तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव पुन्हा राहुल गांधींच्या समर्थनात; पण नेमके “राजकीय रहस्य” काय??


तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या समर्थनाची उतरले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वकर्मा यांनी राहुल गांधी नेमके कोणत्या वडिलांचे आहेत? हा वादग्रस्त सवाल केल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्याची मागणी चंद्रशेखर राव यांनी परवाच केली होती. आज पुन्हा एकदा ते राहुल गांधी यांच्या समर्थनाची उतरले आहेत.Telangana Chief Minister Chandrasekhar Rao again in support of Rahul Gandhi

राहुल गांधींनी पाकिस्तानातल्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागितले यात गैर काय केले? मी सुद्धा हाच प्रश्न केंद्र सरकारला विचारतो. जनतेच्या मनात सर्जिकल स्ट्राइक बद्दल काही शंका आहेत. त्यांची उत्तरे देणे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही राजे किंवा सम्राट नसता. जनतेला जबाबदार लोकप्रतिनिधी असता. भाजपा नेहमी खोटा प्रपोगंडा करते, अशा शेलक्या शब्दांत मध्ये चंद्रशेखर राव यांनी केंद्रातल्या मोदी सरकारला घेरले आहे.

चंद्रशेखर राव हे यापूर्वी राहुल गांधींच्या समर्थनात उतरले नव्हते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून ते राहुल गांधी यांचे समर्थन करताना दिसत आहेत. याचे नेमके “राजकीर रहस्य” काय आहे…?? तेलंगणमध्ये एवढ्यात विधानसभेची निवडणूकही नाही. तरी देखील भाजपवर आक्रमकपणे चंद्रशेखर राव तुटून का पडले आहेत…?? याचे “रहस्य” हैदराबाद पासून 40 किलोमीटरवर असलेल्या शमशाबाद मध्ये तर नाही ना…??

नुकतेच तेथे एका भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी” अर्थात थोर वैष्णव संत रामानुजाचार्य यांच्या अतिभव्य पुतळ्याचे उद्घाटन केले आहे. या कार्यक्रमाला रामानुजाचार्य यांचे अनुयायी तर उपस्थित होतेच. परंतु मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात प्रोटोकॉल नुसार तेलंगणच्या राज्यपाल तमिलीसाई सुंदरम उपस्थित होत्या. परंतु या कार्यक्रमाला मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखरा उपस्थित नव्हते. या कार्यक्रमानंतर गेल्या 11 दिवसांत मध्ये दररोज केंद्रातले कोणी ना कोणी महत्वाचे नेते संत रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याला भेट देऊन तेथील मंदिरांचे दर्शन घेत आहेत. यामध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर, जी. किशन रेड्डी यांचा समावेश आहे. काल तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मुख्य मंदिरात 120 किलो सोन्यात घडवलेल्या संत रामानुजाचार्य यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. गेले 11 दिवस चाललेल्या या सर्व कार्यक्रमाचे “राजकिय वैशिष्ट्य” असे की त्या कार्यक्रमांमध्ये तेलंगण सरकारच्या प्रतिनिधी म्हणून राज्यपाल तमिळसाई सुंदरम उपस्थित राहत आहेत. परंतु मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांची उपस्थित राहिलेले नाहीत. त्यांनी संबंधित कार्यक्रमांना जाण्याचे टाळले तरी आहे अथवा त्यांना निमंत्रण तरी नाही…!!

आपल्याच तेलंगण राज्याच्या राजधानी पासून जवळ असलेल्या एका छोट्याशा शहरात एवढे मोठे वैष्णव संताचे केंद्र उभे राहते आणि आपण त्याला उपस्थित राहत नाही या विषयीची विशिष्ट खंत चंद्रशेखर राव यांना असू शकते. किंबहुना या सर्व प्रकारात जे राजकारण सुरू आहे त्यात त्यातूनच त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून भाजपवर जोरदार तोफा डागायला सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन दक्षिणी राज्यांमध्ये लक्ष घालत आहेत. भाजपचे संघटन तिथे मजबूत करण्याचे त्यांनी प्रयत्न चालवले आहेत.

या पार्श्वभूमीवर संत रामानुजाचार्य यांचा भव्य पुतळा उभा राहिला आहे. त्या कार्यक्रमांमध्ये भाजपची एक प्रकारे संघटनात्मक पायाभरणी करण्याचे काम देखील दिसून येत आहे. अशा स्थितीत प्रतिहल्ला चढविणे हे चंद्रशेखर राव यांना संयुक्तिक वाटत असावे आणि त्यातून त्यांनी राहुल गांधींचा मुद्दा हाताशी धरून केंद्र सरकारच्या दिशेने तोफा डागायला सुरूवात केल्याचे दिसून येत आहे.

Telangana Chief Minister Chandrasekhar Rao again in support of Rahul Gandhi

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था