लाईफ स्किल्स : सध्याच्या जमान्यात भरपूर फिरा, स्वतःचे नेटवर्क वाढवा


अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज युअर लाईफ अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. सध्याच्या काळात ती फार चपखल पणे लागू पडते. लोकांच्या संपर्कात राहून स्वतःचे एक नेटवर्क विकसित करा. यशस्वी होण्यासाठी तुमच्या सभोवती यशस्वी लोकांचे नेटवर्क असणे आवश्यक आहे. यशस्वी व्यक्ती आपला बराच वेळ कॉन्फरन्स, मिटींग्ज, बिझनेस क्लब, इव्हेंटस, सेमिनार्स याद्वारे आपले नेटवर्क विकसित करतात. तर काही वेळा फक्त एक कॉफी पुरेशी असते. अ कप ऑफ कॉफी कॅन चेंज युअर लाईफ. त्याचप्रमाणे कोणत्याही स्थितीत लवकर सुरुवात करा. Go around a lot these days, grow your own network

उपयोगी व कौशल्याभिमुख शिक्षण घ्या, कमी वेळेत पूर्ण होणारे व कमी शिक्षण घ्या. आपल्या उमेदीचा बराच काळ शिक्षणात व स्पर्धा परीक्षा देण्यात जातो व वय निघून गेल्यावर नोकरी शोधत बसतात. वाया गेलेल्या वेळेचे महत्व वेळ निघून गेल्यावर कळते. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या व कामाला लागा नाहीतर पश्चाताप करण्याची पाळी येईल. त्याचप्रमाणे कामाची जागा ठिकाण नेहमी बदला. चौकटीबाहेर पडा, वेगवेगळ्या ठिकाणी जा. तेथील परिस्थितीचे निरीक्षण करा व संधी ओळखा. जगात शिकण्यासारखे बरेच काही असते.

प्रवासामुळे अनेक संकल्पना, संधी सुचतात. त्याचा आपल्या ध्येयपूर्तीसाठी उपयोग होतो, तेव्हा प्रवासाची आवड असावी. कोणत्याही ध्येयाच्या मागे जाताना यशस्वी व्हायचे असेल तर आपले मन अत्यंत खंबीर व संतुलित असावे लागते. त्यासाठी स्वतःच्या मनाचा सतत मागोवा घेणे आवश्यक आहे. आपले मन क्लिअर असेल तरच आपली निर्णयक्षमता प्रभावी ठरते. आपल्या ध्येयावर विश्वास असणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचे मनातून विश्लेषण झाले पाहिजे त्यासाठी मन संतुलित असणे आवश्यक असते. अशा प्रकारे काही बाबी अंगिकारल्यास जीवनात यश सहजपणे मिळून जाते यात शंका नाही.

Go around a lot these days, grow your own network

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती