मनी मॅटर्स : तुम्हाला माहिती का, उत्तम परतावा देणारी पोस्टाची योजना


गुंतवणुकीच्या दृष्टीने पोस्ट ऑफिस एक चांगला पर्याय मानला जातो. इथे आपल्याला चांगले रिटर्न्सही मिळतात. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांत आपल्याला साडे सहा टक्के या दराने वार्षिक रिटर्न्स मिळू शकतात.Great post money plan

या योजनेअंतर्गत आपल्याला एकरकमी पैसे जमा करावे लागतील आणि त्यावर मासिक व्याज उत्पन्न मिळेल. यात वैयक्तिक गुंतवणूकदार कमाल साडे चार लाखांची गुंतवणूक करू शकतो तर संयुक्त खात्यात नउ लाखांपर्यंतची गुंतवणूक करता येते.

पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजना ही आणखी एक चांगली व वेगळी फायदेशीर योजना आहे. सर्वांत मोठा एक फायदा हा आहे की पोस्ट ऑफिसमध्ये आपला पैसा सुरक्षित राहतो. पोस्ट ऑफिसच्या या नव्या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजना असे आहे. याचा लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा आहे. गुंतवणूक मॅच्युअर झाल्यानंतर आपल्याला पूर्ण रक्कम मिळते. या योजनेची खासियत अशी की ही पूर्णपणे जोखीममुक्त आहे आणि यावर मासिक व्याज मिळते.

रिटर्न्स हे पूर्णपणे खात्रीशीर आहेत. दहा वर्षांपेक्षा जास्त वयाचे कुणीही यात नाव नोंदवू शकते. अल्पवयीनांच्या नावाने त्यांचे पालकही याचा लाभ घेऊ शकतात. याअंतर्गत कमीत कमी एक हजार रुपये तर कमाल साडे चार लाख रुपये गुंतवता येतात. ही रक्कम शंभरच्या पटीत असावी लागते. या योजनेत गुंतवणूक केल्यास व्याजमोजणी अगदी सोप्या पद्धतीने होते.

जर आपण एक लाख रुपये गुंतवलेत तर आपल्याला एका वर्षात सहा हजार सहाशे रुपये आणि दर महिन्याला साडेपाचशे रुपये मिळतील. ही रक्कम पाच वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळत राहील. दोन लाख रुपये गुंतवल्यास दर महिन्याला अकराशे रुपये आणि पाच वर्षांत एकूण सहासष्ट हजार रुपये मिळतील. तर तीन लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर सोळाशे पन्नास व चार लाखांच्या गुंतवणुकीवर बावीसशे रुपये मिळत राहतील.

Great post money plan

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात