मोदी द्वेषाची पराकोटी, काँग्रेसलाच संकटात लोटी!!


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षाविषयक त्रुटी आढळली. तिचे उल्लंघन झाले. हा मुद्दा गेले तीन दिवस भारताच्या राजकारणाला व्यापून उरला आहे. वास्तविक पंतप्रधान मोदी यांनी स्वतःचे कार्यक्रम पुढे चालु देखील केले आहेत. जो काही राजकीय गदारोळ उठला आहे त्यामध्ये भाजप नेत्यांनी वक्तव्यांपेक्षा “कृतीवर” भर दिला आहे. पण काँग्रेसचे नेते मात्र हा विषय उकरून काढून आपल्या मनात उफाळलेल्या मोदी द्वेषाला बेतूक्या वक्तव्यांची वाट मोकळी करून देत आहेत…!! Everyone knows that the farmers have been agitating for 1 year & they are upset with the PM.

भाजपच्या नेत्यांनी परवाच वेगवेगळी वक्तव्ये करून घेतली. काल त्यांनी दिवसभर अनेक ठिकाणी महामृत्युंजय जप, पूजा-अर्चा या धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपल्याला गुंतवून घेतले. पण काँग्रेसचे नेते मात्र पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सलग तीन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा व्यवस्था, पंजाब सरकार याच विषयांवर भाजपला ठोक ठोक ठोकत आहेत. पण यात नवीन मुद्दा काय आहे?, तर काही नाही. उलट अधिकाधिक आक्रस्ताळ्या प्रतिक्रिया व्यक्त करून काँग्रेसचे नेते आपल्याच पक्षाच्या राज्य सरकारला राजकीय दृष्ट्या आणि महत्त्वाचे म्हणजे कायदेशीर दृष्ट्या अडचणीत आणत आहेत.

भाजप या विषयावर राजकारण करत नाही असे अजिबात म्हणण्याचे कारण नाही. भाजप निश्चित या विषयावर राजकारण करतोच आहे. पण त्यामागे वक्तव्यांपेक्षा अधिक “कृती” दिसते आहे आणि येथेच काँग्रेसचे नेते भाजपला खऱ्या अर्थाने तोंड देण्यात कमी पडत आहेत.

– गंभीर राजकीय कायदेशीर हालचाली

एकीकडे भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना धार्मिक कार्यक्रमांमध्ये गुंतवून एक उपक्रम दिल्यासारखे झाले आहे. त्याच वेळी राजकीय पातळीवर काही गंभीर हालचाली सुरू आहेत. खुद्द राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या सुरक्षा विषयातील ढिलाईकडे गांभीर्याने पाहिले आहे. सुप्रीम कोर्टाने तातडीने दखल घेऊन संपूर्ण प्रकरणाची डॉक्युमेंट्स आणि पंतप्रधानांचे ट्रॅव्हल रेकाॅर्डस् पंजाब – हरियाणा हायकोर्टाला ताब्यात घ्यायला सांगितले आहे. पक्षीय राजकारणाच्या पलिकडे टाकली गेलेली ही महत्त्वाची राजकीय – कायदेशीर पावले आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने काटशह देण्याची क्षमता काँग्रेस नेत्यांमध्ये आहे काय? हा मूलभूत प्रश्न आहे किंबहुना काँग्रेस नेते या क्षमतेत कमी पडत असल्यामुळेच ते फक्त भाजप विरोधात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकापाठोपाठ एक ट्विट करून केंद्र सरकारच्या हातात कायदेशीर कारवाईचे आयते कोलीत देत आहेत. पण हे त्यांना सांगणार कोण आणि ते ऐकून घेणार कोण…??

पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले या तिघांची नुसती वक्तव्ये जरी पाहिली तरी त्यातला उथळपणा, आक्रस्ताळेपणा आणि स्वतःच्याच पक्षाला राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्याचा अपरिपक्वता या तिन्ही बाबी स्पष्ट दिसतात. पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी, अशी सूचना भाजपने करणे किंवा काही राजकीय नेत्यांनी करणे यामध्ये नुसत्या वक्तव्यांखेरीज दुसरे काहीही नाही. पण त्याला उत्तर देताना मात्र भाजपच्या पोपटांनी बोलणे बंद करावे. पंतप्रधानांच्या फिरोजपूरच्या रॅलीमध्ये 500 लोक आले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तर हात नाही ना?, अशी बेतुकी वक्तव्ये सिद्धू, बघेल आणि पटोले यांनी केली आहेत. या वक्तव्यांना ना वस्तुस्थितीचा आधार आहे, ना यामागे कोणती राजकीय पलटवाराची परिपक्व चाल आहे…!! या तीनही नेत्यांचा मोदी द्वेष मात्र यातून पराकोटीचा प्रकट होताना दिसतो आणि नेमका हाच मुद्दा “मोदी द्वेषाची पराकोटी, काँग्रेसलाच संकटात लोटी”, अशा स्वरुपाचा ठरताना दिसणार आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर राष्ट्रपतींनी घेतलेली दखल आणि सुप्रीम कोर्टाने काढले दिलेले निर्देश यांचे महत्त्व राजकारणाच्या पलिकडचे आहे. यातली “मेख” काँग्रेस नेत्यांच्या लक्षात येत नाही का?? लक्षात येत असेल तर त्याला तोड काढण्याची त्यांची क्षमता आहे का?? त्यांची क्षमता असेल तर ते तोड काढू शकतील का?? याचा विचार कोण करणार?? त्याचा विचार करण्याची क्षमता असणाऱ्या नेत्यांचा अभाव हेच खऱ्या अर्थाने काँग्रेसचे मूळ राजकीय दुखणे आहे आहे. त्यामुळे तोंडी तोफांच्या कितीही फैरी झाडल्या तर फारतर भाजपचे नेते उचकतील पण केंद्र सरकारचा एक चिराही त्यामुळे ढासळणार नाही. उलट कायदेशीर बाजू भक्कम नसल्याने पंजाब सरकार मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत येईल आणि त्याला बाकी कुठला नव्हे, पण काँग्रेस नेत्यांचा पराकोटीचा मोदी द्वेष आणि त्यांचा तोंडाळपणा जास्त कारणीभूत असेल…!! हे नीट ध्यानात घेतले पाहिजे.

पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंजाबच्या प्रकरणावर आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एकही ट्विट केलेले नाही. किमान यातून तरी काँग्रेस नेत्यांनी धडा घ्यायला नको का? पण जे स्वतःच खूप “उच्चशिक्षित” आहेत आणि ज्यांना लिबरल बुद्धिमंतांचा “सिलेक्टीव्ह प्रखर” पाठिंबा आहे त्यांना राजकारण कोण शिकवणार…?? आणि ते शिकवले तरी कोण शिकणार…??, हा खरा प्रश्न आहे…!!

Everyone knows that the farmers have been agitating for 1 year & they are upset with the PM.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी