लाईफ स्किल्स : समाधान नसेल तर अशा आयुष्याचा आणि संपत्तीचा उपयोग तरी काय?

सारे जग केवळ एकाच गोष्टीभोवती गिरक्या् घेतंय, ते म्हणजे श्री म्हणजेच वैभव, ऐश्वर्य. तुम्हाला ज्ञानाची लालसा असते, सुखाची असते, सौंदर्य, धन, यश, प्रगती ज्या कशाची आसक्ती असते ती म्हणजे श्री. मात्र, लोक जेवढ्या तीव्रतेनं त्याची आसक्ती करतात, तेवढीच ती प्राप्त होणं दुष्कर होतं आणि लोक तेवढे जास्त दुःखी होतात. भगवान गौतम बुद्धांनी अगदी थोडक्यातत सांगितलं, आसक्ती हेच दुःखाचं मूळ कारण आहे. तुम्ही अगदी कुठंही जा आणि बघा, लोक कशाबद्दल बोलत आहेत ते आणि तुम्हाला आढळून येईल की सारेकाही श्रीबद्दलच आहे. खरंच कुणाला श्री प्राप्त करायचं आहे, तर त्याचं मन अंतर्मुख व्हायला हवं. आपण नमःच्या अवस्थेत असतो, जेव्हा आपण अंतर्मुख असतो, तेव्हा आपल्याला श्री गवसते आणि खरी संपदा जन्माला येते. खरी संपत्ती म्हणजे आपण आपल्या स्वमध्ये असणं आणि आपण अंतर्मुख होतो, तेव्हा खऱ्या सुखापर्यंत आणि आनंदापर्यंत पोहोचू शकतो. Life Skills: What is the use of such life and wealth if there is no satisfaction?

अगदी गर्भश्रीमंत व्यक्ती बाह्यतः स्मित करताना दिसेल, पण त्याच्या अंतरंगात डोकावून बघा, तुम्हाला ती प्रसन्नता आणि तृप्ती आढळणार नाही. समाधान नसेल तर अशा आयुष्याचा आणि संपत्तीचा उपयोग तरी काय? ते चिंतेनं व्यापलं असेल आणि ती व्यक्ती चिंतेने ग्रस्त होत मरणार असेल तर ही कसल्या प्रकारची श्री आहे? जीवनाचं ध्येय म्हणजे धन आणि भरभराटीनं शांती लाभायला हवी. तथापि, एखाद्याला खूप संपत्ती मिळाली की त्यासोबत कटकटीही येतात. आई-वडील आणि मुलांमध्ये, तसेच नवरा- बायकोत भांडणे सुरू होतात. न्यायालयात रखडलेले खटले बघितले तर ते बहुतांशी पैशाच्या वादावरून उद्‌भवलेले आढळतील. आपल्याला खूप पैसा मिळवायचा असेल तरी त्यात काय अर्थ आहे? इतकी संपत्ती हवी असेल तर सोबतीला पोटदुखी, अल्सर, मधुमेह, हृदयविकार असे आजारही येतात. परमानंदानं व्यापलेली मनाची प्रसन्नचित्त अशी अवस्था. तुम्ही मुलांकडे बघा. ती आनंदी असतात. मुलाचं मन पूर्ण सजगतेसह निरागस आणि शांत असतं. हेच जीवनाचं ध्येय आहे.

Life Skills: What is the use of such life and wealth if there is no satisfaction?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात