सहमतीचे मोदी मॉडेल…!!


मोदी आता वेगळ्या अर्थाने हा trust deficit भरून काढताना दिसताहेत. गाठीशी असलेल्या अनुभवाचा positive उपयोग करून घेत प्रत्येक मुख्यमंत्र्याशी खऱ्या अर्थाने विश्वासू संवाद साधत आहेत. ते स्वत:च दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिल्याने राज्यांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय जाणिवा, खाचाखोचा आणि गरजा नेमक्या काय आहेत याची त्यांना पक्की माहिती आहे. या माहितीचा उपयोग ते  प्रत्येक मुख्यमंत्र्याशी संवाद करताना करून घेत असावेत. 


 विनय झोडगे

चीनी व्हायरस कोरोना विरोधातील लढाईत “सहमतीचे मोदी मॉडेल” तयार झाले आहे. किंबहुना ते स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच evolve होऊ दिले आहे. मोदींच्या political image ने त्यामुळे ३६० अंशांचे वळण घेतले आहे. सहमतीचे हे मोदी मॉडेल मुख्यमंत्र्यांच्या तीन विडिओ कॉन्फरन्समधून विकसित झालेले दिसले.

अर्थात मोदींनी सर्व पक्षीय खासदार, नेत्यांचीही विडिओ कॉन्फरन्स घेतली. पण यात एक प्रकारे औपचारिकता होती. कारण यात थेट decision makers कमी होते. मुख्यमंत्र्यांच्या विडिओ कॉन्फरन्सचे तसे नव्हते. तेथे सगळेच प्रभावी, परिणामकार decision makers…!! त्यामुळे ही कॉन्फरन्स अधिक परिणामकार ठरणे स्वाभाविक ठरले. मोदींच्या सहमती मॉडेलने ती अधिक परिणामकारक ठरली.

अर्थात यात राजकारणाबरोबरच सर्वांत मोठा अँगल आहे, तो म्हणजे केंद्र – राज्य संबंधांचा. व्यापक अर्थाने बोलायचे झाल्यास संघ राज्यीय ढाचाचा…!! कायमच राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर एकमेकांकडे संशयाने पाहात आलेल्या या दोन समांतर व्यवस्था कोविड १९ च्या आव्हानाचा मुकाबला करताना “सोशल डिस्टंसिंग” ठेवत “हातात हात” घालून काम करताना दिसताहेत. यात मोदींचे राजकीय कौशल्य तर गुंतलेले आहेच. येथे गुंतलेले हा शब्द गुंतवणूक या अर्थाने घ्यायचा आहे. त्याच बरोबर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्याही राजकीय सामंजस्याचा भागही तितकाच “राजकीय मूल्यवान” आहे.

नेमके येथेच मोदींचे “माजी मुख्यमंत्रीपद” उपयोगी पडलेले दिसते. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारकडून त्यांना मिळालेल्या “वर्तणुकीचे” एका अर्थाने विरोधी प्रतिबिंब “trust ante” मोदींच्या सध्याच्या वर्तणुकीतून दिसते. मोदी मुख्यमंत्री असताना त्यांना कायम सापत्नभावाची वागणूक केंद्र सरकारने दिल्याचे त्यांनीच अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. या सापत्न वागणुकीत त्यावेळचे केंद्रातील सत्ताधारी आणि मोदी यांच्यात प्रचंड trust deficit होता. तो त्यावेळी म्हणजे तब्बल ११ वर्षे कधीच भरून निघाला नाही.
मोदी आता वेगळ्या अर्थाने हा trust deficit भरून काढताना दिसताहेत. गाठीशी असलेल्या अनुभवाचा positive उपयोग करून घेत प्रत्येक मुख्यमंत्र्याशी खऱ्या अर्थाने विश्वासू संवाद साधत आहेत. ते स्वत:च दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिल्याने राज्यांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय जाणिवा, खाचाखोचा आणि गरजा नेमक्या काय आहेत याची त्यांना पक्की माहिती आहे. या माहितीचा उपयोग ते  प्रत्येक मुख्यमंत्र्याशी संवाद करताना करून घेत असावेत. त्यामुळे हा संवाद अधिक अर्थवाही होत असावा, असे मानण्यास वाव आहे.

अर्थात यालाही बंगालसारखे काही अपवाद आहेत. पण एक प्रकारे त्यांनी प्रत्येक मुख्यमंत्र्याला त्याच्या सर्व प्रकारच्या space मध्ये काम करण्याची एक मोकळी मूभाच दिल्याचे जाणवते, जी त्यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात निदान केंद्र – राज्य संबंधांचा विचार करता कधीच मिळाली नाही.

याचाच वेगळा अर्थ असाही लावता येईल, की मोदी हे संघ राज्यीय ढाचाची later and spirit मध्ये अंमलबजावणी करीत आहेत. अर्थातच या सहमतीच्या मोदी मॉडेलचा खुद्द मोदी यांच्या राजकीय करिष्मा वाढण्यात उपयोग होईलच पण त्यातून सकृत दर्शनी तरी कोणी मुख्यमंत्री अस्वस्थ होताना दिसत नाही. अशी अस्वस्थता नसेल असे म्हणण्यात मतलब नाही पण निदान कोणी मुख्यमंत्री ती दाखवताना सध्या तरी दिसत नाही. मुख्यमंत्र्यांचा comfort zone वाढविण्याचेही हे “मोदी कौशल्य मॉडेल” म्हणावे लागेल.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात