मल्टीकाप्टर म्हणजे उद्याची उडणारी कार


जगात दररोज कोठे ना कोठे काही तरी नवीन शोध लागत असतात किंवा प्रगतीसाठी मानवाचे एक पाउल नेहमी पुढे पडत असते. नाविण्याचा ध्यास घेतलेले काही हिकमती लोक सतत काही तर नवीन करण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे मानवाचे जीवन दिवसेंदिवस सुखकर होत आहे. येत्या काही दिवसात रस्त्यावरुन उडणारी कार बनविण्याचे स्वप्न थ्रोस्टिन क्रिंज्न्स याने उराशी बाळगले आहे. आणि त्यासाठी तो दिवसरात्र प्रय्तन करीत आहे. त्याच्या या प्रयत्नांना येत्या काही दिवसात यश येण्याची चिन्हे आहेत. येत्या काही वर्षांत वाहतुक खोळंब्याच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक मल्टीकाप्टरचा वापर करतील की काय असे त्याच्या बोलण्यावर वाटू लागले आहे. त्याने यासाठी मल्टीकाप्टरचा माडेल विकसित केले आहे. यावर बसून तो जेव्हा उडतो त्यावेळी पाहणारे स्तब्ध होतात. हे मल्टीकाप्टर म्हणजेच उद्याची उडणारी कार ठरेल असा तर्क काही जण आताच मांडू लागले आहेत. Multicopter is the flying car of tomorrow

यासाठी त्याने सोळा मोटारचा वापर केला आहे. या मोटारी त्याने अल्युमिनियमच्या फ्रेमवर बसविलेल्या आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी क्रिंज्न्स याने मल्टिवि अटोपायलटचे तंत्र वापरले आहे. त्यामुळे सर्व मोटारींवर नियंत्रण मिळवता येते. त्याने बनविलेल्या या यंत्राचे वजन ११० पौंड इतके आहे. क्रिंज्न्सचे वजन १३० पौंड आहे. म्हणजेच हे यंत्र साधारणपणे १४२ पौंडाचे वजन घेवून सहज हवेत उडू शकते. त्याने या यंत्रासह उडण्याची चाचणी यशस्वी रित्या केली आहे. त्याचे व्हीडीओदेखील इंटरनेटवर पहायला मिळतात. अर्थात हे यंत्र अजून खूपच प्राथमिक स्तरावर आहे. त्यामुळे ते पार उंच उडू शकले नाही. केवळ काही फूटच ते हवेत उडाले. मात्र व्हीडीओमध्ये हे पाहतानादेखील खूप गंमत वाटते. त्यातून क्रिंज्न्स पुढे काय करणार याची कोणाला माहिती नाही तसेच खात्रीदेखील नाही. पण उडणारी कार बनविण्याच्या प्रयत्नातील हा पहिला टप्पा आहे असे मानले जाते. त्याने बनविलेले हे माडेल तसेच त्याचे प्रयोग मात्र खूपच आश्वासक आहेत याबाबत सध्या तरी कोणाच्या मनात शंका नाहीत. अर्थात हे झाले म्हणजे येत्या काही वर्षांत उडणारी कार अवतरेल असे मानणे सध्या तरी धाडसाचे ठरले असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. मात्र क्रिंज्न्स हा जिद्दीने एक एक पाउल पुढे टाकत आहे.

Multicopter is the flying car of tomorrow

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात