लाईफ स्किल्स : भितीदायक विचारांना तातडीने दूर सारा

काही वेळा आपण रात्री अंथरूणावपर पडलो की दिवसभराचा आढावा घेत असतो. आज दिवसभरात कुणाबरोबर मतभेद झाले असतील तर तोच विचार सातत्याने आपल्या आंतरमनात चालू असतो आणि हे असे झाले तर, त्याने तसे केले तर असे विचार यायला सुरवात होते. Get rid of scary thoughts immediately

विचार येताना एकच येतो पण नंतर नकारात्मक विचाराच्या मालिकेमुळे आपण साध्या गोष्टीवरून कुठल्या कुठे पोहचतो. मूडच जातो. चिडचिडेपणा वाढतो. जे घडलेच नाही ते घडून गेले आहे असे मन, बुद्धी सांगू लागते आणि पुन्हा पन्हा नकारातमक भाव वाढत जातात. परिणाम काय तर दिवसही जातो आणि कार्यक्षमताही कमी होते. तेव्हा आज सकाळी उठताच ठरवा, भितीदायक विचारांना स्वतःजवळ फिरकू देणार नाही.

स्वतः लाही घाबरणार नाही. कारण मी सारासार विचार करणारा आहे. एक चांगला माणूस आहे. रोजच मनामध्ये अत्यंत शांत भाव आणि सकारात्मक विचार आणण्यासाठी प्रयत्न करणार. यासाठी गाणी ऐकणे, वाचणे, बागेमध्ये जाणे अशा स्वतच्या आवडीसुद्धा जपेन आणि महत्त्वाचे म्हणजे परिस्थिती आहे तशी स्वीकारेन. जे योग्य वाटते तेच करेन.

राईचा पहाड बनवून स्वतच समस्या निर्माण करणार नाही. असा विचार केल्याने एक होईल. तुम्ही योग्य असा विचार करू शकाल आणि तुमच्या हातून चांगले क्षण निसटणार नाहीत. त्यामुळे आजचा दिवस छान मोकळेपणाने जगता येईल. तो वाया जाणार नाही.

Get rid of scary thoughts immediately