पावसाळा आणि सुगरणीचे घरटे


सध्या उन्हाळा सरत आला असून पावसाचे वेध लागले आहेत. माणसाला जसा ऋतूबदल जाणवत असतो तसेच प्राणी व पक्षीही ऋतूबदलाची आतुरतेने वाट पहात असतात. चातक पक्षी पावसाची किती आतुरतेने वाट पाहते आपल्याला माहीतीच आहे. त्याचप्रमाणे आकाशात ढग दाटून आले की मोर आनंदाने पिसारा फूलवून नाचू लागतो. उन्हाळा सरत आला की पक्ष्यांची घरटे बांदण्यासाठी धांदल सुरु होते. प्राणी व पक्षी ज्या ठिकाणी अन्नाची, पाण्याची सोय होईल तेथे अधिवास करण्यावर कल असतो. जेथे या गोष्टी मुबलक असतात तेथेच रहायला ते पसंती देतात, तेथेच पक्षी घरटे करतात व प्राणी गुहा शोधतात. सुगरणीचे घरटे तर त्यासाठी प्रसिद्ध आहे. Rain and home nests

सुगरणीचे घरटे पहायचे असेल तर शहराबाहेर जावे लागेल. शहराच्या बाहेर जावून तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल कोणत्याही शेतात विहीरीच्या काठाला जावा, तेथे झाडाच्या फांदीला सुगरण पक्षी आपले टुमदार घरटे सद्या बांधत असेल. पावसाळ्याच्या आधी तेथे त्याचे हे काम वेगाने सुरु असते. सुगरण चार ते पाच घरटी बांधतो. खरे पाहिल्यास त्याचे प्रत्येक घरटे खूप सुंदर व आखीव रेखीव असते. मात्र एका घरट्यावर तो समाधान मानत नाही. कारण मादीला आकर्षित करण्यासाठी तो अनेक घरटी बांधतो. ज्या पक्ष्याचे घरटे चांगले असेल त्याकडे मादी रहायला येते असा निसर्गनियम सांगतो. त्यामुळे मादी ज्या घरट्यात राहील तेथे सुगरण राहतो. ज्या पक्ष्याच्या घरात ती राहील त्या सुगरण पक्ष्याचा विजय मानला जातो. या काळातही काही पक्षी स्थलांतर करतात. निसर्गातील या ऋतूचक्रानुसार त्यांचे स्थलांतर ठरते. प्रत्येक प्रदेशांत ऋतुमानानुसार फरक पडत असतो. तेथील तापमान बदलत असते, पावसाचे प्रमाण बदलते, फळांचा हंगाम बदलत असतो. वातावरण बदलले की पक्ष्यांच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरकांच्या स्त्राव होवू लागते. तो त्यांना उडत दूर जाण्यासाठी प्रेरणा देतो. जेथे जास्त पाउस आहे अशा हिमालयातील पक्षी कमी पावसाच्या प्रदेशाकडे कूच करतात.

Rain and home nests

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात