वांद्रे गर्दी आणि दोन पत्रकारांवर झालेली कारवाई या दोन घटनांची राजकीय संगती लावली पाहिजे. कोरोनाच्या गदारोळात कदाचित याकडे कोणाचे लक्ष जाणार नाही. पण उद्धव ठाकरे यांची प्रतिमा अगदी damage नाही तर contain करायला याचा वापर होऊ शकतो, एवढे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘कर्तृत्व’ करून ठेवले आहे. कारण सध्याच्या नाजूक काळात उद्धव यांना थेट अंगावर घेणे राष्ट्रवादीला परवडणारे नाही. उद्धव ठाकरे जेवढे स्वतंत्रपणे आणि मोकळेपणाने निर्णय करायला लागतील, तेवढे पवार अस्वस्थ होतील…
विनय झोडगे
महाराष्ट्रात चीनी व्हायरस कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतो आहे. तसा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा “प्रभाव” देखील वाढत असल्याने राज्यातले भाजप नेते अस्वस्थ झाले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही पण त्यांच्यापेक्षा मोठी अस्वस्थता आहे, ती राष्ट्रवादीच्या गोटात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणताही प्रशासकीय अनुभव नाही त्यामुळे आपण आपल्याला हवे ते आणि हवे तसे निर्णय धकून नेऊ असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना विशेषत: शरद पवारांना वाटत होते. त्यांनी सुरवातही तशी केलीच होती.
बाजार समित्यांच्या निवडणुकांमधील शेतकऱ्यांचा मताधिकार ठाकरे सरकारने काढून घेतला. सरपंचांची निवडणूकही थेट मतदारांतून न घेता ती ग्रामपंचायत सदस्यांतून करण्याचा निर्णयही ठाकरे सरकारने घेतला. या दोन्ही निर्णयांमागे शरद पवारांचा थेट लाभाचा हात होता. पण “माघार सरकार” हा शिक्का सहन करावा लागला ठाकरे सरकारला…!! ही “करणार पवार; भरणार ठाकरे” या राजकीय सिनेमाची ही झलक होती. असे अनेक निर्णय पवारांना पुढे रेटायचे होते. त्यातून राष्ट्रवादीचे राजकीय फेरभांडवलीकरण पवारांना करायचे होते आणि आहेही पण तेवढ्यात कोरोना “आडवा” आला. या संधीचा एक प्रकारे फायदा घेत उद्धव ठाकरे यांनी स्वत:ची प्रतिमा भक्कम करायला सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत थेट त्यांच्याशी संवाद प्रस्थापित केला. जवळ जवळ रोज किंवा दिवसाआड महाराष्ट्रातील जनतेशी ते फेसबुक लाइव्ह संवाद करत राहिले. यातून मोदींएवढी मोठी नाही तरी महाराष्ट्रापुरती तरी उद्धव यांची प्रतिमा जनमानसात ठसायला सुरवात झाली. शरद पवार सोडून दुसऱ्या कोणत्याही नेत्याची अशी प्रतिमा तयार होणे, ही राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा ठरते. किंबहुना राष्ट्रवादीच्या गोटातील अस्वस्थतेचे हे खरे इंगित आहे. उद्धव ठाकरे हे अनुभव नसतानाही कौशल्याने परिस्थिती हाताळत आहेत, असे media perception तयार झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आणखी अस्वस्थता पसरली.
वरील पार्श्वभूमीवर वांद्रे येथील गर्दी आणि त्यानंतर दोन पत्रकारांवर झालेली कारवाई या दोन घटनांची राजकीय संगती लावली पाहिजे. वरील दोन्ही घटनांशी राष्ट्रवादीचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आहे. नुसते गृह मंत्रालय राष्ट्रवादीच्या नेत्याकडे आहे, एवढा वरवरचा हा संबंध नाही. त्याहीपेक्षा खोलवर याची पाळेमुळे असू शकतात. त्याला जितेंद्र आव्हाड प्रकरणाचीही ठळक किनार आहे.
कोरोनाच्या गदारोळात कदाचित याकडे कोणाचे लक्ष जाणार नाही. पण उद्धव ठाकरे यांची प्रतिमा अगदी damage नाही तर contain करायला याचा वापर होऊ शकतो, एवढे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी “कर्तृत्व” करून ठेवले आहे. कारण सध्याच्या नाजूक काळात उद्धव यांना थेट अंगावर घेणे राष्ट्रवादीला परवडणारे नाही. उद्धव ठाकरे जेवढे स्वतंत्रपणे आणि मोकळेपणाने निर्णय करायला लागतील, तेवढे पवार अस्वस्थ होतील. पण थेट उद्धव यांना हात घालायला ते धजावणार नाहीत. पवार कितीही unpredictable असले तरीही…!! कारण महाराष्ट्रातले राजकारण बारकाईने पाहिले तर ज्या तडफेने पवारांनी उद्धव ठाकरे सरकार महाराष्ट्रात आणले त्या तडफेने त्या सरकारवर “जुन्या पवार doctrine” नुसार खुद्द पवारांनाही grip बसवता आलेली नाही.
उद्धव ठाकरे यांच्यावर कुरघोडी करायचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न केला आणि ते भडकले तर…!! ही भीती राष्ट्रवादीला कायम राहिली आहे. उद्धव ठाकरे यांना थोडेतरी राष्ट्रवादीच्या तालावर नाचवता येईल पण भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सरकार बनवले तरी त्या सरकारच्या प्रमुखाला आपल्या तालावर उद्धव ठाकरे यांच्याएवढे नाचवता येणार नाहीत, कारण वर मोदी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक नाड्या त्यांनी घट्ट करून ठेवल्या आहेत.
म्हणूनच आपण करून नामानिराळे राहण्या इतपत पवारांचा पक्ष उद्धव ठाकरे यांना खेळवेल. पण फार पुढे जाण्याची हिंमत करणार नाही…!! कारण त्यासाठी चुकवावी लागणारी किंमत चुकविण्याची राष्ट्रवादीची आणि तिच्या नेत्यांची “राजकीय औकात” नाही…!!
Array