लिहण्याचा आणि मेंदूचा जवळचा संबंध, त्यामुळे लिहते व्हा

लोकांची हाताने लिहण्याची सवयच आता मोडत आहे. मात्र लिहण्याचा आणि मेंदूचा जवळचा संबंध आहे याची अनेकांना कल्पना नसते. प्रत्येकाची लिहिण्याची छबी, ढब ही वेगळीच असते. जसे दोन चेहरे सारखे नसतात, तशी दोन हस्ताक्षरंही तंतोतंत सारखी नसतात. The close relationship between writing and the brain, so be it

अगदी पेन धरण्याच्या पद्धतीपासून सगळचं वेगळं असतं. आपलं व्यक्तिमत्त्व आपल्या  हस्ताक्षरात प्रतिबिंबित होत असतं आणि त्यासाठी खास ग्राफॉलॉजीसारखे अभ्यासक्रमही आहेत, हस्ताक्षर तज्ज्ञ आहेत. कॅलिग्राफीसारख्या कलेमधून आपल्याला अक्षरांचा उत्कट आविष्कारच पाहायला मिळतो. आणि अक्षरं अधिक बोलकी होतात. यात मेंदूला फार छान प्रकारे आव्हान मिळत असते.

हल्ली डिजिटलायझेशनमुळे हातानं लिहिणं खूप कमी झालंय. याच धर्तीवर मध्यंतरी अमेरिकेत असा एक प्रवाह येऊ लागला होता की, अभ्यासक्रमात हस्ताक्षर शिकवणंच बंद करावं का. पण हस्ताक्षराचे अनेक फायदेही त्यावेळी समोर आले. हातानं लिहिताना कल्पकता वाढते, आकलनक्षमता वाढते, लिहिताना आपला मेंदू पूर्णपणे काम करतो, एकाग्रता वाढते. मेंदूला चालना मिळते. समस्या सोडवण्याचं कौशल्य आत्मसात होतं.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाचं म्हातारं होणं लांबतं. पूर्वीचा बोरू असो व आताचं शाई पेन. दोन रुपयांचं पेन असो वा हजार रुपयाचं, अक्षरांचं खरं सौंदर्य तर लिहिणाऱ्याच्या हातातच असतं. टायपिंगच्या युगात फक्त हस्ताक्षर दिवसालाच नाही तर एरवीही जमेल तशी जमेल तेवढी अक्षराची गंमत अनुभवायला हवी. त्याचे फायदे केवळ मानसिक आनंद मिळवण्यासाठीच नाहीत तर अनेक आहेत. त्यामुळे तुमच्या मेंदूला एक चांगली प्रेरणा मिळत असते. त्यामुळे सध्याच्या काळात केवळ संगणक तसेच मोबाईलवर टाईप करण्याची सवय लोगलेल्या तरुणाईला केवळ परिक्षेतच लिहावे लागेल की काय अशी परिस्थीती निर्माण झाली आहे.

मात्र त्यामुळे चांगले हस्ताक्षर किंवा तू कला लोप पावण्याचा धोका आहे. त्यापेक्षा समजा रोज शक्य त्यावेळी कागदावर पेन टेकवून स्वच्छ अक्षरांत लिहले की बघा कसा चांगला अनुभव येतो. त्यामुळे मनाला एक उभारी तर येतेच त्याशिवाय मेंदूला वेगळी चालनादेखील मिळते.

The close relationship between writing and the brain, so be it