विज्ञानाची गुपिते : पृथ्वीसारखे १३०० ग्रह बसतील इतका गुरूचा आकार मोठा


सध्या सूर्यास्तानंतर पश्चिरमेच्या क्षितिजावर दोन चांदण्या चमकताना दिसतात. त्यातील पश्चि्मेकडील चांदणी अतिशय प्रखर दिसेल, तर त्यामागची दुसरी त्याहून थोडी सौम्य ! या दोन चांदण्या दुसरे तिसरे काही नसून आपल्या सूर्यमालेतील गुरू आणि शनी हे महाकाय ग्रह आहेत. पृथ्वीसारखे १३०० ग्रह बसतील इतका गुरूचा आकार आहे, तर शनीचा आकार त्याहून थोडासा कमी. वायूपासून बनलेले हे दोन महाकाय ग्रह सूर्यमालेच्या आजच्या अस्तित्वाचे, पर्यायाने आपलेही रक्षक आहेत. सूर्याभोवती ग्रहांच्या भ्रमणकक्षा स्थिरावल्या तर त्या याच दोन ग्रहांमुळे ! विशेषतः गुरू ग्रहाची यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सूर्यमालेचा समतोल तर याच ग्रहामुळे राखला जातो. The secret of science: Jupiter is big enough to fit 1300 planets like Earth

शनी आणि गुरूची निर्मिती नक्की कोठे आणि कशी झाली, याबद्दल आजवर अनेक सिद्धांत मांडण्यात आले आहेत. शास्त्रज्ञांनी आता संगणकीय सिम्युलेशनच्या साह्याने गुरू आणि शनी ग्रहाच्या निर्मितीचे ठिकाण शोधले आहे. यामुळे आपल्या सूर्यमालेची निर्मिती किती आगळीवेगळी आणि दुर्मीळ आहे, हे स्पष्ट होते. तसेच, शनी आणि युरेनसमध्ये सुरवातीच्या काळात असलेला अतिरिक्त ग्रह बाहेर टाकण्याच्या सिद्धांतालाही पुष्टी मिळाली आहे. कोर्नेगी इन्स्टिट्यूटच्या डॉ. मेट क्लेषमंट यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले आहे.सूर्य आणि त्याभोवती फिरणारे ग्रह ही सूर्यमालेची रचना निश्चि तच अद्भुत आहे.

या रचनेचा प्रवास उलगडण्यासाठी शास्त्रज्ञांनी सहा हजार गणितीय सिम्युलेशन्सचा अभ्यास केला. त्यानंतर आजच्या वास्तवाशी जवळ जाणारा नवीन सिद्धांत त्यांनी मांडला. यामुळे निश्चिातच गुरू आणि शनीच्या निर्मितीचा ठावठिकाणा लागला असून, त्याचबरोबर आपली सूर्यमालेची अभियांत्रिकी किती भिन्न आणि दुर्मीळ आहे, हे स्पष्ट झाले आहे. आपल्या आजच्या अस्तित्वाचा शोध शास्त्रज्ञ नवनव्या साधनांद्वारे घेतच राहणार आहेत. त्यातील एक टप्पा या शोधाच्या रूपाने पूर्ण झाला आहे.

The secret of science: Jupiter is big enough to fit 1300 planets like Earth

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात