जखमेवर वेदनाशामक गोळीपेक्षा हळदच भारी


हळदीच्या औषधी गुणधर्मांबद्दल आपल्याला माहिती आहेच. त्यामुळे आपण हळदीच्या पेंटटसाठी काही वर्षांपूर्वी मोठी कायदेशीर लढाई दिली होती. त्यात यशही मिळवले होते. आता परदेशी तज्ज्ञांनीही हळदीमधील औषधी गुणधर्म मान्य केले आहेत. कोणत्याही जखमेवर वेदनाशामक गोळीपेक्षा हळद जास्त प्रभावीपणे काम करत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे संशोधन युरोपियन रिव्ह्यू फॉर मेडिकल अँड फार्माकॉलॉजिकल सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. यात म्हटले आहे की खेळताना खेळाडूंना दुखापती होत असतात. विशेषत: रग्बी खेळात खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे. खेळाडू जखमी झाल्यावर त्याला तातडीने वेदनाशामक गोळी दिली जाते, यामुळे तात्पुरत्या प्रमाणात वेदना कमी होत असली, तरी गोळीचा काही प्रमाणात साइट इफेक्टळ होऊन खेळाडूच्या खेळावर परिणाम होतो. त्याऐवजी खेळाडूच्या जखमेवर हळदीचा लेप लावण्यास सुरवात केली. Turmeric is heavier than a painkiller on the wound

हा अगदी नैसर्गिक उपाय असल्याने कोणतेही सेप्टिक न होता, जखम लवकर भरून आली, तसेच खेळाडूला कोणत्याही साइड इफेक्ट ला सामोरे जावे लागले नाही. यावर अधिक संशोधनासाठी इटालियन पिआसेन्झा क्लाब च्यावतीने जखमी झालेल्या पन्नास रग्बी खेळाडूंची निवड केली. त्यांच्या दोन टीम करून एका टीमवर हळदीच्या माध्यमातून, तर दुसऱ्या टीमवर वेदनाशामक गोळ्यांच्या माध्यमातून उपचार केले. यामध्ये हळदीचे उपचार केलेल्या टीमच्या खेळाडूंना लवकर बरे वाटले आणि त्यांच्या हाडांची झीजही भरून आल्याचे लक्षात आले. आपल्याकडे आजही लहान मुलाला थोडे लागले किंवा खरचटले तर हळद लावायची पद्धत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात अजूनही याच पद्धतीचा वापर केला जातो. हळद वापरायेच फायदे आपल्याला माहिती आहेत त्यामुळे आपण असे करतो. पण हळदीचे गुण आता परदेशातही मान्य होत आहेत आणि त्याचा नव्या आधुनिक जगात प्रसार होत आहे ही निश्चितच चांगली बाब आहे.

Turmeric is heavier than a painkiller on the wound

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण