India – Russia – USA : अमेरिकेचा दबाव झुगारून रशिया विरोधातील ठरावात भारत “तटस्थच!!”; तरीही इंडो – पॅसिफिक सहकार्यावर अमेरिका ठाम!!


रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत अमेरिका आणि भारत रशिया यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील संबंधांची विशिष्ट गुंतागुंत (strategic complexity) समोर आली आहे. India – Russia – USA: India “neutral” in anti-Russia resolution against US pressure; Still, the US insists on Indo-Pacific cooperation !!

– रशियाला काय हवे?

युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाला भारताचा पूर्णपणे पाठिंबा हवा आहे. किमान भारत “तटस्थ” राहिला तरी रशियाला चालणार आहे. त्या बदल्यात रशिया भारताची या विद्यार्थ्यांची सुरक्षेची हमी घेऊन त्यांच्यासाठी “मानवी कॉरिडोर” तयार करायला तयार आहे. त्याच वेळी भारताच्या कोणत्याही संरक्षण कराराला कात्री न लावता उलट S 400 क्षेपणास्त्र सिस्टीम लवकरात लवकर भारताला द्यायला तयार आहे. रशियाचे भारतातील राजदूत डेनिस एलिपोव्ह यांनी भारताच्या “तटस्थ” भूमिकेबद्दल समाधान व्यक्त करून भारताविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारताने संतुलित दृष्टिकोन (balanced view) स्वीकारल्याचे त्यांनी म्हटले आहे.

– अमेरिकेचा दबाव काय?

तर दुसरीकडे सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताने युक्रेनला पाठिंबा द्यावा, असे अमेरिकेचे मत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र राज्यमंत्री डोनाल्ड लू यांनी भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या रशिया विरोधी ठरावात मतदान करावे यासाठी आग्रह धरला होता. भारताच्या सर्व प्रतिनिधींना त्यांनी स्वतःहून फोन करून भारताची भूमिका स्पष्ट करायला सांगितले होते. 141 देशांनी रशिया विरोधात मतदान केले आहे. भारताने रशिया विरोधात मतदान करावे यासाठी त्यांनी दबावही आणला होता. पण भारत दबावापुढे झुकला नाही. भारताने मतदानात भाग घेतला नाही. भारत “तटस्थ” राहिला. यावरून अमेरिकन संसद सदस्यांनी बायडेन प्रशासनाला धारेवर धरले आहे.आम्ही भारताचे मन वळवायचा आम्ही खूप प्रयत्न केला. परंतु, आम्ही यशस्वी झालो नाही असे डोनाल्ड लू यांना अमेरिकन संसदेत कबूल करावे लागले. त्याच वेळी S 400 क्षेपणास्त्र प्रणाली रशियाने भारताला देण्याच्या मुद्द्यावर अमेरिकेने अजून शिक्कामोर्तब केले नाही, याची आठवण डोनाल्ड लू यांनी करून दिली आहे. भारताला S 400 क्षेपणास्त्र प्रणाली मिळण्यात भारताचा अमेरिकेचा मोठा अडथळा आहे. भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.

– अमेरिकेचीच तारेवरची कसरत

परंतु तरीदेखील भारताने “तटस्थ” दृष्टीकोन ठेवून राजनैतिक आणि व्युहरचनात्मक संतुलित समज (diplomatic strategic balanced view) दाखवून दिली आहे. त्याच वेळी अमेरिकेने भविष्य काळावर नजर ठेवून भारताबरोबर इंडो – पॅसिफिक सहकार्य कुठेही कमतरता येणार नाही, असे आश्वासन दिले आहे. रशिया आणि युक्रेन हे सध्याचे युद्ध आहे. पण भविष्यात चीन आक्रमकपणे चाली खेळू शकतो, याची अमेरिकेला पक्की जाणीव असल्यामुळे भारताला फार दुखावून चालणार नाही ही धारणा अमेरिकेत पक्की आहे. त्यामुळे अमेरिकेने एकाच वेळी भारताला भारतावर रशिया विरोधात मर्यादित दबाव आणून इंडो – पॅसिफिक सहकार्यासाठी खुल्या मनाने हात पुढे केला आहे. अमेरिकेसाठी ही एक प्रकारे तारेवरची कसरतच ठरली आहे.

– अलिप्ततावादी धोरण नाही

भारताचा तटस्थ दृष्टीकोन हा अलिप्ततावादी धोरणातून आला नसून प्रत्यक्ष भारताची वास्तववादी गरज, भारत-चीन तणावपूर्ण संबंध, भारताला लडाखमध्ये चीनपासून होत असलेला त्रास आणि दक्षिण चीन समुद्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा भारताचा मनसूबा या पार्श्वभूमीवर भारताने रशिया विरोधात मतदान न करता आणि भूमिका न घेता “तटस्थ” राहण्याचा व्यूहरचनात्मक निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

India – Russia – USA : India “neutral” in anti-Russia resolution against US pressure; Still, the US insists on Indo-Pacific cooperation !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण