ट्रम्पच्या दबावाला मोदी खरच बळी पडले? जरा ‘क्रोनोलॉजी समझिए..’


मूळात हायड्रॉक्सी क्लोरोवक्वाइन आणि पँरासिटोमाल ही औषधे स्वस्त आणि पेटंटमुक्त आहेत. भारतात ती मुबलक बनतात. त्यावर फुटकळ हक्क सांगण्यापेक्षा जगाला ती पुरविण्यात जास्त शहाणपण आहे.. वरिष्ठ संपादक शेखर गुप्ता यांचा हा लेख


म्हणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली आले. अमेरिका – भारताची मैत्री इथे उपयोगी नाही पडली….. आणखी बरेच काही! बऱ्याच वावड्या गेल्या दोन दिवसांमध्ये भारताच्या राजकीय वातावरणात उडविल्या गेल्या. वावड्या उडविणाऱ्यांना त्या उडवत आनंद घेऊ द्या. आपण जरा घटनाक्रम आणि त्यातून निष्पन्न होणारी वस्तुस्थिती समजावून घेऊ.
मूळात चीनी व्हायरसचा धोका समजायला आणि समजावून द्या़यला अमेरिकन प्रशासनाला खूपच उशीर झाला. धोका समजला त्यावेळी कोरोनाने अमेरिकेतल्या काही पॉकेटना विळखा घातला होता. ट्रम्प प्रशासन आणि गणराज्य प्रशासने जागे व्हायला वेळ लागला. लॉकडाऊनसारखे धाडसी निर्णय घेता आले नाहीत परिणामी चोहोबाजूंनी दबाव वाढला.
या सर्व पार्श्वभूमीवर भारतात मोदी सरकार आणि राज्य सरकारांचे टायमिंग सर्वच बाबतीत अचूक होते. (अर्थात हे मान्य करायला हवे.)
ट्रम्प यांनी १९ मार्चला हायड्रॉक्सी क्लोरोक्वाइनचा पहिल्यांदा उल्लेख केला. २१ मार्चला ते game changer औषध ठरेल, असेही ट्विट केले. त्याचवेळी भारतात २२ मार्चला इंडियन मेडिकल कौन्सिलने हायड्रॉक्सी क्लोरोवक्वाइनला कोविड १९ संदर्भातील प्रतिबंधक औषध म्हणून जाहीर केले. म्हणजे त्याचा वापर संशियत व त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देण्याची शिफारस केली.
याच वेळी ट्रम्प यांच्यावर अधिकाराचा गैरवापर करून विशिष्ट औषध जनतेच्या माथी मारण्याचाही टीका अमेरिकन मीडियातून सुरू झाली. पण ट्रम्प प्रशासनाने तो पर्यंत भारतीय औषध निर्मिती कंपन्यांना देऊन टाकली होती. २५ मार्च पर्यंत ट्रम्प यांची “डॉ. ट्रम्प” म्हणून टवाळी सुरू होती. २५ मार्चला भारताने हायड्रॉक्सी क्लोरोक्वाइन च्या निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना जारी केली. २६ मार्चला या औषधाची साठेबाजी होऊ नये, त्याची रिटेल विक्री होऊ नये म्हणून त्याचा H1 च्या यादीत समावेश केला. पण तो पर्यंत अमेरिकेने काही भारतीय कंपन्यांना ऑर्डर देऊन अँडव्हान रक्कमही दिली होती.
४ मार्चला पहिल्यांदा ट्रम्प मोदींशी बोलले. सायंकाळच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले, “मी मोदींशी बोललो आहे. ऑर्डर दिल्याचे त्यांना सांगितले आहे. मी विचार करतो असे ते म्हणाले अाहेत.” ५ मार्चला ट्रम्प पुन्हा मोदींशी बोलले. त्यानंतर “भारताने ऑर्डर नाकारली तर? अमेरिका प्रत्युत्तर देणार का?”, असा प्रश्न पत्रकाराने विचारला, त्यावर ट्रम्प यांनी खुलासा केला, “ते असे करतील असे वाटत नाही. भारत – अमेरिका संबंध चांगले आहेत. पण तरीही त्यांनी असे केले तर अमेरिका प्रत्युत्तराचा विचार करेल.” झाले. मोदींना अमेरिकेची धमकी, मोदी अमेरिकेपुढे झुकले या बातम्या सुरू झाल्या. १९६० च्या दशकातला दांभिक अमेरिका विरोध भारतीय मीडियात उफाळून आला. पण यात वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष झाले.
भारताने औषध निर्यातीवरची बंदी आधीच उठविली होती. ब्राझिलचे अध्यक्ष जैर बोल्सोनॉरो यांनी देखील ब्राझिलच्या गरजेसाठी भारताने बंदी उठविली असे म्हटले होते. याकडे मीडियाने दुर्लक्ष केले.
वास्तविक वरील औषध बनविण्याची यूनिक क्षमता भारताकडे आहे. त्या औषधाचे रॉ मटेरिअल चीनच्या वुहानमधून येते. अमेरिकेला आज गरज आहे. हे औषध सर्व जगाला पाहिजे आहे. भारतासाठी ही संधी आहे. दांभिक अमेरिका विरोधाकडे दुर्लक्ष करून ती घेतली पाहिजे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात