महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या प्रगतीचे फुटके डंके…!!


काश्मीरमध्ये १२० वर्षांची आजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती करून अख्ख्या गावाचे लसीकरण पूर्ण करून घेतीय… आणि प्रगत महाराष्ट्रात अज्ञानाच्या अंधारातून गावेच्या गावे लसीकरणाला विरोध करताहेत.तामिळनाडूतल्या कोईतूरमध्ये सुशिक्षित नागरिकांनी एका मंदिरात कोरोना देवीची स्थापना करून तिची आराधना आरंभली आहे. हे सगळे २१ व्या शतकातल्या विज्ञानयुगात घडतेय. ते रोखण्यात अपयश आलेली महाराष्ट्र आणि तामिळनाडू ही राज्ये मात्र आपण देशातली प्रगत राज्ये असल्याचा डंका वाजवित आहेत. त्यांचे डंके फुटके आहेत. maharashtra and tamilnadu both claims to be developed states have failed so far to educate their people about scientific apporch


कोरोनाच्या साथीने देशातल्या प्रगत राज्यांचे नुसतेच वैद्यकीय सुविधांच्या आभावाचे वाभाडे काढलेत असे नाही, तर आत्तापर्यंत ज्यांनी पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवला त्यांची बौद्धिक दिवाळखोरी या साथीने जाहीर केली आहे.

महाराष्ट्रातल्या ५ – ६ गावांनी अज्ञानापोटी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करवून घेण्यास नकार दिला आहे, तर तामिळनाडूत सुशिक्षित लोकांनी कोरोना देवीची स्थापना करून तिचा कोप कमी व्हावा, यासाठी आराधना सुरू केली आहे. ही कशाची लक्षणे आहेत…?? प्रगतीची की बौद्धिक दिवाळखोरीची…??

तिकडे अप्रगत आणि दहशतवाद्याच्या छायेतल्या काश्मीरमध्ये १२० वर्षांची आजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती करून अख्ख्या गावाचे लसीकरण पूर्ण करून घेतीय… आणि इकडे प्रगत महाराष्ट्रातल्या सुवर्ण त्रिकोणातील नाशिक जिल्ह्यात अज्ञानाचा अंधार अजून दूर व्हायला तयार नाहीए. तामिळनाडूतल्या कोईतूरमध्ये तर आणखी वेगळाच प्रकार पुढे आला आहे. तिथे वेगवेगळ्या पदव्या भूषविलेल्या सुशिक्षित नागरिकांनी एका मंदिरात कोरोना देवीची स्थापना करून तिची आराधना आरंभली आहे. हे सगळे २१ व्या शतकात घडते आहे आणि तरीही महाराष्ट्र आणि तामिळनाडू आपण देशातली प्रगत राज्ये असल्याचा डंका वाजवित आहेत.

एकीकडे जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील दोडू तालुक्यातील गार कटियास या छोट्या गावातील १२० वर्षांची आजी धोली देवी यांच्या अथक प्रयत्नांमधून संपूर्ण गावाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली असून गावाला कोरोनापासून मुक्त ठेवले आहे.

प्रगत महाराष्ट्रातल्या प्रगत नाशिक जिल्ह्यातील ५ – ६ गावे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला केवळ अज्ञानातून नकार देतात. तिथे जनजागृती करण्याऐवजी पालकमंत्र्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नुसती माहितीची देवाण घेवाण करतात याला म्हणायचे काय…?? नाशिकचे पालकमंत्री तर रोज सकाळी उठता – बसता पुरोगामी महाराष्ट्राचा डंका वाजवत फुले – शाहू – आंबेडकरांच्या नावाचा जप करीत असतात आणि त्यांच्या भुजबळ फार्मपासून २५ – ३० किलोमीटरच्या रेंजमध्ये असलेल्या रायगडनगरसारखी गावे अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात आहेत, याची त्यांना आपल्या १५ वर्षांच्या पालकमंत्रीपदाच्या काळात जाणीवही झालेली नसते… याला काय म्हणायचे…??

महाविकास आघाडीतल्या मुख्यमंत्र्यांपासून आरोग्यमंत्री – पालकमंत्र्यांपर्यंत सगळे मंत्री केंद्राकडे डोळे लावून आणि तोंडे करून बसतात. मी हेलिकॉप्टरने नाही रस्त्यावरून फिरतोय असे म्हणून मुख्यमंत्री पंतप्रधानांवर दुगाण्या झाडतात. आपल्या कामाचे हिशेब देण्यापेक्षा केंद्र सरकारकडे लसीचे आणि वैद्यकीय सुविधांचे हिशेब मागत बसतात आणि त्यांना देशाचा औद्योगिक सुवर्णत्रिकोण म्हणवल्या जाणाऱ्या प्रगत नाशिक जिल्ह्यातील गावांमध्ये अजून अज्ञानाचा किती अंधार आहे, याची जाणीवही नाही.

एएनआयसारखी वृत्तसंस्था गावात जाऊन तिथले रिपोर्टिंग करते. अधिकारी नुसती माहिती देतात. तरीही पालकमंत्र्यांना जाग येत नाही की ते त्याबद्दल चकार शब्दही काढत नाहीत. मेन स्ट्रीम मीडियातले लोक त्यांना या मुद्द्यावर प्रश्न देखील विचारताना दिसत नाहीत. याला म्हणायचे काय…??

जे चित्र महाराष्ट्राचे तेच तामिळनाडूचे. दोन्ही राज्ये कृषी – उद्योगात आघाडीवर. दोन्ही राज्यांची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत भक्कम. शिक्षणाच्या प्रगतीचा आलेखही इतर राज्यांपेक्षा उंचावलेला. वैचारिक प्रबोधनाची परंपराही तितकीच भक्कम. पण तरीही राज्यांमधल्या अज्ञान आणि अंधश्रद्धांचा अंधःकार दूर करण्यात दोन्ही राज्यांच्या राज्यकर्त्यांना यश आल्याची ही चिन्हे नाहीत. त्यांच्या पुरोगामीत्वाची तर ती अजिबातच पाऊलवाट दाखवत नाहीत. उलट आपली राज्ये अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढण्याच्या त्यांचे अपयश ठळकपणे अधोरेखित करतात. हे राज्यकर्त्यांबरोबरच तिथल्या जनतेचे देखील अपयश आहे…!!, हे कटू असले तरी ते सत्य आहे…!!

maharashtra and tamilnadu both claims to be developed states have failed so far to educate their people about scientific approch

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था