ऐकण्याची कला नीट आत्मसात करा


सध्याच्या काळात जसे पैशाला, वेळेला महत्व आहे त्याचप्रमाणे माणसे जोडण्यालादेखील कमालीचे महत्व आले आहे. त्याला सध्याच्या जमान्यात नेटवर्किंग हा शब्द वापरला जातो. तुमचे नेटवर्किंग किती उत्तम आहे त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. Learn the art of listening

कारण जेव्हा तुम्ही खूप अडचणीत असता किंवा एखाद्या संकटात सापडता त्यावेळी केवळ पैसे असूनही भागत नाही. त्यावेळी माणसेच उपयगी पडतात. तुमचा लोकसंग्रह, मित्रपरिवार किती मोठा आहे त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अशा वेळी पैसे नसले तरी एखाद्या संकटातून मित्रांच्या मदतीने सहज मार्ग निघू शकतो. याची अनेक उदाहरणे आहेत. आपणही याचा अनेकदा अनुभव घेतला असेल. आता माणसे जोडायची तर ती कशी हे जाणून घेणे फार गरजेचे आहे. येथेच तुम्हाला ऐकण्याची कला उपयुक्त पडू शकते.

सर्वप्रथम नेहमी समोरच्याला आहे तसा स्वीकारणं फार गरजेचे असते. आपल्या अपेक्षा, आपली मतं न लादण्याची प्रत्येकाला सवय लागलेली असते. त्यातून अनेकदा आपण समोरच्याच्या मताची फारशी किंमतच करत नाही. त्यासाठी प्रत्येकाने ऐकण्याची कला शिकणं गरजेचे आहे. अनेकदा आपण आपल्या मित्रांशी फुकाचा वाद घालत असतो. म्हणजे राजकीय विषयांवरून उगाचच वाद घालतो. अशा वेळी टोकाची टीका करणे नेहमी टाळले पाहिजे.

त्याचप्रमाणे आपल्यापैकी अनेकांना माणसांवर शिक्के मारण्याची सवय जडलेली असते. त्यातून आपण समोरच्याचे म्हणणे तटस्थपणे न ऐकता त्यात सरमिसळ करीत राहतो. तसेच समोरच्याचे म्हणणे ऐकताना नेहमी त्याचाही आदर करावा. तो अधिक महत्त्वाचा आहे हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं यातच संभाषण योग्य प्रकारे होवू शकते. त्याचप्रमाणे कधीही कौतुकाची संधी न सोडणं हा सुद्धा महत्वाचा भाग असतो. समोरच्याचा बोलण्यावर प्रतिक्रिया नव्हे, तर प्रतिसाद देणं हे देखील ऐकण्याच्या कलेतील महत्वाचा घटक आहे. रागाचंही रुपांतर लोभात करता येणं त्यांमुळे सहज शक्य होते.

Learn the art of listening

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात