नाशिक : आपल्या भारत जोडो यात्रेत एकीकडे खासदार राहुल गांधी हे चर्चेसना भेटी देत आहेत. मिशनऱ्यांच्या भेटी घेत आहेत, तर दुसरीकडे त्यांची तुलना राम आणि रामदास स्वामी यांच्याशी झाली आहे!! राहुल गांधी तिकडे दक्षिणेत तामिळनाडू – केरळमध्ये आहेत. त्यांची राम आणि रामदास स्वामींशी तुलना मात्र महाराष्ट्रात झाली आहे.Rahul Gandhi meeting with missionaries and Christians churches but nana patole compared him with ram, Shankaracharya and Samarath ramdas swami
राहुल गांधींनी आपल्या भारत जोडो यात्रेत वादग्रस्त ख्रिश्चन धर्मगुरू आणि हिंदू हेट स्पीच देणारे फादर जॉर्ज पोन्नेया यांची भेट घेतली होती. त्यांच्याकडून त्यांनी येशू ख्रिस्त देव कसा आहे हे समजून घेतले होते. राहुल गांधींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यानंतर चोहोबाजुंनी त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. राहुलजींची ही भेट वादग्रस्त ठरली. पण त्यानंतर देखील त्यांच्या अशा स्वरूपाच्या भेटीगाठी घडल्याच. त्यांनी कुडनकुलम अणु प्रकल्पाला विरोध करणारे मिशनरी उदयकुमार यांची भेट घेतली.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतील भेटीगाठींमध्ये चर्चेस ना भेटी मशिदीला भेट असे कार्यक्रम आधीच निश्चित झाले होते. त्यानुसार त्यांनी विविध चर्चेसना आणि मशिदींना भेटी दिल्या.
पण हेच ते राहुल गांधी आहेत, ज्यांनी 2019 च्या निवडणुकीच्या वेळेला विविध मंदिरांमध्ये जाऊन देवदेवतांची दर्शनी घेतली होती. आपण दत्तात्रेय गोत्र ब्राह्मण असल्याचे सांगितले होते. भारत जोडो यात्रेमध्ये मात्र त्यांनी असा टेम्पल रन करण्याऐवजी चर्चेस आणि मशिदींना भेटीगाठी हा कार्यक्रम आग्रक्रमावर ठेवला आहे.
एकीकडे राहुल गांधींचे या पद्धतीचे राजकीय वर्तन दिसत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या पदयात्रेची तुलना भगवान श्रीराम, आद्य शंकराचार्य, समर्थ रामदास स्वामी यांच्या पदयात्रांशी केली आहे. या महान विभूतींनी पौराणिक आणि ऐतिहासिक काळात देशभर पदयात्रा काढल्या होत्या. त्यानंतर अशी पदयात्रा काढणारे राहुल गांधी हे चौथी व्यक्ती आहेत, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
एकीकडे भारत जोडो यात्रेत चर्चेस, मशिदींना भेटी देऊन काँग्रेससाठी अल्पसंख्यांक मतांची पुन्हा बेगमी करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न, तर दुसरीकडे भगवान श्रीराम, आद्य शंकराचार्य, समर्थ रामदास स्वामी यांच्या पदयात्रांशी तुलना ही विसंगती काँग्रेसमधूनच समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App