चक्क पाण्यातील मोठाले मासे खाणारे कोळी


पृथ्वीवरील प्राणीसृष्टी ही अद्भुत आहे. पृथ्वीवर हजारो प्रकारचे जीव आणि त्यांचे लक्षावधी प्रकार वास्तव्य करतात. त्यातील अनेक प्राणी आपल्याला नेहमी दिसतात तर काही घनदाट जंगलात वास्तव्य करून असतात. आता घरोघरी दिसणाऱ्या कोळ्याचे उदाहरण घ्यायचे झाले तरी आपल्याला थक्क व्हायला होते. Spiders can eats fish also

कोळ्याचे जाळे आपण अनेकदा ठिकठिकाणी पाहिलेले आहे. या जाऴयात अडकलेला कीटक, माशी खावून हे कोळी आपले पोट भरतात. मात्र कोळ्यांच्या काही जाती चक्क पाण्यात पोहणारे, अतिशय चंचल मासे सुद्धा सहज खातात हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. सध्या जगात कोळ्यांच्या १०९ विविध जाती आहेत. यातील अठरा प्रकारचे कोळी चक्क पाण्यातील माशांची शिकार करुन त्यांना गट्ट्म करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. अर्थात हे कोळी तुलनेने लहान मासे खात असतात.

तरीही काही कोळी आपल्या स्वतःच्या वजनाच्या पाच पटीने जादा मोठ्या असलेल्या माशांचीसुद्धा शिकार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. फ्लोलिडासारख्या दलदलीच्या प्रदेशात ते मुबलक प्रमाणात आहेत. येथील पाणवठ्यावर आक्सीजनचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यामुळे आक्सीजनच्या शोधात मासे पाण्याच्या पृष्ठभागावर सहज येतात. त्यांना हे कोळी आपले भक्ष्य करतात. अमेरिकेतील सहा पायांचा फिशींग स्पायडर तसेच भारतात आढळणारा पॅंड वूल्फ स्पायडर, ब्रिटनमधील ग्रेट रिफ्ट स्पायडर हे तुलनेने लगेच शिकार करणारे कोळी मानले जातात.

प्रामुख्याने दलदलीचा प्रदेश, तलाव येथे हे स्पायडर सहज दिसून येतात. हे कोळी आपल्या पायांच्या आधाराने माशांना मारतात. हे स्पायडर पोहू शकतात. तसेच त्यांच्या कमी वजनामुळे शांत असलेल्या पाण्याच्या पृष्ठभागावर सहजपणे चालू शकतात. त्यामुळे पृष्ठभागावर श्वसनासाठी आलेल्या माशाला ते त्यांच्या पायांमध्ये जखडून ठेवतात. त्याला मारतात व खातात.

Spiders can eats fish also

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात