केंद्रातील नंबर 1 आणि नंबर 2 ची मराठी प्रांतांमध्ये आज एकाच वेळी (अ)राजकीय मुशाफिरी!!

नाशिक : कृषी कायदे मागे घेणे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे, उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणूक, काशी विश्वनाथ कॉरिडोर मधले कार्यक्रम, राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्या मधला राजकीय संघर्ष त्यात शरद पवार यांची मध्यस्थी या राष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रातले नंबर 1 आणि नंबर 2 आज मराठी प्रांतांच्या राजकीय मुशाफिरीवर आहेत. PM Modi and Amit Shah today in Goa and Maharashtra

त्यातले नंबर 2 कालपासूनच मराठी प्रांत महाराष्ट्रामध्ये आहेत. काल त्यांनी प्रवरानगर मध्ये येऊन देशातल्या पहिल्या सहकार परिषदेला संबोधित करताना महाराष्ट्रातल्या आदर्श सहकार चळवळीत कशा अपप्रवृत्ती घुसल्या आहेत, एकेकाळी महाराष्ट्रातल्या जिल्हा सहकारी बँकाचे जाळे मजबूत असताना त्यामध्ये करोडोंचे घोटाळे होऊन तीनच जिल्हा सहकारी बँका कशा शिल्लक उरल्या आहेत याचे वर्णन केले. सहकार क्षेत्र अडचणीत आहे असे सांगणारेच नेतेच कसे सहकारी साखर कारखाने कारखान्यांचे खासगीकरण करून त्या खासगी कारखान्यांचे मालक बनले आहेत, या विषयी बोलले. नंबर 2 पुण्यात आहेत. त्यांनी सकाळी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेतले आहे. त्यानंतर नॅशनल फॉरेन्सिक लॅब रोटरीचे त्यांनी उद्घाटन केले आहे. या सर्व दौऱ्यामध्ये आपण राजकीय भाष्य करायला आलेलो नाही असे नंबर2 यांनी आवर्जून सांगितले आहे.



तर नंबर 1 आज गोव्यात आहेत. गोवा मुक्ती दिनाच्या मुक्ती दिनाचा साठावा वर्धापन दिन नंबर 1 च्या उपस्थित पणजीच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होत आहे. हा संपूर्ण राज्याचा कार्यक्रम आहे राजकीय पक्षाचा नाही. तो नंबर 1 च्या उपस्थित होत आहे. अर्थातच तेथे गोवामुक्ती संग्रामाचे वर्णन होईल. जनतेने कसे धैर्याने लढ्याला तोंड दिले संघर्ष केला, या विषयी बोलले जाईल. यात राजकीय भाष्य असणार नाही.

गोवा हा देखील निवडणुकीचा हॉटस्पॉट आहे. तेथे आधीच ममता बॅनर्जी यांचे दोन दौरे होऊन गेले आहेत. प्रियांका गांधी यांचा दौरा झाला आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह आठ उमेदवारांची यादी देखील जाहीर करून आघाडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस फोडून देखील काँग्रेसचे मनोधैर्य खचले नसल्याचे हे उदाहरण आहे.

या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या नंबर 1 चा गोवा दौरा आज होतो आहे आणि यामध्ये गोव्याच्या राज्य राष्ट्रीय कार्यक्रमात ते सहभागी होत आहेत. अर्थातच ते यामध्ये राजकीय भाष्य करणार नाहीत, तर गोव्यातल्या तमाम जनतेला ते उच्च पातळीवरून संबोधित करतील. राष्ट्रीय पातळीवर विविध मुद्द्यांवर राजकीय घमासान सुरू असताना केंद्रातले नंबर 1 आणि नंबर 2 मात्र राठी प्रांतांमधल्या बिगर राजकीय दौर्‍यावर आहेत. यातून कोणाला काही राजकीय अर्थ काढायचे असतील, तर ते काढायला मोकळे आहेत. तसे काढायला नंबर 1 आणि नंबर 2 यांचा विरोध असण्याचे कारण नाही आणि असलाच तरी त्याला लोकांनी जुमानण्याचे कारण नाही. कारण या देशात लोकशाही आहे आणि ती अबाधित राहिली पाहिजे, असे नंबर 1 आणि नंबर 2 यांचेही मत आहे. पण त्यामुळे नंबर 1, नंबर 2 यांच्या मराठी प्रांतांमधल्या “बिगर राजकीय” दौऱ्यानंतर या मराठी प्रांतांमध्ये कोणते “राजकीय” घमासान नव्याने सुरू होते हे पाहणे रंजक ठरणार आहे…!!

PM Modi and Amit Shah today in Goa and Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात