विज्ञानाची डेस्टिनेशन्स : आता अवघ्या तीस सेकंदात करा मोबाईल चार्ज


सुरुवातीला लोक मोबाईलचा वापर फक्त फोनवर संवाद साधण्यासाठी करत. कालांतराने मोबाईलमध्ये बदल होते गेले. नवनवीन टेक्नॉलाजी येऊ लागल्या तसा मोबाईलचा संवादाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी वापरही वाढला. Now charge the mobile in just thirty seconds

मोबाईलचा वापर गाणी ऐकणे, व्हीडीओ पाहणे तसेच सोशल मिडीयाच्या वापरासाठीच आता जास्त होत आहे. सध्या स्मार्टफोन्सनी तरुणांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केलेली आहे. याचा सर्वाधिक परिणाम होतो तो मोबाईलच्या बॅटरीवर. स्मार्टफोनवरील विविध अँप्सच्या आणि इंटरनेटच्या वापरामुळे दिवसभरातच मोबाईलची बॅटरी कमी होऊ लागते.

आता इंटरनेट डेटाचा फारसा प्रश्न नाही. कारण आपल्याकडे तर अनेक कंपन्या रोज तब्ब्ल दीड जीबी डेटा फ्री देतात. पण बॅटरीची समस्या मात्र आजही कायम आहे. या समस्येवर एका ईस्त्रायल कंपनीने उपाय शोधून काढला आहे. या कंपनीने स्टोरडॉट नावाचे तंत्रज्ञान शोधून काढले आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल केवळ तीस सेंकदात चार्ज करु शकता. स्टोरडॉटमध्ये क्रिस्टलच्या आकाराचे नॅनोडॉटस आहेत. ज्यामुळे मोबाईलची बॅटरी कमी वेळात चार्ज होण्यास मदत होते. सध्या या चार्जरचा आकार लॅपटॉप इतका आहे.

मात्र त्याचा आकार कमी करण्यासाठी विविध प्रयोग केले जात असल्याचे कंपनीने म्हणणे आहे. सध्या मोबाईलमध्ये असलेल्या बॅटरीज या लिथीयमपासून बनविलेल्या असतात. सध्या कोणताही मोबाईल पूर्ण चार्ज करण्यासाठी किमान तास ते दीड तास लागतो. अनेकांना दिवसातून दोन ते तीनदा मोबाईल चार्ज करावा लागतो. किंवा सोबत सतत चार्जर किंवा पावर बॅंक बरोबर ठेवावी लागते. अशांसाठी हे नवे संशोधन फारच फायदेशीर ठरणार आहे. अर्थात सध्या हे संशोधन प्राथमिक अवस्थेत आहे. कारण या चार्जरचा आकार फार मोठा आहे. तो छोटा करण्यात यश आल्यास त्याचा वापर व प्रसार जगभर वेगाने होईल.

Now charge the mobile in just thirty seconds

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात