दिल्लीत सापडल्या सापांच्या नव्या आठ प्रजाती


विद्यापीठांच्या स्तरावर जगभर अनेक प्रकारे व अनेक विषयांचा अभ्यास सुरू असतो. त्यातून वेगवेगळ्या प्रकारची रहस्ये जगाला माहिती होतात. प्राणीशास्त्र हा देखील असात संशोधनाचा फार मोठा विषय आहे. त्याची व्याप्ती फार मोठी आहे. त्यामुळे प्राण्यांच्या दुनियेत मुशाफिरी करणारे संशोधक नेहमी वेगवेगेळे प्राणी शोधून काढतात. कदाचित ते त्या भागात अस्तित्वात असतात मात्र जगाला त्यांची ओळख झालेली नसते. त्यामुळे या संशोधनाला नेहमी महत्व असते. आता दिल्ली विद्यापीठाच्या संशोधकांनी पाच वर्षे अथकपणे परिश्रम करून सापांच्या आठ प्रजातींचा शोध लावला असून, त्यांचा दिल्लीतील सापांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे, राजधानीत आढळणाऱ्या एकूण सापांच्या प्रजातींची संख्या आता २३वर गेली आहे. हे संशोधन अमेरिकेतील रेप्टाईल्स ॲंड ॲंफिबियन्स या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. Eight new species of snakes found in Delhi

दिल्लीतील सापांच्या संशोधनात २३ प्रजातींच्या एकूण ३२९ सापांची नोंद करण्यात आली. संशोधकांनी जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०२० दरम्यान दिल्लीतील ११ जिल्ह्यांत सापांचे हे संशोधन केले. यात संशोधकांनी दिल्लीतील सार्वजनिक तसेच खासगी बागा, फार्म, मोकळ्या जमिनी, सरोवर व इतर जलस्रोंतामध्ये सापांचा शोध घेतला. निशाचर सापांचीही माहिती जमविण्यात आली. त्याचप्रमाणे, माहिती जमविण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे, वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया व इतर स्वयंसेवी संस्थांकडील सापांबाबतच्या माहितीचाही वापर करण्यात आला. दिल्लीतील सापांच्या नव्या प्रजाती अशा आहेत. नानेटी (कॉमन ब्रोंझबॅक ट्री स्नेक), तस्कर (कॉमन ट्रिंकेट स्नेक), मांजऱ्या (कॉमन कॅट स्नेक), कवड्या (बॅरड वुल्फ स्नेक), मण्यार (कॉमन कुकरी), पट्टेरी मण्यार (स्ट्रिक्ड कुकरी), मांडूळ (कॉमन सॅंड बोआ) आणि फुरसे (सॉ-स्केल्ड वायपर)

Eight new species of snakes found in Delhi

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात