वाढत जाते. त्यामुळे कोरोना वेगाने पसरत जातो. यामध्ये समुदाय संसगार्चा सर्वात जास्त धोका असतो. तर सध्याच्या आकडेवारीनुसार पाहिले तर कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात देशाला यश आले आहे. देशात कोरोनाचा वाढता संसर्ग कमी झाला आहे.
जगातील चीनी व्हायरसने झालेली मृत्युसंख्या 1 लाख 34 हजारांवर पोहोचली आहे. भारतातील परिस्थिती केवळ लॉकडाऊनमुळे बरी राहिली. पंतप्रधानांनी चीनी व्हायरसविरुध्दच्या लढ्यात समयसूचकता दाखविली गेली अशा शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले.चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यात या देशाला यश आले आहे, अशी टिप्पणीही केली. जागतिक आरोग्य संघटनेकडून झालेले हे कौतुक कॉँग्रेसच्या गावीही नसावे. त्यामुळेच सातत्याने टीका होत आहे.
सोनिया गांधी म्हणतात, लॉकडाऊन करताना कोणताही विचार केला गेला नाही. मग तुमच्याच पक्षाचे सरकार असलेल्या पंजाबने संचारबंदी घोषीत केली. तुमचा पक्ष सहभागी असलेल्या महाराष्ट्रातही लॉकडाऊनच्या अगोदरपासूनच संचारबंदी होती. सगळे काही बंद होते. मोदींनी लॉकडाऊन करणार आहे, असे अगोदर जाहीर केले असते तर देशात काय परिस्थिती उद्भवली असती. दिल्ली किंवा वांद्रा येथील घटनेने हे दाखवून दिले. लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले असते. मग परिस्थिती आणखीनच बिघडली असती. त्यामुळे लॉकडाऊनचा मुळ उद्देशच बाजुला पडला असता.
आणखी एक मुद्दा कॉँग्रेसने मांडला आहे तो म्हणजे लॉकडाऊनमुळे होणाऱ्या नुकसानीचा सामना देशाला करावा लागतोय. पंतप्रधानांनी पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी म्हटले होते की ’जान है तो जहान है’. याचे कारण म्हणजे सुरूवातीला या महाभयंकर धोक्याबाबत कोणताही अंदाज नव्हता. त्यामुळे लोकांचे प्राण वाचविणे हे प्राधान्यक्रमाचे होते. परिस्थिती थोडीशी सुधारल्यावर त्यांनीच सांगितले की, ‘जान भी जहान भी’. त्यामुळेच लॉकडाऊनवर टीका करणाऱ्या कॉँग्रेसला येथील लोकांच्या प्राणाची किंमत आहे का? हाच पश्न उपस्थित होतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App