गप्प बसा, तबलिगींविरोधात बोलायचे नाही.! नाही तर ट्रोल व्हाल, तक्रार दाखल होईल..!! याचा अनुभव महिला कुस्तीगीर बबिता फोगट, गीता फोगट या भगिनींना आणि शेफाली वैद्य या लेखिकेला येतोय. एरवी शिवसेना नेत्यांनी तबलिगी जमाती विरोधात आकाश पाताळ एक केले असते. पण आता महाराष्ट्रातल्या सत्तेच्या दगडाखाली हात अडकल्याने ते तबलिगीं विरोधातील एक शब्दही खपवून घेऊ शकत नाहीत की स्वत: लिहू शकत नाहीत. ते आता देशाच्या बाजूने बोलणाऱ्यांच्या विरोधातही बोलू, लिहू लागले आहेत. तक्रारी दाखल करू लागले आहेत.
विनय झोडगे
“गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्री” या कविवर्य सुरेश भटांच्या काव्यपंक्ती सध्याच्या काळात शिवसेना नेत्यांना अत्यंत चपखलपणे लागू होताना दिसताहेत.तबलिगी जमातीच्या म्होरक्यांनी देशभर फिरून कितीही कोरोना फैलावू द्या… डॉक्टर, नर्सवर थूंकू द्या, अश्लील चाळे करू द्या, दगडफेक करू द्या, हॉस्पिटलमधून पळून जाऊ द्या. लपून बसू द्या. फरार होऊ द्या. हवालातून पैसा खाऊ द्या. मरकज बांधू द्या. तबलिगी जमातीने काहीही करू द्या…!! तुम्ही बोलायचे नाही. लिहायचे नाही. नाही म्हणजे नाही…!! नाही तर तुम्हाला ट्रोल करू. तुमच्यावर hatred पसरविल्याबद्दल गुन्हा दाखल करू… हा खाक्या आता देशभर पसरलेला दिसतोय. विशेषत: शिवसेनेच्या राज्यात तर याचा फैलाव मोठा दिसतोय. कारण तबलिगी जमातीला अनुकूल ठरतील अशी पावले शिवसेना नेतेच उचलायला लागलेत. शिवसेनेचे हे अजब “सेक्युलरी व्हर्जन” “सिल्वर ओक” च्या छायेतून महाराष्ट्रासमोर येताना दिसतेय.
याचा अनुभव महिला कुस्तीगीर बबिता फोगट, गीता फोगट या भगिनींना आणि शेफाली वैद्य या लेखिकेला येतोय. काही पत्रकारांनाही याच खाक्याचा फटका बसतोय. पण हे ट्रोलिंग फक्त शाहीनबागी आंदोलकांच्या बौद्धिक पित्यांनी आणि बौद्धिक जमातीने केले असते तर आश्चर्य वाटले नसते. पण “गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्री”…!! झालाय ना. याचे वैषम्य देशभरातल्या सामान्य नागरिकांना वाटतेय. शिवसेनेचे कार्यकर्तेच लेखक, पत्रकारांविरोधात पोलिसात तक्रारी दाखल करताहेत.
तबलिगी जमातीने चीनी व्हायरस कोरोनाचा फैलाव केला त्या विरोधात बबिता फोगटने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. तिला ट्रोल करण्यात आले. एकाने तर आकलेचे तारे तोडल, “एका मुसलमानाने सिनेमा बनवून फेमस केले. नाही तर बसले असते पाणीपुरी विकत.” अर्थात त्याला ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्तने झोडपले, “पाणीपुरी विकून कष्ट करूनच पोट भरले असते ना…!! तुमच्या दारात नसत्या आल्या ना तुकडे मोडायला…!!” योगेश्वर ने सणकावले. नेमबाज मनू भाकेरनेही ट्रोलर्सना अशीच चपराक लगावली आहे. “ज्या जोशात कुस्तीच्या गादीवर आणि मातीत आम्ही लढतो, त्याच जोशात आम्ही देशाच्या हिताचे आणि तबलिगींविरोधात लिहिणारच”, असे गीता फोगटने सुनावले.
यदि आप बबीता फोगाट को सपोर्ट करते हैं तो उन तक यह बात जरूर पहुंचा दीजिए और उनको बोलिए ध्यान से कान खोल कर सुन लें। pic.twitter.com/gqec3lQwPE— Babita Phogat (@BabitaPhogat) April 17, 2020
यदि आप बबीता फोगाट को सपोर्ट करते हैं तो उन तक यह बात जरूर पहुंचा दीजिए और उनको बोलिए ध्यान से कान खोल कर सुन लें। pic.twitter.com/gqec3lQwPE
हम ‘निडर’ होकर ‘देश’ के लिए खेलते हैं ओर हम ‘निडर’ होकर ही “देशहित” के लिए बोलते रहेंगे!! #iSupportBabitaPhogat— geeta phogat (@geeta_phogat) April 17, 2020
हम ‘निडर’ होकर ‘देश’ के लिए खेलते हैं ओर हम ‘निडर’ होकर ही “देशहित” के लिए बोलते रहेंगे!! #iSupportBabitaPhogat
शेफाली वैद्य आणि सुनयना होेले यांच्या विरोधात शिवसेना नेते अक्षय विजय पनवेलकर यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शेफाली वैद्य यांनी वांद्रे स्टेशनवर जमलेल्या गर्दीची तुलना तबलिगी जमातीच्या मेळाव्याशी केली होती. “तबलिगी जमातीचा विजयी क्षण, यावेळी वांद्र्यात. जगातल्या बेस्ट सीएमच्या घराच्या पिछाडीसच…!!” असे शेफाली वैद्य यांनी म्हटले होते. यावरून पनवेलकर यांनी तक्रार दाखल केली. शेफाली वैद्य यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणे, दोन धर्मींयात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणे अशा कलमांखाली गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पनवेलकर यांनी केली. सुनयना होले यांच्या विरोधात देखील अशाच आशयाची तक्रार दाखल केली पण अद्याप त्याची दखल घेतली गेलेली नाही.
एरवी शिवसेना नेत्यांनी तबलिगी जमाती विरोधात आकाश पाताळ एक केले असते. पण आता महाराष्ट्रातल्या सत्तेच्या दगडाखाली हात अडकल्याने ते तबलिगीं विरोधातील एक शब्दही खपवून घेऊ शकत नाहीत की स्वत: लिहू शकत नाहीत. ते आता देशाच्या बाजूने बोलणाऱ्यांच्या विरोधातही बोलू, लिहू लागले आहेत. तक्रारी दाखल करू लागले आहेत. याचे महाराष्ट्रातल्या जनतेला वैषम्य वाटते आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App