तबलिगींचा धार्मिक विखार


चीनी व्हायरस प्रादुर्भावाच्या निमित्ताने तबलिगी जमातीविषयी नवनवीन माहिती समोर येत आहे. अत्यंत धर्मांध, कट्टरतावादी तबलिगी गेल्या अनेक वर्षांपासून पध्दतशिरपणे आपले जाळे पसरवित होते. मिशनर्‍यांप्रमाणे काम करून मुस्लिम धर्मियांमध्ये विखार निर्माण करत होते. त्याचबरोबर जागतिक पातळीवरील संघटन करून मुस्लिमांना बहुसंख्यांकांपासून अलग करण्याचा प्रयत्न करत होते,हे देखील दिसून आले आहे.


अभिजित विश्वनाथ
नवी दिल्ली : चीनी व्हायरस प्रादुर्भावाच्या निमित्ताने तबलिगी जमातीविषयी नवनवीन माहिती समोर येत आहे. अत्यंत धर्मांध, कट्टरतावादी तबलिगी गेल्या अनेक वर्षांपासून पध्दतशिरपणे आपले जाळे पसरवित होते. मिशनºयांप्रमाणे काम करून मुस्लिम धर्मियांमध्ये विखार निर्माण करत होते. त्याचबरोबर जागतिक पातळीवरील संघटन करून मुस्लिमांना बहुसंख्यांकांपासून अलग करण्याचा प्रयत्न करत होते,हे देखील दिसून आले आहे. एका अंदाजानुसार या संघटनेचे जगभरात १५ कोटी सदस्य आहेत. २१३ देशांत ही संघटना काम करते. आगामी काळात जगातील मुस्लिमांची सर्वात मोठी संघटना बनविण्याचा तिच्या कर्त्या-धर्त्यांचा मानस आहे.
तबलिगी जमातीच्या विचाराला आणि प्रचाराला भारतातील अनेक मुस्लिमांचा विरोध आहे. मात्र, अतिरकेी विचारांचे तरुणांना नेहमीच आकर्षण असते. त्यामुळे तरुणांमध्ये आपली विषारी विचारधारा पसरविण्याचे काम तबलिगींच्या माध्यमातून केले जात असल्याचेही आता उघड झाले आहे. तबलिगी जमातचा अर्थच अल्लाच्या संदेशाचा प्रसार करणारा समूह असा असल्याने त्यांच्याकडून विखारी प्रचार होत असला तरी त्यावर कोणतीही कायदेशिर कारवाई आजपर्यंत झालेली नाही.

निजामुद्दीनमधील तबलिगी जमातीच्या मरकझमध्ये चीनी व्हारयसचा प्रादुर्भाव झाल्याच्या निमित्ताने संघटनेविषयी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. सुरूवातीला तबलिगी जमात ही शांतताप्रिय संघटना असल्याचे सांगितले जात होते. देशातील कोणत्याही शहरात कधी कधी अचानक तबलिगीचे कार्यकर्ते फिरताना दिसतात. याबाबतची माहिती पुढे येत नाही. परंतु, संपूर्ण जगातील, देशातील आणि राज्यातील शहरांमध्ये तबलिगींचे सातत्याने मेळावे होत असतात. भारतातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या सुफी परंपरेवर कडवी टीका करण्यात तबलिगी आघाडीवर असतात. विशेष म्हणजे हे तबलिगी केवळ मशीदींमध्ये बोलतात. कोणत्याही इतर माध्यमातून ते बोलत नाहीत. त्यामुळे त्यांची विचारधारा समोर येत नाही. मात्र, मशाीदींमध्ये मात्र ते भयंकर शब्दांत बोलतात. तरुणांची माथी भडकावितात.
तबलिगी जमातीची स्थापना भारतात १९२७ मध्ये झाली.मोहम्मद इल्यास कंधालगी याने हा पंथ निर्माण केला.  याचे कारण म्हणजे याच काळात देशात आर्य समाजाची चळवळ निर्माण झाली होती. भारतात मोगल काळात सर्वाधिक धर्मांतर झाले. मात्र, धर्मांतरीत झालेले अनेक जण हिंदू धर्मातील रिती-रिवाज आणि परंपरा मानत होते. त्यामुळे आर्य समाजाने त्यांच्या हिंदू मुळांची आठवण करून देऊन शुध्दीकरण मोहीम सुरू केली. त्यामुळे या लोकांमध्ये इस्लामची तत्वे प्रसारित करण्यासाठी तबलिग जमातने काम सुरू केले.
मुस्लिम समाजाच्या अध:पतनाला या समाजाचे धर्मापासून दूर जाणे हे असल्याचे त्याचे मत होते. त्यामुळे त्याने मुस्लिमांमध्ये धार्मिक भावनांची जोपासना करायला सुरूवात केली. कुराणातील तत्वे आणि हदीस पैगंबर महंमदाच्या आठवणींची संकलने घेऊन तबलिगचे  प्रचारक गावोगावी जाऊ लागले. तबलिगी जमातच्या कार्यकर्त्याहचे वैशिष्टय म्हणजे ते अत्यंत साधी वागणूक ठेवात. त्यामुळे कोणत्याही गावात ते  स्थानिक मशिदीत मुक्काम करतात. प्रश्न निर्माण होतो की त्यांचे मरकझ म्हणजे काय?
कोणत्याही मुस्लिमाला अथवा गैरमुस्लिमाला इस्लाम धर्माविषयी खात्री पटवून देण्याइतपत तबलिग जमातीचा कार्यकर्ता तयार व्हावा,  यासाठी त्यांचे प्रशिक्षण करण्याची आवश्यकता होती. ती लक्षात घेऊन ह्यतबलिगी जमातने प्रथम एका विशिष्ट प्रकारचे धार्मिक प्रशिक्षण देणे सुरू केले. हेच धार्मिक प्रशिक्षण मरकझमध्ये दिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात धर्मप्रसारासाठी जमात निघते. यामध्ये आठ ते दहा जणअसतात. त्यातील सर्वात तरुण असलेल्यांकडे सेवेचे काम असते. तीन दिवस, पाच दिवस, ४० दिवस आणि चार महिने अशा जमाती निघतात. जमात एखाद्या भागात गेल्यावर त्या भागातील मुस्लिमांना जवळच्या मशीदीमध्ये येण्यास सांगितले जाते. तेथे सकाळी दहा वाजता तबलिग कार्यकर्ते हदीस आणि नमाज पढतात. त्यानंतर धर्माची शिकवण दिली जाते.
सुफी परंपरेला मानणार्य्या ऑल इंडिया उलमा व मशाईख बोर्डाने तबलिगी जमातीच्या विचारधारेविरुध्द वैचारिक लढाई कायम ठेवली. प्रसिध्द ब्लॉगर वसतुल्लाह खान यांनी २१०४ मध्येच एक लेख लिहून तबलिगी जमात मुस्लिमांना ‘नाकारा’ बनवित असल्याचे म्हटले होते. ते म्हणतात,  दरवर्षी लाखो लोक तबलिगींच्या मेळाव्यांमध्ये भागा घेतात. संपूर्ण देशात हे लोक पोहोचात आणि आपल्या विचारधारेचा प्रसार करतात.  मात्र, त्यांचा सगळा जोर प्राथर्नवर असतो. कोणत्याही समस्येवर त्यांचे उत्तर म्हणजे नमाज पढावे, कुराणाचे पठण करावे, दाढी वाढवावी आणि सलवार गुडघ्याच्या वर बांधावी. सगळ्या समस्या अल्लावर सोडून द्याव्यात. मात्र, त्यांना हे कोण समजाविणार की अल्ला ने आपल्याला केवळ प्रार्थनेसाठी नाही तर सांसारिक जीवन व्यतीत करण्यासाठीही बनविले आहे. प्रत्येक जण जर मशीदमध्ये प्रार्थनाकरत बसला तर देश कसे चालणार? एखादा व्यक्ती आपले कुटुंब सोडून चाळीस दिवसापासून ते एक वर्षापर्यंत प्रचारासाठी बाहेर पडला तर त्याच्या कुटुंबाची काळजी कोण घेणार?
विशेष म्हणजे इस्लाम हा विश्वधर्म असल्यावर तबलिगींचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तबलिग जमात देशा-देशामध्ये भेदभाव करत नाही. निजामुद्दीनमधील मरकझला तब्बल ४१ देशांचे नागरिक होते. त्यामध्ये पाकिस्तान, इराण, सौदी अरेबिया येथीलही अनेक जण होते. पाकिस्तानमध्येही तबलिगींचे मरकझ आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे तबलिग जमातीच्या शिकवणुकीचा धोका आणखीनच गंभीर होतो.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात