मन- मेंदू आणि शरीराची एकात्मता साधा


जेव्हा आपल्याला कसली तरी चिंता वाटायला लागते, तेव्हा ताणतणाव उत्पन्न होतात. एखादी चिंताजनक परिस्थिती ओढवली की आपली जीभ कोरडी पडते, छातीत धडधडते, घाम फुटतो, झोपेवर परिणाम होतो, अस्वस्थता वाढते. पाय जड होतात, हातांचे चाळे सुरू होतात, पोटात गोळा उठतो, म्हणजेच ताणाचा आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. हे केवळ प्रौढ व्यक्तींच्याच बाबतीत घडते असे नाही. मुलांनादेखील विविध ताणतणावांना सामोरे जावे लागते. ज्या प्रकारच्या तणावामुळे मनावर आणि शरीरावर घातक परिणाम होतात, असे तणाव नेहमीच नकारात्मक असतात. असे तणाव कोणाहीवर वारंवार येत असतील तर त्याचा आधी मेंदूवर आणि कालांतराने शरीरावर वाईट परिणाम होतो. Integrate mind-brain and body

तणावाच्या वेळेस काही व्यक्ती येरझाऱ्या घालतात, असे आपण पाहिले असेल. ताणाची तीव्रता कमी करण्याचा हा एक सोपा उपाय आहे. कारण यामुळे शरीराची हालचाल वाढते, त्यामुळे रक्ताभिसरण वाढते. ताण हलका होतो. ताण आलाच तर त्याचा योग्य पद्धतीने निचराही झाला पाहिजे. मेंदूला आवडणाऱ्या गोष्टी केल्या व न आवडणाऱ्या गोष्टी टाळल्या तर तो कायम तत्पर राहील. मात्र रोजच्या जगण्या-वागण्यात आपण काही गोष्टी पूर्णत: टाळू शकत नाही. अशा वेळेला त्या कमी करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करता येईल.

सॅन्ड्रा मिन्टन या संशोधिकेने एक प्रायोगिक अभ्यास केला. त्यात असं दिसलं की एका गटातल्या मुलांना पारंपरिक पद्धतीने शिकवलं, तर दुसऱ्या गटाला या शिकवण्याच्या जोडीला नृत्यात सहभागी करून घेतलं. जी मुलं नृत्यात सहभागी होती, त्या मुलांच्या विविध क्षमतांमध्ये वाढ झाली. उदा. विविध दिशांनी विचार करण्याची क्षमता, कल्पनाशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता अशा अनेक क्षमता वाढल्या. नृत्यामुळे लयबद्ध हालचालींना संगीताची- तालाचीदेखील मदत झाली. सुसंबद्ध हालचाली आणि नृत्य यातून मेंदूच्या विविध क्षमता वाढतात, हे संशोधिकेने केलेलं संशोधन बघितलं तर असं दिसतं की, संशोधिकेने प्रत्यक्ष प्रयोग आणि अनेक संशोधनांमधून सिद्ध केलं आहे. या मागचं कारण देताना त्या म्हणतात की, आपलं मन- मेंदू आणि शरीर हे एकच असतं. या घटकांची एकात्मता असेल तर त्याचा चांगला परिणाम होणारच.

Integrate mind-brain and body

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात