रोज तीस मिनिटे व्यायाम कराच

मेंदू आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा हिस्सा आहे. बाळाच्या जन्मापासून ते पाच वर्षाचं होईपर्यंत मेंदूच्या विकासाचा जो टप्पा असतो तो खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी या काळात लहान बाळाला बौद्धिक उत्तेजना देणं हे आई-वडिलांचं एक महत्त्वाचं टास्क असतं. यामुळे त्या बाळाच्या मेंदूचा विकास नीट होतो. Exercise for 30 minutes every day

मोठेपणी आपण शरीराच्या प्रत्येक अवयवाची काळजी घतो. त्या तुलनेत मेंदूची फारशी काळजी घेण्याची तसदी घेत नाही. अर्थात त्यासाठी फार काही वेगळे करण्याची गरज नसत. पण काही गोष्टी जर ठरवून केल्या तर त्याचा मेंदूच्या विकासासाठी, वाढीसाठी नक्की फायदा होतो. मेंदू तल्लख राहण्यासाठी शारीरिक दृष्ट्याही क्रियाशील राहा. रोज कमीत कमी तीस मिनिटे व्यायाम केल्याने शरीरात रक्ताभिसरण सुरळीत होते. यामुळे मेटॅबॉलिझम संतुलित राहून ओबेसिटीचा त्रास दूर सारता येऊ शकतो. यामुळे वृद्धावस्थेत डिमेन्शिया होण्याचा धोका सुद्धा टाळला जाऊ शकतो. चिंता, ताण-तणाव यांपासून दूर राहा. लहान वयातच समरणशक्ती कमी होण्याचे कारण म्हणजे तणावपूर्ण जीवनशैली. ताण प्रत्येकालाच असतो. पण तो किती घ्यायचा ते ठरवले पाहिजे. ताणाचा निचरा करण्यासाठी उपाय योजा. जवळच्या माणसांशी गुगोष्टी करू मनावरील ताण हलका करा.

ताण तणाव जास्त असल्यास कोणत्यागी गोष्टीवर लक्ष केंद्रित करणेसुद्धा कठीण होते. याचा परिणाम शारीरिक, मानसिक आरोग्यावर म्हणजे एकूणच व्यक्तिमत्त्वावर होतो. ताण-तणाव कमी करण्यासाठी आपल्या आवडीच्या बाबी करा. पुस्तक वाचा, गाणी ऐका, फिरायला जा, गप्पा मारा. तसेच मेंदूला नेहमी सक्रिय ठेवा. नेहमी नवनवीन कौशल्ये शिकत राहणे, बुद्धीला चालना देतील अशा गोष्टी करत राहणे यामुळे मेंदूच्या कार्यप्रणाली मध्ये सतत सुधारणा होत राहते, मेंदू मधील न्यूरॉन्स सक्रिय राहतात. यासाठी ब्रेन ट्रेनिंग एक्सझरसाईझ, वेगवेगळी पझल्स सोडवत राहणे या गोष्टींची मदत घेता येते. या सहा गोष्टी नीट लक्षात घेतल्या तर, शारीरिक आणि मानसिक तसेच मेंदू चे आरोग्य चांगले ठेऊन निरामय जीवन जगणे अजिबात अवघड जाणार नाही.

Exercise for 30 minutes every day