नाशिक : खासदार वरुण गांधी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दिल्लीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी वरूण गांधी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब करतील असे मानले जात आहे. तशा बातम्या विविध प्रसारमाध्यमांमध्ये आल्या आहेत. Varun Gandhi will leave BJP and join Trinamool Congress ?? … is it just displeasure with BJP or something else … ??
पण या बातम्यांमध्ये नावीन्य काही नाही. कारण वरूण गांधी भाजप मध्ये नाराज आहेत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यांच्या मातोश्री खासदार मनेका गांधी यांना भाजप कार्यकारिणीमध्ये स्थान दिले नाही. ही त्याची कारणे आहेत. मनेका गांधी आणि वरुण गांधी या दोन्ही नेत्यांनी मध्यंतरीच्या काळात भाजपच्या राजकीय धोरणांवर अनेकदा टीका केली आहे. वरूण गांधी यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कटाक्ष आहे. एवढे असुनही दोनच दिवसांपूर्वी सुलतानपूर मध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये खासदार मनेका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. ही देखील वस्तुस्थिती आहे. अर्थात प्रोटोकॉल प्रमाणे त्या खासदार म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
पण प्रश्न त्याच्या पलिकडचा आहे वरुण गांधी भाजपमध्ये नाराज आहेत ही बातमी नवीन नसताना त्यांनी आपल्या पुढच्या राजकीय कारकिर्दीसाठी निवडलेला राजकीय पक्ष काँग्रेस नसून तृणमूल काँग्रेस आहे याचा अर्थ सरळ आहे वरूण गांधी यांची राजकीय मुळे ही काँग्रेस परिवारात असेल तरी सध्याच्या सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या काँग्रेसला ते मूळ काँग्रेस मानत नाहीत वरून गांधी यांचे पिताश्री संजय गांधी हे राजीव गांधी यांच्या आधी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय होते. त्यांचे जर विमान अपघातात निधन झाले नसते तर आज काँग्रेसचे जे स्वरूप आहे ते स्वरूप त्या पक्षाला कधीच प्राप्त झाले नसते. संजय गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने वेगळे वळण घेतले असते. त्यामुळे वरुण गांधींना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की संजय गांधी यांचा वारसा आपल्याला काँग्रेसमध्ये उपयोगी पडणार नाही. त्याच बरोबर आपल्या पिताश्रींच्या वारसा न मानणाऱ्या काँग्रेसमध्ये ते न जाता तृणमूल काँग्रेस मध्ये जाऊन आपले राजकीय भवितव्य अधिक उज्वल करण्याचा प्रयत्न करतील.
आधीच ममता बॅनर्जी या काँग्रेस फोडून आपल्या तृणमूळ काँग्रेसला बळकट करून भारताच्या राजकीय नकाशवर काँग्रेसला political replacement देऊ इच्छितात. आपलीच तृणमूळ काँग्रेस ही खरी काँग्रेस आहे, हे त्या सिद्ध करू पाहत आहेत. वरूण गांधी हे भाजपमधून तृणमूळ काँग्रेसमध्ये जाऊन त्यालाच बळकटी देण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App