संयुक्त किसान मोर्चा पंजाबमध्ये निवडणूक प्रचारापासून दूर राहणार… पण का??; रहस्य नेमके काय…??


पंजाबच काय पण खुद्द त्यांचे गृह राज्य उत्तर प्रदेश यात देखील आता राकेश टिकैत यांचा जनाधार घटला आहे. त्यांची नेतृत्वशैली जुनी आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या यशात किंवा अपयशात त्यांचा वाटाच काही असणार नाही. याची पक्की जाणीव झाल्यानेच त्यांनी संयुक्त किसान मोर्चाला निवडणूक प्रचारापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते आहे. Rakesh Tikait and Sanyukt Kisan Morcha to keep away from election campaign in punjab… but what is the real reson for that…??


विनायक ढेरे

गेले आठ-दहा महिने केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याने विरोधात आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने आगामी विधानसभेत निवडणुकीत प्रचारापासून दूर राहण्याचा इशारा शेतकरी आंदोलकांना दिला आहे. विशेषतः पंजाबमधल्या विधानसभा निवडणूक प्रचारापासून शेतकरी आंदोलकांनी दूर राहावे, असा संयुक्त किसान मोर्चाने त्यांना इशारा दिला आहे. प्रचारामुळे आपले आंदोलन मोडीत निघेल किंबहुना काही राजकीय पक्ष तोच प्रयत्न करीत आहेत, असा संयुक्त किसान मोर्चाचा आरोप आहे. पण यामागचे नेमके रहस्य काय…??, हे समजून घेतले पाहिजे.

राकेश टिकैत हे संयुक्त किसान मोर्चाचे नेते आहेत. ते जाट बहूल पश्चिमी उत्तर प्रदेशातून येतात. पंजाबमध्ये एका अर्थाने त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रभाव नाही. पण यापेक्षाही वेगळे रहस्य यात दडले आहे, ते असे की पंजाबमधला कोणताच राजकीय पक्ष राकेश टिकैत यांना हिंग लावून विचारायला तयार नाही. केंद्रातला विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस जरी शेतकरी आंदोलकांच्या पाठीशी असल्याचे दाखवत असली तरी पंजाबचा सध्याचा सत्ताधारी पक्ष म्हणून त्या पक्षाची भूमिका वेगळी आहे.

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने कृषी कायद्यांविरोधात विधानसभेत ठराव मंजूर करून घेतलेत हे खरे आहे. परंतु काँग्रेसला या कायद्यांच्या अपरिहार्यतेची पक्की जाणीव आहे. विशेषतः कॅप्टन अमरिंदरसिंग आणि त्यांच्या काँग्रेस मधल्या गटाला तर हे कायदे हवेच आहेत, कारण ज्याप्रकारे शिरोमणी अकाली दल कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून केंद्रातल्या मोदी सरकार मधून बाहेर पडले, हरसिमरत सौ बागल यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला ते पाहता केंद्राने आणलेले कृषी कायदे नेमके कोणाला टोचले आहेत याचे रहस्य बाहेर येते. त्यामुळे परस्पर जर अकाली दलाचा कृषी कायद्यामुळे “आर्थिक काटा” काढला जात असेल, तर तो कॅप्टन अमरिंदरसिंग आणि त्यांच्या समर्थकांना हवाच आहे. अशा स्थितीत कॅप्टन अमरिंदरसिंग शेतकरी आंदोलकांना आणि विशेषतः संयुक्त किसान मोर्चाला “राजकीय धूप” घालायला तयार नाहीत.दुसरीकडे शिरोमणी अकाली दल पंजाबमध्ये सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहत असताना आणि ते शक्य झाले तर राकेश टिकैत यांचा राजकीय रोल त्यामध्ये काहीही असणार नाही, अशी काळजी शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल घेताहेत. त्यामुळे अकाली दलाकडून नाही राकेश टिकैत यांना अपेक्षित असा प्रतिसादच मिळालेला नाही. उरला सुरला आम आदमी पक्ष. आप पक्ष स्वतःच्याच बांधणीत एवढा मग्न आहे, की त्याला कृषी आंदोलकांकडे आणि संयुक्त मोर्चाकडे लक्ष देण्यास वेळ नाही.

अशा राजकीय स्थितीत राकेश टिकैत यांना जेव्हा हे लक्षात आले, की आपल्याला पंजाबमध्ये हिंग लावूनही कोणी विचारणार नाही, तेव्हा त्यांनी आपण प्रचाराच्या फंदात न पडलेले बरे असे ठरविलेले दिसते. आणि त्यातूनच संयुक्त किसान मोर्चाने शेतकरी आंदोलकांना प्रचारापासून बाजूला राहण्याचे आवाहन केले आहे.

उत्तर प्रदेशातला राजकीय अँगलही महत्त्वाचा

शिवाय उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचा ही राजकीय अँगल संयुक्त किसान मोर्चाच्या या निर्णयाला आहे. इथे तर मुख्य लढत भाजप विरुद्ध अन्य पक्ष अशी आहे. राकेश टिकैतांचा “राजकीय रोल” उत्तर प्रदेशात जाट बहूल उपप्रदेशापुरता मर्यादित आहे. तेथेही भाजपचा राजकीय प्रभाव एवढा वाढला आहे, की राकेश टिकैत यांना शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने गेल्या आठ – दहा महिन्यांमध्ये तिथे आपले पसरलेले हात पाय आवरण्याची वेळ आली आहे. शिवाय राकेश टिकैत म्हणजे काय महेन्द्रसिंग टिकैत नव्हेत. महेंद्रसिंग टिकैत यांचे स्वतःचे प्रभाव क्षेत्र मोठे होते. तसे राकेश टिकैत यांचे नाही. शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने त्यांचे नाव पुढे आले एवढेच.

शिवाय राकेश टिकैत आज ज्या प्रकारचे शेतकऱ्यांचे नेतृत्व करतात, तसे नेतृत्व किंवा त्या नेतृत्वाची स्टाईल ही 1980 च्या दशकातील जुनी स्टाइल आहे. 40 वर्षांपूर्वीची जुनी स्टाईल कोणीही स्वीकारायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे. राकेश टिकैत यांनी संयुक्त किसान मोर्चाचे नवे तरूण नेतृत्व तयार होऊन दिलेले नाही. त्यामुळे आधीच घटता जनाधार आणि त्यात राजकीय पक्षही महत्त्व द्यायला तयार नाहीत. त्यांच्या यशात किंवा अपयशात आपला काहीही वाटा असणारच नाही, हे राकेश टिकैत यांच्या लक्षात आल्यामुळे यांनी निवडणूक प्रचारापासून सुटकेचा मार्ग अवलंबिल्याचे दिसते. म्हणूनच संयुक्त किसान मोर्चाला त्यांनी पंजाब निवडणुकीच्या प्रचारात असून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. राकेश टिकैत यांच्या घटत्या राजकीय आणि सामाजिक प्रभावात या निर्णयाचे “रहस्य” दडलेले आहे.

Rakesh Tikait and Sanyukt Kisan Morcha to keep away from election campaign in punjab… but what is the real reson for that…??

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर