वस्तुस्थितीचा विपर्यास करून “सामना”ची डोक्यात दंडुक्याची भाषा…!!


देशभरातील भाजपचे सुमारे १ कोटी कार्यकर्ते गरजूंसाठी दररोज ५ कोटी फूड पँकेट तयार करण्याच्या आणि वितरण करण्याच्या कामात गुंतले आहेत. महाराष्ट्रात ३०० कम्युनिटी किचनद्वारे तसेच भाजपने सुमारे सव्वा लाख कार्यकर्ते प्रत्यक्ष कामात उतरवून अन्य व्यवस्थांद्वारे २० लाख कुटुंबांना दररोज अन्नपुरवठा होईल, याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. पण स्वत:हून धृतराष्ट्र बनललेल्या सामनाकारांना ही वस्तुस्थिती दिसत नाही.


विनय जेरे

मुंबई : महाराष्ट्रातील भाजप हा विरोधी पक्ष म्हणून जबाबदारीने वागत नाही, असा कांगावा करत त्याच्या नेत्यांच्या डोक्यात दंडूका घातल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही, असा कांगावा सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. यात भाजपबाबत नुसता वस्तुस्थितीचा विपर्यासच नाही, तर संपूर्ण जग भारताच्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनची प्रशंसा करीत असताना सामनाकारांची होत असलेली जळजळही दिसून येते. भाजपने म्हणे आपल्या आमदारांना भाजपच्या कोषात एक महिन्याचा पगार जमा करायला सांगितला आहे. या बाबत वस्तुस्थिती अशी आहे, की भाजपचे आमदार, खासदार पक्षाच्या कोषात नव्हे, तर पंतप्रधान निधीत ही रक्कम जमा करणार आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. पण सामनाकारांनी डोळ्यावर पट्टी बांधल्याने त्यांना हे ट्विट दिसले नसावे. एवढेच नाही, तर देशभरातील भाजपचे सुमारे १ कोटी कार्यकर्ते गरजूंसाठी दररोज ५ कोटी फूड पँकेट तयार करण्याच्या आणि वितरण करण्याच्या कामात गुंतले आहेत. महाराष्ट्रात ३०० कम्युनिटी किचनद्वारे तसेच भाजपने सुमारे सव्वा लाख कार्यकर्ते प्रत्यक्ष कामात उतरवून अन्य व्यवस्थांद्वारे २० लाख कुटुंबांना दररोज अन्नपुरवठा होईल, याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. पण स्वत:हून धृतराष्ट्र बनललेल्या सामनाकारांना ही वस्तुस्थिती दिसत नाही.

देशावरच्या, राज्यावरच्या संकट काळात कोणताही राजकीय पक्ष मदत करतोच. भाजपचे हे प्रयत्नही वाखाणण्याजोगेच आहेत. शिवसेनेही पूर्वी पूरग्रस्तांना मदत करताना शिवसेना भवनातच निधी जमा करवून घेतला होता. मात्र सामनाकार ही देखील वस्तुस्थिती विसरलेले दिसतात. “रोखठोक” ठोकणे हे सामनाचे वैशिष्ट्य मानले जाते पण प्रत्येक वेळी तो ठोका अचूक बसतोच असे नाही. तसाच आजच्या ठोक्याचा नेम चुकला आहे. त्यातूनही वस्तुस्थितीकडे पाठ करून अग्रलेख लिहायला बसले की सत्य दिसत नाही. तसेच आजचा अग्रलेख लिहिताना सामनाकारांचे झाले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात