विरोधक विरुद्ध मोदी; वातावरण निर्मिती आणि पायाभरणी!!


संसदेचे सध्या सुरू असलेले हिवाळी अधिवेशन राजकीय दृष्ट्या काही संदेश देशभरात देताना दिसते आहे. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करून एक पाऊल मागे घेतले. त्यातून सर्व विरोधी पक्षांनी स्वतःसाठी राजकीय वातावरण निर्मितीची चलाखी करून घेतली आहे. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार, तेलंगण मधील टीआरएस पक्ष या सगळ्या पक्षांनी या राजकीय वातावरण निर्मितीत आपापल्या परीने भर घातली आहे.Opposition v/s Modi perception v/s consolidation

विरोधी पक्ष भले काँग्रेसच्या विरोधात विशिष्ट मुद्द्यांवर भांडत असतील, परंतु भाजप विरोधात वातावरण निर्मिती करण्यात ते कुठे कमी पडताना दिसत नाहीत. संसदेच्या विद्यमान हिवाळी अधिवेशनात देखील 12 निलंबित खासदारांचा मुद्दा लावून धरतानाच राहुल गांधींनी शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या ७०० शेतकऱ्यांचा कुटुंबियांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. ४०० जणांची यादी त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केली आहे. सरकारकडे या यादीचे उत्तर नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या वक्तव्याचा हवाला दिला आहे. मोदी सरकारकडे शेतकरी आंदोलनात मृत झालेल्या व्यक्तींची यादी नाही, हे वक्तव्य नरेंद्रसिंह तोमर यांनी केले होते. त्यामुळे राहुल गांधी यांना या मुद्द्यावरून सरकार विरोधात वातावरण निर्मिती करण्याची संधी मिळाली हे मान्य करावे लागेल. ती त्यांनी जरुर घेतली आहे.त्याचबरोबर सर्व विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून तसेच १२ खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून उद्यापासून अधिवेशनावर बहिष्कार घालणार आहेत. सरकार विरोधात वातावरण निर्मितीचा हा पुढचा टप्पा आहे. हा टप्पा पुढे कसा जाईल हे येणारा काळ ठरवेल.

पण एकीकडे विरोधक अशी वातावरण निर्मिती करण्याच्या मागे लागले असताना केंद्रात सत्ता असलेला भाजप नेमके काय करतो आहे?, याची चाहूल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून दिसून येते. देशभरातील सर्व माध्यमांनी पंतप्रधानांनी भाजप खासदारांना अधिवेशनात उपस्थित राहण्याचा इशारा दिला. अन्यथा बदल घडतील, असे सांगितले. या आशयाच्या बातम्या दिल्या. पंतप्रधानांनी भाजपच्या खासदारांना झापले, असे माध्यमांचे विश्लेषण आहे…!!… ते खरेही आहे.
पण पंतप्रधानांचे हे भाषण भाजप खासदारांना फक्त झापण्यापुरतेच मर्यादित आहे का…??, तर याचे उत्तर “नाही” असे द्यावे लागेल. कारण पंतप्रधानांनी भाजप खासदारांना जनसंपर्काच्या नवीन टिप्सही दिल्या आहेत. केंद्र सरकारने जनसामान्यांमध्ये पद्म पुरस्कारासाठी ज्या सन्मानित व्यक्ती निवडल्या आहेत, त्या व्यक्तींचे लाईव्ह संवाद ठेवा. त्यांच्याकडून युवकांना प्रोत्साहन मिळेल अशा स्वरूपाचे कार्यक्रम घ्या. तसेच भारतीय खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठे महोत्सव आयोजित करा. सूर्यनमस्कार स्पर्धा घ्या. बालके आणि महाविद्यालयीन युवकांवर लक्ष केंद्रित करा. त्यातून नवे कार्यकर्ते मिळतील. अधिवेशनामध्ये उपस्थिती लावून स्वतःचे योगदान वाढवा, या त्या महत्त्वाच्या टिप्स पंतप्रधानांनी खासदारांना दिल्या आहेत. या सर्व खासदारांच्या दृष्टीने निवडणूक पायाभरणीचा टिप्स आहेत.

एकीकडे सर्व विरोधी पक्ष वातावरण निर्मितीच्या मागे लागलेले असताना पंतप्रधान मोदी मात्र भाजप खासदारांना आपापल्या मतदारसंघात पायाभरणी पक्की करा, हे सांगताना दिसले आहेत.

आणि इथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचे वेगळेपण आहे. मोदींची कार्यशैली नीट लक्षात घेतली, तर ते साधारणपणे निवडणुकीत पक्षाच्या विद्यमान लोकप्रतिनिधींची तीस ते पस्तीस टक्के तिकिटे कापतात. त्यातून अँटी इन्कम्बन्सी नावाच्या मुद्द्याची धार कमी करण्याचा प्रयत्न करतात. गुजरातच्या 2002 च्या निवडणुकीपासून ते 2019 च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत हा सर्वसाधारण अनुभव आहे. यात मोदींचे स्वतःचे काही निकष आहेत. त्यामध्ये अभिनव पद्धतीने जनसंपर्क हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे आणि आज त्यांनी दिलेल्या टिप्स मधला तो सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे…!!

इथेच विरोधक आणि भाजप विशेषत: मोदींच्या नेतृत्वाखालचा भाजप यात फरक दिसून येतो. विरोधक वातावरण निर्मिती करण्यामध्ये आपली शक्ती आणि ऊर्जा खर्च करतात, तर मोदींच्या नेतृत्वाखालचा भाजप पायाभरणी पक्की करण्यात शक्ती आणि उर्जा जपून खर्च करताना दिसतो. याचा अर्थ वातावरण निर्मितीकडे मोदी दुर्लक्ष करतात असाही नाही किंबहुना विरोधकांची वातावरणनिर्मिती करून संपली की मोदींची वातावरणनिर्मिती सुरू होते, जिला आधी केलेल्या पायाभरणीचा उपयोग होतो…!! त्यामुळेच मोदींनी, भाजपच्या खासदारांना इशारा दिला, बदल घडेल,” वगैरे हेडलाईनच्या पलीकडे जाऊन त्यातला संदेश पकडण्याची गरज आहे आणि तो संदेश खासदारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये पायाभरणी पक्की करावी हा आहे…!!

Opposition v/s Modi perception v/s consolidation

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था