विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : कॅमेरातही आता एआय तंत्रज्ञान


सध्याच्या युगात कॅमेरावर फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन सुरु असल्याचे मानले जाते. आपण त्याचा अनुभव रोजच्या जगण्यातही घेत असतो. आता मोबाईलमधील कॅमेराचेच पहा. त्यामध्ये रोज नवनवे तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे सामान्यांना अफलातून फोटो काढता येणे शक्य बनत चालले आहे. जसे मोबाईलमधील कॅमेरात संशोधन होत आहे अगदी तसेच संशोधक वेगवेगळ्या प्रकारच्या कॅमेरांतही नवनवे बदल घडवित आहेत. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून तो अधिक सक्षम कसा बनेल याची तजवीज करीत आहेत. कृत्रीम बुद्धीमत्ता किंवा आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा सध्या जगभर मोठा बोलबाला आहे. त्याचाच वापर संशोधकांनी आता वेगवेगळ्या क्षेत्रात सुरू केलेला आहे. Now AI technology in camera too

कॅमेराचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. चीनच्या एका संशोधकाने एक खास एआय कॅमेऱ्याचे आधुनिक तंत्रज्ञान तयार केले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आता तब्बल पंचेशाळीस किलोमीटर दूरपर्यंतचा फोटो काढता येऊ शकणार आहे. आहे की नाही कमाल. चीनमधील संशोधक जेन-पिंग ली यांनी हे नवीन संशोधन केले आहे. ओपन सोर्स जर्नल मध्ये यासंबंधी माहिती प्रकाशीत झाली आहे. यातील खास कॅमेरा टेक्नॉलॉजी स्मॉग आणि प्रदूषणमुक्त असणार आहे. या कॅमेऱ्यातील लेजर आणि स्मार्ट एआय सॉफ्टवेअरच्या मदतीने दूरपर्यंतचा फोटो सहजपणे काढता येवू शकणार आहे. जुन्या कॅमेऱ्यात लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. नवीन सॉफ्टवेअरमुळे कॅमेऱ्यातील प्रदूषण दूर करण्याचे काम हे तंत्रज्ञान करतेय, असे संशोधकाने म्हटले आहे.

यात तंत्रज्ञानाच्या मदतीने सॉफ्टवेअर उर्वरित माध्यमातून रिफ्लेक्ट होणाऱ्या फोटॉन्सला कॅमेऱ्यातून हटवण्याचे काम करतो तसेच फोटो काढण्यासाठी किती अंतर आहे. तसेच फोटोचा आकार किती मोठा आहे, यासाठी कॅमेऱ्यातील लेजरचा वापर करता येतो. यामुळे दूरपर्यंतचा फोटो अधिक सुंदर काढता येवू शकतो. एआय कॅमेऱ्यातील या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा म्हणजे कॅमेऱ्याला सुरक्षित ठेवण्याचे काम करण्याबरोबरच कॅमेऱ्याचे रिझोल्यूशन आणि फोटोची गुणवत्ता चांगली ठेवण्याचे काम करतो.

Now AI technology in camera too

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था