मेंदूचा शोध व बोध : चांगल्या गोष्टीचा शोध घ्या


ध्यान, प्रार्थना, स्वच्छंदीपणा या गोष्टींचा मनावर चांगला परिणाम दिसून येतो. याचे मानसिक तसेच शारीरिक उपयोग आहेत. ध्यान करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. थोडा अभ्यास करून एखादे सहजशक्य आणि मनाला समाधान देणारे ध्यान नक्कीच करा.Find the good

प्रार्थनेने बऱ्याच मानसिक आणि शारीरिक विकारांवर गुण आलेली उदाहरणे आहेत. स्वच्छंदीपणा हा सर्व नकारात्मक गोष्टींना लांब ठेवतो. बिनधास्त या शब्दातच इतकी उर्जा आहे कि ऐकणाऱ्याची भीती मोडते. काही समस्या असताना, विशेषतः अपयश आल्यावर हा स्वच्छंदीपणा कुठेतरी हरवून जातो.

तो परत मिळविण्यासाठी कायम तुमच्या आवडीची एखादी गोष्ट करत रहा. भ्रामक कल्पनांना मोडीत काढण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलनच नव्हे तर श्रध्दा निर्मूलनाची गरज आहे. कारण श्रद्धेवर आधारित असलेला, पण पुराव्यावर आधारित नसलेला कोणताही दावा-अर्थात श्रध्दा म्हणजे अंधश्रध्दाच असते. हे मत मान्य असलेल्या सर्वांनी केवळ लिहिण्यापुरतेच मर्यादित न रहाता आपण हे विषय हाती घेऊन अंमलात आणले पाहिजेत.

ज्यांना कोणतीही परकी भाषा येत असेल त्यांनी या साऱ्यांचे विचार आपल्या भाषेतून लिहायचे… मांडायचे… आणि पोहोचवायचे. अशाप्रकारे मेंदूची विवेकी आणि विज्ञाननिष्ठ विचारांची मशागत करत राहिल्यास कालांतराने पुढच्या पिढीत निश्चितच बदल घडेल. शरीर सुदृढ राहावं म्हणून आपण सगळेच व्यायाम करतो. वजन वाढलं की वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतो. खेळाडू सतत सराव करत राहतात. अभिनेता किंवा अभिनेत्री चेहऱ्यावरचे तेज टिकवण्यासाठी व्यायामासकट वेगवेगळे उपाय करत राहतात. म्हातारी होत चाललेली माणसं तरुण दिसण्यासाठी धडपडत असतात.

पण मेंदू तरुण राहावा, मेंदू तल्लख राहावा, विचार चपळ राहावेत यासाठी मेंदूचे व्यायाम कोणीच करत नाही. ते केले पाहिजेत यासाठीच छंद जोपासा, गाणी ऐका, कुणा आवडत्या व्यक्तीला भेट, चागल्या लोकांची व्याख्याने ऐका, चांगलं वाचन करा, काही तरी चांगलं लिहा, बोला, चांगल्या गोष्टीचा शोध घ्या आणि आनंद सुद्धा. सांगा बर? तुम्ही कधी पिसारा फुलवून नाचणारा मोर प्रत्यक्षात पाहिलंय? नाही पहिला? मग तुम्ही अजून काहीच पाहिलं नाही! बघा चांगल्या गोष्टी आणि मन आनंदी ठेवा.

Find the good

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती