दिशाहीन….


महत्वाचे निर्णय तर बारामतीकरच घेतात. आपण केवळ जाहीर करतो‌. ते सध्या दवाखान्यात लपून बसलेत. आणि त्यांच्या दरबारातील काही नवाब लाॅकडाऊनचा विरोध करत आहेत. म्हणून त्यावर आत्ताच काही बोलता येणार नाही. तोवर केवळ गोल गोल बोलून वेळ मारून न्यायची आहे..’

अजून एका प्रधानाने (अभय मागून) चाचरत वाजे चे काय असे विचारले. त्यावर महाराज उत्तरले ‘वाजेची उपयुक्तता संपली आहे. तो सध्या करामतीकरांची जबाबदारी आहे. ते पाहतील. मी केवळ ओझरता उल्लेख करेन. म्हणजे उद्या आपण अडकलो नाही तर छाती ठोकून बोलता येईल. आणि अडकलोच तर ना राज्य राहिल ना सत्ता….’


 

‘कोण आहे रे तिकडे?’ महाराजांनी शक्य तेवढ्या जोरात प्रश्न केला. त्यांचा आवाज ऐकून दाराबाहेर पहार्‍यावर उभा असलेला सैनिक खाली मान घालून आत आला.
‘अरे प्रधान आले का सगळे?’

‘हो महाराज. सगळे जमलेत. आपण चलावे…’

महालातील खाजगी भागातून महाराज छोट्या दरबाराकडे रवाना झाले. शिडशिडीत अंग आणि कमकुवत हृदयाला झेपेल येवढाच डौल नी तडफदारपणा होता त्यांच्या चालीत…

दरबारात मोजके विश्वासू मानकरी उपस्थित होते. महाराजांनी सर्वांवर नजर फिरवून प्रत्येक चेहर्‍यावर पुरेशी लाचारी असल्याची खात्री करून घेतली आणि बोलू लागले…

‘आज आपण लाईव्ह करणार आहोत. त्याची चर्चा करू’ असे म्हणून राजांनी पहिल्या प्रधानाकडे पाहिले. म्हणाले बोला….

प्रधान १: महाराज आपला दरारा कमी झाला आहे. आपण भाषणात लोकांना त्या दरार्‍याची आठवण करून दिली पाहिजे.

म्हणून महाराजांनी सुरुवातीलाच घाबरू नका असे म्हणायचे ठरले आणि शेवटी पुन्हा अनामिक व्यक्तीच्या नावाने ‘तुम्ही लाईव्ह आलात की भिती वाटते’ असे भाषणाच्या शेवटी सांगायचे असे ठरले. जेणेकरून रयतेला राजांचा धाक वाटेल. तसा राजांच्या वडिलांचा दरारा होता पण त्यांची बात न्यारी. हे थोरले राजे सिंहासनासाठी करामतीकरांच्या नादी लागले आणि यवनांच्या दाढ्या कुरवाळत बसले तसा त्यांचा दरारा संपला.

‘चला. पुढे काय बोलावे?’ राजांनी विचारले…



प्र२ : राजे तसे बोलण्या सारखे काही नाही पण आपण जनतेला याची जाणीव करून दिली पाहिजे की या परिस्थितीला सरकार जबाबदार नाही तर जनताच आहे. म्हणून आपण हे सांगावे की जनतेने नियम पाळले नाही म्हणून करोना पसरला. तसे केल्यास सरकारचा नाकर्तेपणा झाकला जाईल.

प्रधान २ यांच्याकडे राजांनी कौतुकाचा कटाक्ष टाकला आणि लेखनिकाला पूढची वाक्ये सांगितली.

राजे म्हणाले ‘पुढे’….

प्र ३ ‘महाराज समोरचे संकट किती मोठे आहे ते सांगा म्हणजे जनता जास्त घाबरते. त्यासाठी आपण रोग केवढा पसरलाय ते सांगावे…..’

प्र ४ : ‘महाराज आपण काही केले हे सांगायला हवे. त्या साठी मोठाले आकडे हवेत. ठोकून द्या खाटांच्या संख्या वगैरे वगैरे…’

प्र ५: ‘महाराज आपण हिरवा अंगरखा घातला असला तरी आपले हिंदुत्व दिसले पाहिजे. आपण करोनाचे अवतार सांगा आणि दशावतारांची आठवण करा…..’

महाराजांनी तसा उल्लेख केला आणि नवा करोना ‘डबल-टिबल’ मोठा असल्याचा उल्लेख केला

प्र ६: ‘ महाराज त्या महिंद्राला जास्तच आनंद झाला आहे. त्याला इशारा द्यायला हवा….’

ते ऐकून महाराजांनी ‘केवळ खाटा असून काय फायदा? डाॅक्टर पुरविणार का?’ असा परखड (!) सवाल महिंद्रा ना केला! याला म्हणतात दरारा

प्र ७: ‘महाराज संकटात आपण संरक्षण करतो हे दिसले पाहिजे. आपण छत्री घाला भाषणात…’

‘डोक्यावर पडलास का रे तू…. इथे छत्रीचा काय संबंध? महाराज रागावले.

प्र ८: ‘महाराज मुंबईकरांना छत्री सोबत ठेवावी लागते. पावसाळ्यात तीच त्यांचे रक्षण करते. तीची आठवण केली तर त्यांच्या मनातला हळवा कोपरा जागा होईल….’

‘हं….. ठिक. मग आम्ही लसीला छत्री म्हणतो….’ महाराज म्हणाले. पण ते हे विसरले की त्यांनी संकटाला वादळ म्हटले आहे आणि वादळात छत्री म्हणजे शेळीचे शेपूट ना झाकायच्या कामाचे ना माशा उडवायच्या….

प्र: ‘महाराज आपण वेगवेगळ्या देशांची नावे घ्या. मग लोक ते देश नकाशात शोधतील तोवर आपला वेळ संपून जाईल…’

प्र:’पण महाराज लाॅकडाऊनचे काय? तोच तर मुख्य मुद्दा आहे!’ एका वरिष्ठ, जाणत्या प्रधानाने नेमके वर्मावर बोट ठेवले.

महाराज :’हे पहा आपण सगळे माझे विश्वासू आहात म्हणून सांगतो‌. महत्वाचे निर्णय तर बारामतीकरच घेतात. आपण केवळ जाहीर करतो‌. ते सध्या दवाखान्यात लपून बसलेत. आणि त्यांच्या दरबारातील काही नवाब लाॅकडाऊनचा विरोध करत आहेत. म्हणून त्यावर आत्ताच काही बोलता येणार नाही. तोवर केवळ गोल गोल बोलून वेळ मारून न्यायची आहे..’

अजून एका प्रधानाने (अभय मागून) चाचरत वाजे चे काय असे विचारले. त्यावर महाराज उत्तरले ‘वाजेची उपयुक्तता संपली आहे. तो सध्या करामतीकरांची जबाबदारी आहे. ते पाहतील. मी केवळ ओझरता उल्लेख करेन. म्हणजे उद्या आपण अडकलो नाही तर छाती ठोकून बोलता येईल. आणि अडकलोच तर ना राज्य राहिल ना सत्ता….’

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात