पंतप्रधानांनी उध्दव ठाकरे यांना कोरोना व्हायरसमुळे युरोपमध्ये उद्भवलेल्या संकटाची कल्पना दिली. तशीच परिस्थिती भारतात होऊ नये यासाठी काळजीपूर्वक पावले उचलली जात असल्याचे सांगितले. फेसबुक लाईव्ह करून उध्दव ठाकरे यांनी ही माहिती दिली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर महाराष्ट्रात अनेक भागांत दुकानांमध्ये झुंबड उडाली. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत विचारणा केली. यावेळी पंतप्रधानांनी उध्दव ठाकरे यांना कोरोना व्हायरसमुळे युरोपमध्ये उद्भवलेल्या संकटाची कल्पना दिली. तशीच परिस्थिती भारतात होऊ नये यासाठी काळजीपूर्वक पावले उचलली जात असल्याचे सांगितले. फेसबुक लाईव्ह करून उध्दव ठाकरे यांनी ही माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाउन जाहीर केल्यानंतर काही वेळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. फेसबुक लाईव्हवर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे निवेदन दिलं ते अत्यंत गांभीर्याने दिले आहे. ते ऐकल्यानंतर मी क्षणभर चरकलोच. लॉकडाऊन ही गोष्ट काळजाचा ठोका चुकवणारी आहे. माझ्याही मनात भीती आणि शंका निर्माण झाली की आता करायचं काय ? त्यानंतर मी पंतप्रधानांशी बोललो. त्यांना कल्पना दिली की जवळपास महाराष्ट्र आम्ही लॉकडाउन केलाच आहे. अत्यावश्यक सेवा सुरु ठेवाव्याच लागतील. त्यासाठी लागणारे कर्मचारीही आपल्याला ठेवावे लागतील. अन्यथा गोंधळ निर्माण होईल. याची कल्पना मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
करोनाचे संकट हे अत्यंत गंभीर आहे. कृपया घराबाहेर पडू नये महाराष्ट्र सरकार तुमच्यासोबतच आहे आपण घराबाहेर पडलो तर ते संकट आपल्या घरात येईल. त्यामुळे घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उध्दव ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांच्या भाषणानंतर साहजिकच आहे माझ्या मनात पुढे काय करायचे याची भीती आणि शंका निर्माण झाली. पण मी काही वेळानंतर पंतप्रधानांशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली की तुम्ही दिलेल्या सूचना आम्ही आधीच राज्यात दिल्या आहेत. आम्ही लॉकडाउन केलं आहे. पण अत्यावश्यक सेवा आणि त्यासाठी लागणारे कर्मचारी आपल्याला ठेवाले लागतील. अन्यथश गोंधळ निर्माण होईल.
जीवनाश्यक सेवा सुविधा कधीच बंद होणार नाही. पण संकट अतिशय गंभीर आहे. त्याचं गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नका. या रोगापासून वाचण्याचा हाच उपाय आहे. घराबाहेर पाऊल टाकलं तर संकट घरात पाऊल टाकेल. घाबरु नका, पण काळजी घ्या,अशी विनंती उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
सर्वसामान्यांना करोनासंबंधी माहिती मिळावी यासाठी राज्य सरकारकडून व्हॉट्सअॅपवर चॅटबोट ही सुविधा राज्य सरकारकडून सुरु करण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारने +912026127394 हा क्रमांक दिला आहे. हा क्रमांक आपल्या फोनमध्ये सेव्ह करावा. या ग्रुपमध्ये आल्यानंतर करोनासंबंधी आपल्या मनातील जे प्रश्न, शंका असतील त्यांची माहिती मिळेल असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. सध्या ही सुविधा इंग्रजीत असून मराठीत आणण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करु असेही त्यांनी सांगितले.
कोणत्याही परिस्थितीत जीवनाश्यक वस्तू सुविधा बंद केल्या जाणार नाहीत. राज्यातील सर्व जनतेला माझे आवाहन आहे की त्यांनी आपल्या मनातील भिती दूर करावी. औषधे, औषधे बनवणार्या कंपन्या, फायर ब्रिगेड, महापालिका, पोलीस, भाजीपाला, दुधाच्या गाड्या, धान्याच्या गाड्या या सुविधा सुरूच राहतील असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App