लाईफ स्किल्स : सध्याच्या ताणतणावत तुम्हाला फक्त गहिरी विश्रांती कशी घ्यायची हे माहितच असायला हवे


सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या भावनांच्या द्वारे तुम्ही ध्यानात जाऊ शकता. तुम्हाला खूपच खराब वाटत असेल किंवा खूप राग आला असेल तेव्हा तुमच्या तोंडून उद्गार निघतो, मी हरलो, “बस ! आता आणखी सहन नाही होत, त्या क्षणांमध्ये तुम्ही जर हताश किंवा निराश झाला नाहीत, किंवा हिंसक झाला नाहीत तर तुमच्या असे लक्षात येईल की, त्या क्षणी मनाचा काही संबंध नसतो. मन अगदी स्थिर असते. आणखी एक मार्ग आहे बुद्धी, ज्ञान, सजगता यांचा. याला म्हणतात ज्ञान योग. Life Skills: In the current stress, you just need to know how to take a deep rest.

बसल्या बसल्या तुम्हाला कळते की हे शरीर करोडो पेशींपासून बनलेले आहे. आणि तुमच्यात काहीतरी होते, काही तरी चेतवले जाते. कुणी एखाद्या अंतराळासंबंधीच्या वस्तुसंग्रहालयात जाते किंवा विश्वाबद्दलचा एखादा चित्रपट बघते त्यावेळी खोलवर आत काहीतरी होते, ठिणगी पडते. अशा अनुभवातून बाहेर येऊन तुम्हाला पटकन कुणावरही ओरडता येत नाही. ते जवळ जवळ अशक्यच होते कारण, जेव्हा विश्वाची भव्यता लक्षात येते तेंव्हा सगळा संदर्भच बदलतो. तुम्ही कोण आहात?तुम्ही काय आहात ? तुम्ही कुठे आहात ? या अगाध, अनंत विश्वाच्या तुलनेत तुम्ही कसे आहात ? त्या क्षणी तुमच्यात काहीतरी बदल घडतो. ध्यान म्हणजे अगदी स्वाभाविक असणे, स्वत:बरोबर आणि विश्वातल्या प्रत्येक गोष्टीबरोबर अगदी घरच्यासारखे आरामशीर असणे. तुम्हाला फक्त गहिरी विश्रांती कशी घ्यायची हे माहित असायला हवे. तुम्ही जर मालिश करून घेण्याच्या टेबलावर असाल तर तुम्ही काय करता ? तुम्ही त्या मालिश करणाऱ्याला त्याचे काम करू देता. मालिशवाला त्याचे काम करतो आणि तुम्ही काहीच करत नाही.

ध्यानातही अगदी तसेच आहे. तुम्ही काहीच करायचे नाही, निसर्गाला तुमची काळजी घेऊ द्या. कुठल्याही प्रकारचे प्रयास सोडून द्या कारण प्रयासाने आपण भौतिक गोष्टी कमावतो आणि ते अगदी मर्यादित असते. प्रयास ही भौतिक जगाची भाषा आहे. तुम्ही जर कष्ट केले नाहीत तर तुम्ही पैसे कमावू शकत नाही किंवा घर बांधू शकत नाही. तुम्ही अभ्यास करू शकत नाही आणि चांगले गुण मिळवू शकत नाही. नुसते बसून आणि विचार करून ह्या गोष्टी मिळत नाहीत. भौतिक स्तरावर प्रत्येक गोष्टीसाठी प्रयास करावे लागतात. पण एखादी अध्यात्मिक गोष्ट मिळविण्यासाठी अगदी उलटे तंत्र असते – अजिबात प्रयास करणे नाही ! काही क्षण नुसते बसायचे आणि काहीही करायचे वगैरे नाही. अध्यात्मिक स्तरावर सगळे प्रयास सोडून द्यायचे आणि मग तुम्ही फार मोठे असे काही तरी कमावता.

Life Skills : In the current stress, you just need to know how to take a deep rest.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात