कोरोनाच्या संकटात मोदींचे कही पे निगाहे;  कही पे निशाना…!!


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांना प्रत्युत्तरे देताना देशातल्या विविध स्टेक हॉल्डर्सशी थेट बोलत आहेत. हिंदी सिनेगीताच्या भाषेत बोलायचे झाले तर मोदींचे सध्या “कही पे निगाहे कही पे निशाना” असे सुरू आहे. याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे… मोदी विरोधकांनी आणि मोदी समर्थकांनीही…!! PM narendra modi addresses stake holedrs without hindrence of the states


कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी अपयशी ठरले आहेत. या अपयशात त्यांचा खालून पहिला नंबर आला आहे. वगैरे arguments सोशल मीडियावरून जोरदार सुरू आहेत. मोदी या आर्ग्युमेंट्सना प्रत्युत्तरे देत नाहीत. मोदींचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय rating घसरले आहे. परदेशांमधल्या माध्यमांनी तर मोदींना असे काही target केले आहे, की आता ते त्यांच्या जाळ्यातून सुटणे कठीण आहे. याकडे मोदी लक्ष देत नाहीत, अशा काही मोदी समर्थकांच्या देखील तक्रारी आहेत.

विरोधकांच्या हल्ल्यांना मोदी समर्थकांकडून वेगवेगळ्या स्तरांवरून प्रत्युत्तरेही देणे सुरू आहे. कोणी जगातल्या सर्व देशांच्या लोकसंख्येची बेरीज करून त्या लोकसंख्येची तुलना भारताच्या लोकसंख्येशी करून १३८ कोटींच्या लोकसंख्येच्या भारताचे नेतृत्व मोदी करत आहे, हे दाखवून देत आहेत. मग कोरोना कंट्रोल करणे कसे अवघड आहे, हे लक्षात आणून देत आहेत. पण कितीही झाले तरी मोदी समर्थक मोदी विरोधकांवर प्रचार – प्रसाराचा डाव उलटविण्यात असमर्थ ठरल्याचे दिसत आहे. इथे मोदी विरोधकांना सामर्थ्यवान समजण्याचा किंवा मोदी समर्थकांना दुबळे समजण्याचा प्रश्न नाही. मी इथे फक्त general perception नोंदवतो आहे.

पण याचा अर्थ कोरोनाच्या काळात मोदी पूर्णपणे निष्प्रभ ठरलेत. ते विरोधकांना प्रत्युत्तरेच देत नाहीत, असा जर कोणी निष्कर्ष काढत असेल, तर तो अर्धवट आणि चूक आहे. मोदी आपल्या विरोधकांना प्रत्युत्तरे देत आहेत. जरूर देत आहेत. पण ती विरोधकांच्या “पठडीबाज हल्ल्यांना दिलेली पठडीबाज प्रत्युत्तरे” नाहीत. हा महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा इथे लक्षात घेतला पाहिजे.

मोदी हे विरोधकांना प्रत्युत्तरे देताना देशातल्या स्टेक हॉल्डर्सना संबोधित करताना दिसत आहेत. हिंदी सिनेगीताच्या भाषेत बोलायचे झाले तर मोदींचे सध्या “कही पे निगाहे कही पे निशाना” असे सुरू आहे. याचा अर्थ नीट समजून घेण्याची गरज आहे. मोदी साधारण गेल्या आठवडाभरापासून विविध राज्यांमधले प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी – कर्मचारी, शेतकरी, उद्योजकांच्या छोट्या – मोठ्या संस्था यांच्याशी विडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलत आहेत. कधी ते राज्यांचा गट बनवून बोलत आहेत तर कधी उद्योजक, वैद्यकीय प्रतिनिधींचा गट बनवून त्यांना एकत्रितरित्या संबोधित करीत आहेत.



हा सगळा वर्ग भारतातला रूढार्थाने opinion maker नाही. तो मेन स्ट्रीम मीडियामध्ये ठळकपणे डोकावतानाही दिसत नाही. मात्र, तो आपापल्या पातळीवर स्वतःच्या नेटवर्कने घट्ट बांधलेला वर्ग आहे आणि काम करण्याच्या दृष्टीने सर्वांत प्रभावी वर्ग आहे. या वर्गाशी मोदी आता थेट बोलताना दिसत आहेत. आणि इथेच मोदींची विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची मेख दडलेली आहे.

आपल्याच मतमतांतरांची डबडी वाजविणाऱ्यांना मोदी प्रत्युत्तरे देणारही नाहीत. त्यांचे मतपरिवर्तन होणेही शक्य नाही. राम गणेश गडकरींच्या चिंतातूर जंतू या कवितेतील जंतूंप्रमाणे हे घटक आहेत. फारतर त्यांना मतमतांतरे जंतू म्हणता येतील. काहीही झाले, कोणीही सत्तेवर आले तरी ते जंतू आपल्या मतमतांतराची डबडी वाजवत राहणार आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्युत्तरे देण्याची गरज नाही. हे मोदींना उमगले आहे. मोदी समर्थकांनी हे समजून घेण्याची गरज आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या प्रत्युत्तर देण्याच्या स्टाइलची खरी मेख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओळखली आहे. मोदी राज्यांमधल्या जिल्हाधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी थेट बोलतात. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून केंद्रीय पातळीवर देखील राबविण्यासाठी सूचना घेतात, यातली मेख ममता बॅनर्जी यांनी ओळखली आहे आणि कालच त्या मुद्द्यावरून त्यांनी मोदींवर आगपाखडही करून घेतली आहे. मोदी आपल्या विडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांना बोलू देत नाहीत. ही ममतांची तक्रार वरवरची आहे. त्यांची खरी तक्रार ही मोदी हे थेट जिल्हाधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि राज्यांमधल्या अन्य स्टेक होल्डर्सशी बोलतात आणि त्यांच्यात केंद्र सरकारविषयी विश्वास निर्माण करतात ही आहे. राज्यांमध्ये सरकारे कोणतीही असोत आपण तुमच्या पाठीशी आहोत, हा मोदींनी अधिकाऱ्यांना विश्वास देणे म्हणजे काय, याचा अर्थ ममता बॅनर्जींनी “पुरता ओळखला” आहे.

मोदींच्या विरोधकांपैकी ममतांसारखा एखाद-दुसरा अपवाद वगळता अन्य कोणाला हा अर्थ ओळखता आलेला नाही. मोदी समर्थकांनाही तो नीट कळलेला नाही. आणि हेच खरे मोदी विरोधक आणि मोदी समर्थकांचे समान पातळीवरील अपयश आहे.  

PM narendra modi addresses stake holedrs without hindrence of the states

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात