विज्ञानाची डेस्टीनेशन्स : महाकाय उल्केमुळे आले हिमयुग


अथांग महासागर, उंच हिमाच्छादित पर्वतरांगा, दूरवर पसरलेली वाळवंटे, सदाहरित जंगले, लांब नद्या, तप्त ज्वालामुखी अशी निसर्गाची विविध रुपे आपल्याला पहायला मिळतात. त्यामुळे अंतराळात अशा काय घटना घडल्या ज्यामुळे पृथीवर ही विविध रुपे साकारली याबाबत संशोधकांना नेहमीच कुतूहल असते. Giant meteors caused the ice age

ते शमविण्यासाठी ते सतत झटत असतात. याच मालिकेत आता एका नव्या संशोधनाची भर पडलेली आहे. पृख्वीवर समारे पंचवीस लाख वर्षापूर्वी आदळलेल्या एका महाकाय उल्केमुळे एक मोठी सुनामी आली आणि त्यामुळे या ग्रहावर हिमयुग सुरू झाले असे एका नव्या संशोधनात आढळले आहे.

पृथ्वीवर एल्टॅनिन नावाची उल्का आदळल्यानंतर त्या उल्केच्या आघाताची क्षमता व त्यामुळे होणारे विध्वंसक परिणाम किंवा या संपूर्ण ग्रहाची हवामान प्रणाली पूर्णपणे बदलून टाकणारी तिची ताकद बहुतेक शास्त्रज्ञांनी विचारात घेतली नव्हती असे ऑस्ट्रेलियन संशोधकांचे म्हणणे आहे. ही उल्का सुमारे दोन हजार ० मीटर आकारमानाची होती व प्रशांत महासागराच्या दक्षिण भागात कोसळली होती.

जर ही उल्का जमिनीवर आदळली असती तर कदाचित विवर तयार झाले असते असे न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील संशोधकांचे मत आहे. लहान डोंगराच्या आकाराची उल्का अतिशय वेगाने चिली व अंटार्टिका यांच्या दरम्यान असलेल्या महासागरात कोसळली तर काय झाले असेल याचा विचार करायला पाहिजे. त्यामुळे पाणी खूप जोराने उसळले असेल व त्यामुळे शेकडो मीटर उंचीच्या लाटा तयार झाल्या असतील.

यातून महाकाय सुनामी निर्माण झाली असेल व ते पाणी जमिनीवर खूप मोठ्या भागावर पसरले असेल. त्याचबरोबर या क्रियेतून पाण्याचे बाष्प, सल्फर व धूळ पृथ्वीच्या वातावरणाच्या स्थितांबर या थरापर्यंत पोहोचली असेल. सुनामीमुळे झालेला विध्वंसक परिणाम काही काळापुरता असेल. पण उल्केच्या आघातानंतर तेथील पाणी व इतर पदार्थ अतिशय उंचावर गेल्यामुळे सूर्याची किरणे अडवली गेली असतील व त्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण होऊन तापमान अचानक कमी झाले असेल. या काळात पृथ्वीची सावकाश थंड होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच झालेल्या या घटनेमुळे तापमान अतिशय कमी होऊन हिमयुगाचा प्रारंभ झाला असेल असे या संशोधकांचे मत आहे.

Giant meteors caused the ice age

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात